< नीतिसूत्रे 14 >
1 १ सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
智慧婦人建立家室; 愚妄婦人親手拆毀。
2 २ जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
行動正直的,敬畏耶和華; 行事乖僻的,卻藐視他。
3 ३ मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
愚妄人口中驕傲,如杖責打己身; 智慧人的嘴必保守自己。
4 ४ गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
家裏無牛,槽頭乾淨; 土產加多乃憑牛力。
5 ५ विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
誠實見證人不說謊話; 假見證人吐出謊言。
6 ६ निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
褻慢人尋智慧,卻尋不着; 聰明人易得知識。
7 ७ मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
到愚昧人面前, 不見他嘴中有知識。
8 ८ शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
通達人的智慧在乎明白己道; 愚昧人的愚妄乃是詭詐。
9 ९ मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
愚妄人犯罪,以為戲耍; 正直人互相喜悅。
10 १० हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
心中的苦楚,自己知道; 心裏的喜樂,外人無干。
11 ११ दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
奸惡人的房屋必傾倒; 正直人的帳棚必興盛。
12 १२ मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
有一條路,人以為正, 至終成為死亡之路。
13 १३ हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
人在喜笑中,心也憂愁; 快樂至極就生愁苦。
14 १४ जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
心中背道的,必滿得自己的結果; 善人必從自己的行為得以知足。
15 १५ भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
愚蒙人是話都信; 通達人步步謹慎。
16 १६ शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
智慧人懼怕,就遠離惡事; 愚妄人卻狂傲自恃。
17 १७ शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
輕易發怒的,行事愚妄; 設立詭計的,被人恨惡。
18 १८ भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
愚蒙人得愚昧為產業; 通達人得知識為冠冕。
19 १९ दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
壞人俯伏在善人面前; 惡人俯伏在義人門口。
20 २० गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
貧窮人連鄰舍也恨他; 富足人朋友最多。
21 २१ जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
藐視鄰舍的,這人有罪; 憐憫貧窮的,這人有福。
22 २२ जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
謀惡的,豈非走入迷途嗎? 謀善的,必得慈愛和誠實。
23 २३ सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
諸般勤勞都有益處; 嘴上多言乃致窮乏。
24 २४ शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
智慧人的財為自己的冠冕; 愚妄人的愚昧終是愚昧。
25 २५ खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
作真見證的,救人性命; 吐出謊言的,施行詭詐。
26 २६ परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
敬畏耶和華的,大有倚靠; 他的兒女也有避難所。
27 २७ परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
敬畏耶和華就是生命的泉源, 可以使人離開死亡的網羅。
28 २८ प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
帝王榮耀在乎民多; 君王衰敗在乎民少。
29 २९ सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
不輕易發怒的,大有聰明; 性情暴躁的,大顯愚妄。
30 ३० शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
心中安靜是肉體的生命; 嫉妒是骨中的朽爛。
31 ३१ जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
欺壓貧寒的,是辱沒造他的主; 憐憫窮乏的,乃是尊敬主。
32 ३२ दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
惡人在所行的惡上必被推倒; 義人臨死,有所投靠。
33 ३३ बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
智慧存在聰明人心中; 愚昧人心裏所存的,顯而易見。
34 ३४ योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे.
公義使邦國高舉; 罪惡是人民的羞辱。
35 ३५ शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.
智慧的臣子蒙王恩惠; 貽羞的僕人遭其震怒。