< नीतिसूत्रे 10 >
1 १ ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो, पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु: खी करतो.
Salomonovi pregovori. Moder sin dela očeta srečnega, toda nespameten sin je potrtost svoji materi.
2 २ दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.
Zakladi zlobnosti nič ne koristijo, toda pravičnost osvobaja pred smrtjo.
3 ३ परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.
Gospod ne bo trpel, da duša pravičnega izstrada, toda odvrže imetje zlobnega.
4 ४ आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो.
Reven postaja tisti, ki ravna s počasno roko, toda roka marljivega dela bogastvo.
5 ५ उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.
Kdor zbira poleti, je moder sin, toda kdor ob žetvi spi, je sin, ki povzroča sramoto.
6 ६ नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
Blagoslovi so na glavi pravičnega, toda nasilje pokriva usta zlobnega.
7 ७ नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.
Spomin na pravičnega je blagoslovljen, toda ime zlobnega bo strohnelo.
8 ८ जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
Moder v srcu bo sprejel zapovedi, toda žlobudrav bedak bo padel.
9 ९ जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
Kdor hodi pošteno, hodi varno; toda kdor svoje poti izkrivlja, bo razpoznan.
10 १० जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
Kdor zavija z očesom, povzroča bridkost, toda žlobudrav bedak bo padel.
11 ११ नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
Usta pravičnega človeka so izvir življenja, toda nasilje pokriva usta zlobnega.
12 १२ द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
Sovraštvo razvnema prepire, toda ljubezen pokriva vse grehe.
13 १३ विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
Na ustnicah tistega, ki ima razumevanje, je najti modrost, toda palica je za hrbet tistega, ki je brez razumevanja.
14 १४ शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते.
Modri ljudje kopičijo spoznanje, toda usta nespametnega so blizu uničenja.
15 १५ श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.
Bogataševo premoženje je njegovo močno mesto. Uničenje revnih je njihova revščina.
16 १६ नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.
Trud pravičnega se nagiba k življenju, sad zlobnega h grehu.
17 १७ जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
Tisti, ki se drži poučevanja, je na poti življenja, toda kdor odklanja opomin, se moti.
18 १८ जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे.
Kdor z lažnivimi ustnicami skriva sovraštvo in kdor izreka obrekovanje, je bedak.
19 १९ जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.
V množici besed ne manjka greha, toda kdor zadržuje svoje ustnice, je moder.
20 २० जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.
Jezik pravičnega je kakor izbrano srebro, srce zlobnega je malo vredno.
21 २१ नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
Ustnice pravičnega hranijo mnoge, toda bedaki umrejo zaradi pomanjkanja modrosti.
22 २२ परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
Gospodov blagoslov, ta bogatí in s tem on ne dodaja nobene bridkosti.
23 २३ दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.
To je kakor zabava bedaku, da počne vragolijo, toda razumevajoč človek ima modrost.
24 २४ दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.
Strah zlobnega bo prišel nanj, toda želja pravičnega bo zagotovljena.
25 २५ दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे.
Kakor mine vrtinčast veter, tako zlobnega ni več, toda pravični je večen temelj.
26 २६ जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
Kakor kis zobem in kakor dim očem, tako je lenuh tistim, ki ga pošljejo.
27 २७ परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
Strah Gospodov podaljšuje dneve, toda leta zlobnega bodo skrajšana.
28 २८ नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
Upanje pravičnega bo veselje, toda pričakovanje zlobnega bo propadlo.
29 २९ जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.
Gospodova pot je moč iskrenemu, toda uničenje bo za delavce krivičnosti.
30 ३० नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत.
Pravični ne bo nikoli odstranjen, toda zloben ne bo poselil zemlje.
31 ३१ नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल.
Usta pravičnega prinašajo modrost, toda kljubovalen jezik bo odrezan.
32 ३२ नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.
Ustnice pravičnega vedo, kaj je sprejemljivo, toda usta zlobnega govorijo kljubovalnost.