< नीतिसूत्रे 1 >
1 १ इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.
Zvirevo zvaSoromoni mwanakomana waDhavhidhi, mambo weIsraeri:
2 २ ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे,
kuti uwane uchenjeri nokurayirwa; nokunzwisisa mashoko enjere;
3 ३ सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,
kuti uve noupenyu hwokuzvibata hune uchenjeri uchiita zvakarurama nokururamisira uye nokuenzanisira;
4 ४ भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे,
kuti vasina mano vapiwe uchenjeri, jaya ripiwe ruzivo namano,
5 ५ ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे,
vakachenjera ngavanzwe uye vagowedzera pakudzidza kwavo, uye vanonzvera ngavawane kutungamirirwa,
6 ६ ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.
kuti vanzwisise zvirevo nemifananidzo, mashoko nezvirahwe zvavakachenjera.
7 ७ परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.
Kutya Jehovha ndiwo mavambo ezivo, asi mapenzi anoshora uchenjeri nokurayirwa.
8 ८ माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
Mwanakomana wangu, teerera, kurayira kwababa vako, uye usarasa kudzidzisa kwamai vako.
9 ९ ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
Zvichava chishongo chakanaka pamusoro wako nouketani hunoshongedza mutsipa wako.
10 १० माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे;
Mwanakomana wangu, kana vatadzi vachikukwezva, usabvuma zvavari kuda kuti uite.
11 ११ जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू.
Kana vakati, “Handei tose; ngativandirei munhu timuuraye; ngativandirei mweya usina mhosva;
12 १२ जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. (Sheol )
ngativamedzei vari vapenyu, seguva, uye vakakwana kudaro savaya vanodzika mugomba; (Sheol )
13 १३ आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू.
tichawana marudzi ose ezvinhu zvinokosha tigozadza dzimba dzedu nezvatichapamba;
14 १४ तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.”
isa zvinhu zvako pamwe chete nesu, tigova nechikwama chimwe chete,”
15 १५ माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस;
mwanakomana wangu, usabvumirana navo, usaisa rutsoka panzira dzavo;
16 १६ त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात.
nokuti tsoka dzavo dzinomhanyira muchivi, vanokurumidza kundodeura ropa.
17 १७ एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे.
Hazvibatsiri sei kutambanudza mumbure shiri dzose dzichinyatsoona!
18 १८ ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात.
Varume ava vanovandira ropa ravo vomene; vanozvivandira ivo pachavo!
19 १९ जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.
Aya ndiwo magumo avaya vanotsvaka pfuma nenzira yakaipa; inouraya vaya vanoiwana.
20 २० ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;
Uchenjeri hunodanidzira nenzwi guru mumugwagwa, hunokwidza inzwi rahwo pachivara;
21 २१ ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते,
kumusoro kwemigwagwa ine ruzha hunodanidzira, pamasuo eguta hunotaura shoko rahwo huchiti:
22 २२ “अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार?
“Kusvikira riniko imi vasina mano, muchingoda kugara musina mano? Kusvikira riniko vaseki vachifarira kuseka, uye mapenzi achivenga zivo?
23 २३ तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतीन; मी आपली वचने तुम्हास कळवीन.
Dai makateerera kutsiura kwangu, ndingadai ndakadurura mwoyo wangu kwamuri uye ndakazivisa pfungwa dzangu kwamuri.
24 २४ मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही.
Asi sezvo makandiramba pandakakudanai uye pasina kana mumwe akateerera pandakatambanudza ruoko rwangu,
25 २५ परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले.
sezvo makashaya hanya nokurayira kwangu, uye mukasagamuchira kutsiura kwangu,
26 २६ म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन.
iniwo ndichaseka panguva yenjodzi yenyu; ndichaseka dambudziko parichakusvikirai,
27 २७ जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु: ख तुम्हावर येतील.
dambudziko parichakukundai sedutu, njodzi paichavhuvhuta pamusoro penyu sechamupupuri, nhamo namatambudziko pazvichakukundai.
28 २८ ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही.
“Ipapo vachadana kwandiri asi ini handingavapinduri; vachanditsvaka asi havangandiwani.
29 २९ कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही,
Sezvo vakavenga zivo uye vakasasarudza kutya Jehovha,
30 ३० त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली.
sezvo vasina kugamuchira yambiro yangu, uye vakashora kutsiura kwangu,
31 ३१ म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील.
vachadya zvibereko zvenzira dzavo uye vachazadzwa nezvibereko zvemano avo.
32 ३२ कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील.
Nokuti kusateerera kwavasina mano kuchavaurayisa, uye kushaya hanya kwamapenzi kuchavaparadza;
33 ३३ परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”
asi ani naani achanditeerera achagara murugare, uye achagara akasununguka, asingatyi kuparadzwa.”