< नीतिसूत्रे 13 >
1 १ सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
Син мудрий приймає карта́ння від батька, а насмішник доко́ру не слухає.
2 २ आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
З плоду уст чоловік споживає добро́, а жадо́ба зрадливих — наси́льство.
3 ३ जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
Хто уста свої стереже́, той душу свою береже́, а хто гу́би свої розпуска́є, — на того поги́біль.
4 ४ आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
Пожадає душа лінюха́, та даре́мно, душа ж роботя́щих наси́титься.
5 ५ नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
Нена́видить праведний слово брехливе, безбожний же чинить лихе, і себе засоро́млює.
6 ६ नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
Праведність оберігає невинного на дорозі його, а безбожність погу́блює грішника.
7 ७ जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
Дехто вдає багача́, хоч нічо́го не має, а дехто вдає бідака́, хоч маєток великий у нього.
8 ८ श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
Викуп за душу люди́ни — багатство її, а вбогий й доко́ру не чує.
9 ९ नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
Світло праведних ве́село світить, а світильник безбожних пога́сне.
10 १० गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
Тільки сварка пихо́ю зчиня́ється, а мудрість із тими, хто ра́диться.
11 ११ वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
Багатство, заско́ро здобуте, — поме́ншується, хто ж збирає пома́лу — примно́жує.
12 १२ जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
Задовга надія — неду́га для серця, а бажа́ння, що спо́внюється, — це дерево життя.
13 १३ जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
Хто пого́рджує словом Господнім, той шкодить собі, хто ж страх має до заповіді, тому надолу́житься.
14 १४ सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
Наука премудрого — крини́ця життя, щоб віддали́тися від пасток сме́рти.
15 १५ सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
Добрий розум прино́сить приємність, а дорога зрадли́вих — погу́ба для них.
16 १६ शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
Кожен розумний за мудрістю робить, а безу́мний глупо́ту показує.
17 १७ दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
Безбожний посо́л у нещастя впаде́, а вірний посол — немов лік.
18 १८ जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
Хто ламає поу́ку — убозтво та га́ньба тому́, а хто береже осторо́гу — шанований він.
19 १९ इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
Ви́конане побажа́ння приємне душі, а вступи́тись від зла — то оги́да безумним.
20 २० शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
Хто з мудрими ходить, той мудрим стає, а хто товаришу́є з безу́мним, той лиха набу́де.
21 २१ आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
Грішників зло доганя́є, а праведним Бог надолу́жить добром.
22 २२ चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
Добрий лишає спа́док і ону́кам, маєток же грішника схо́ваний буде для праведного.
23 २३ गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
Убогому буде багато поживи і з поля невпра́вного, та деякі гинуть з безпра́в'я.
24 २४ जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
Хто стримує різку свою, той нена́видить сина свого, хто ж кохає його, той шукає для ньо́го карта́ння.
25 २५ जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.
Праведний їсть, скільки схоче душа, живіт же безбожників за́всіди брак відчуває.