< नीतिसूत्रे 11 >
1 १ यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे.
Isikali esikhohlisayo siyisinengiso eNkosini, kodwa ilitshe lokulinganisa elipheleleyo liyintokozo yayo.
2 २ जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते.
Nxa kufika ukuzigqaja, kufika lehlazo; kodwa kwabathobekileyo kukhona inhlakanipho.
3 ३ सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.
Ubuqotho babaqotho buzabaqondisa, kodwa ukuphambeka kwabaphambekayo kuzababhubhisa.
4 ४ क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते.
Inotho kayisizi ngosuku lolaka, kodwa ukulunga kophula ekufeni.
5 ५ निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो.
Ukulunga kwabaqotho kuzaqondisa indlela yakhe, kodwa okhohlakeleyo uzakuwa ngenkohlakalo yakhe.
6 ६ जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो.
Ukulunga kwabaqotho kuzabophula, kodwa abaphambukayo bazathunjwa zinkanuko zabo.
7 ७ जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो.
Nxa umuntu okhohlakeleyo esifa, ithemba lakhe lizabhubha, lethemba lolamandla liyabhubha.
8 ८ नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात.
Olungileyo ukhululwa ekuhluphekeni, kodwa omubi ungena endaweni yakhe.
9 ९ अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो.
Ngomlomo umzenzisi uchitha umakhelwane wakhe, kodwa ngolwazi abalungileyo bayakhululwa.
10 १० जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो.
Ngempumelelo yabalungileyo umuzi uyathokoza; lekubhubheni kwabakhohlakeleyo kulenjabulo.
11 ११ जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते.
Ngesibusiso sabaqotho umuzi uyaphakanyiswa, kodwa ngomlomo wabakhohlakeleyo uyachitheka.
12 १२ जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.
Oswela ingqondo udelela umakhelwane, kodwa umuntu oqedisisayo uyazithulela.
13 १३ जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.
Ohamba enyeya wembula imfihlakalo, kodwa othembekileyo ngomoya ufihla udaba.
14 १४ जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो.
Lapho kungekho izeluleko abantu bayawa; kodwa ukukhululwa kusebunengini babeluleki.
15 १५ जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो.
Oba yisibambiso sowezizwe uzahlupheka ngokubi; kodwa ozonda ukutshaya izandla uvikelekile.
16 १६ कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.
Owesifazana olomusa ubamba udumo, labalamandla babamba inotho.
17 १७ दयाळू मनुष्य आपले हित करतो, पण जो क्रूर असतो तो स्वत: ला इजा करून घेतो.
Umuntu olomusa wenzela umphefumulo wakhe okuhle, kodwa olesihluku ukhathaza inyama yakhe.
18 १८ दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
Okhohlakeleyo wenza umsebenzi wenkohliso, kodwa ohlanyela ukulunga ulomvuzo weqiniso.
19 १९ जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल, पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो.
Njengoba ukulunga kungokwempilo, kunjalo ozingela okubi kungokokufa kwakhe.
20 २० जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे, पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो.
Abaphambeneyo ngenhliziyo bayisinengiso eNkosini, kodwa abaqotho ngendlela bayintokozo yayo.
21 २१ दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.
Isandla esandleni omubi kayikuyekelwa ukujeziswa, kodwa inzalo yabalungileyo izaphepha.
22 २२ डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.
Ulisongo legolide empumulweni yengulube owesifazana obukekayo ophambuka engqondweni.
23 २३ जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते.
Isifiso sabalungileyo singokuhle kuphela; ithemba labakhohlakeleyo lulaka.
24 २४ तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल.
Kukhona ohlakazayo, kube kanti okunengi kuyengezwa; logodla okwedlula okufaneleyo, kodwa kungokokuswela.
25 २५ उदार मनाचा इसम समृद्ध होतो, आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल.
Umphefumulo obusisayo uzakhuluphaliswa, lothelelayo uzathelelwa laye.
26 २६ जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल.
Ogodla amabele, abantu bazamqalekisa; kodwa isibusiso sizakuba phezu kwekhanda lothengisayo.
27 २७ जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल.
Odingisisa okuhle, udinga umusa; kodwa odinga okubi, kuzakuza kuye.
28 २८ जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.
Othemba inotho yakhe yena uzakuwa, kodwa abalungileyo bazahluma njengamahlamvu.
29 २९ जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल.
Oletha inkathazo emzini wakhe uzakudla ilifa lomoya, lesithutha sizakuba yinceku yohlakaniphileyo ngenhliziyo.
30 ३० नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे, पण हिंसाचार जीवन दूर नेतो.
Isithelo solungileyo siyisihlahla sempilo, lozuza imiphefumulo uhlakaniphile.
31 ३१ जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते; तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल!
Khangela, olungileyo uzavuzwa emhlabeni; kakhulu kangakanani omubi lesoni!