< नीतिसूत्रे 13 >

1 सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
智慧子听父亲的教训; 亵慢人不听责备。
2 आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
人因口所结的果子,必享美福; 奸诈人必遭强暴。
3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
谨守口的,得保生命; 大张嘴的,必致败亡。
4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
懒惰人羡慕,却无所得; 殷勤人必得丰裕。
5 नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
义人恨恶谎言; 恶人有臭名,且致惭愧。
6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
行为正直的,有公义保守; 犯罪的,被邪恶倾覆。
7 जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
假作富足的,却一无所有; 装作穷乏的,却广有财物。
8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
人的资财是他生命的赎价; 穷乏人却听不见威吓的话。
9 नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
义人的光明亮; 恶人的灯要熄灭。
10 १० गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
骄傲只启争竞; 听劝言的,却有智慧。
11 ११ वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
不劳而得之财必然消耗; 勤劳积蓄的,必见加增。
12 १२ जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
所盼望的迟延未得,令人心忧; 所愿意的临到,却是生命树。
13 १३ जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
藐视训言的,自取灭亡; 敬畏诫命的,必得善报。
14 १४ सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
智慧人的法则是生命的泉源, 可以使人离开死亡的网罗。
15 १५ सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
美好的聪明使人蒙恩; 奸诈人的道路崎岖难行。
16 १६ शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
凡通达人都凭知识行事; 愚昧人张扬自己的愚昧。
17 १७ दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
奸恶的使者必陷在祸患里; 忠信的使臣乃医人的良药。
18 १८ जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
弃绝管教的,必致贫受辱; 领受责备的,必得尊荣。
19 १९ इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
所欲的成就,心觉甘甜; 远离恶事,为愚昧人所憎恶。
20 २० शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
与智慧人同行的,必得智慧; 和愚昧人作伴的,必受亏损。
21 २१ आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
祸患追赶罪人; 义人必得善报。
22 २२ चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
善人给子孙遗留产业; 罪人为义人积存资财。
23 २३ गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
穷人耕种多得粮食, 但因不义,有消灭的。
24 २४ जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
不忍用杖打儿子的,是恨恶他; 疼爱儿子的,随时管教。
25 २५ जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.
义人吃得饱足; 恶人肚腹缺粮。

< नीतिसूत्रे 13 >