< फिलि. 4 >

1 म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
ओ प्यारे साथी विश्वासियो! आँऊ तुसा सबी ते प्यार करूँआ और तुसा लोका ते मिलणे री बड़ी इच्छा राखूँआ। प्रभुए रे विश्वासो जोगे और स्थिर बणे रे रओ जेड़ा मैं तुसा खे बताई राखेया। तुसे सब मेरी खुशी और ईनाम ए।
2 मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा.
आऊँ यूओदिया ते बिनती करूँआ और सुन्तुखे ते बी बिनती करूँआ कि सेयो प्रभुए रे एक मन ऊई कि रओ।
3 आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
ओ सच्चे सहकर्मी! आऊँ तांते बिनती करूँआ कि तूँ इना जवाणसा री मेल-मिलाप करने रे मताद कर, कऊँकि इने मां साथे सुसमाचार फैलाणे दे, क्लेमेंस और मेरे ओर साथे काम करने वाल़ेया समेत मईणत कित्ती, जिना सबी रे नाओं जीवनो री कताबा रे लिखी राखे।
4 प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
प्रभुए रे सदा खुश रओ, आऊँ फेर बोलूँआ कि खुश रओ।
5 सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.
तुसा री नरमाई सबी लोका सामणे प्रकट ओ। प्रभुए रा वापस आऊणा नेड़े ए।
6 कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
केसी बी गल्ला री चिन्ता नि करो। पर हर एकी परिस्थितिया रे तुसा री अर्ज, प्रार्थना और बिनतिया रे जरिए, धन्यवादो साथे परमेशरो सामणे ल्याए जाओ।
7 म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
तेबे परमेशरो तुसा खे शान्ति देणी। ये शान्ति माणूंआ री समजा ते बिल्कुल बारे ए। एसा तुसा रे दिल और तुसा रे सोच-बिचार मसीह यीशुए रे सयी-सलामत राखणे।
8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
आखरी रे ओ साथी विश्वासियो! तुसे आपणा त्यान तिना गल्ला पाँदे लगाओ जो-जो गल्ला सच ए, आदरणीय ए, खरिया ए, पवित्र ए, सुन्दर ए और मनो खे खरिया लगणे वाल़िया ए। तिना ई गल्ला रे बारे रे सोचो जो उत्तम और तारीफा जोगिया ए।
9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
जो गल्ला मैं तुसा खे सिखाई राखिया और तुसे मांते सुणिया और सिखिया और सेयो मानिया, और जो माखे करदे ऊए देखोए, तिना ई गल्ला खे मानेया करो। तेबे परमेशर, जो शान्तिया री सुबल़ ए तुसा लोका साथे रणा।
10 १० मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती.
आऊँ प्रभुए रे बऊत खुश ए कऊँकि एबे इतणे दिनो ते बाद फेर तुसे मेरी चिन्ता मेरी मताद करने खे कित्ती। पक्का तुसा खे शुरूओ रे बी इजी गल्ला री चिन्ता थी, पर तुसा खे मेरी मताद करने रा मौका नि मिलेया।
11 ११ मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे.
ये नि कि आऊँ आपणी कमिया री बजअ ते ये बोलणे लगी रा, कऊँकि मैं ये सिखी राखेया कि जेते दशा रे आए, तिदे ई तसल्ली राखूँ।
12 १२ दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे.
मैं गरीबी और भरपूरी दूँईं दशा रे रणा सीखी ला रा। हर एकी गल्ला रे और सबी दशा रे मैं रजे रे ऊणा या पूखा रणा और बढ़ना-कटणा सीखी ला रा।
13 १३ आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
मसीह रे जरिए जो माखे सामर्थ देओआ तिदे आऊँ सब कुछ करी सकूँआ।
14 १४ पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत.
फेर बी तुसे मेरे बुरे बखतो रे मेरी मताद करी की बऊत खरा काम कित्तेया।
15 १५ फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही.
ओ फिलिप्पिया रे लोको! तुसे आपू बी जाणोए कि सुसमाचार प्रचारो री शुरूआता दे, जेबे आऊँ मकिदुनिया प्रदेशो ते चली पड़ेया, तेबे तुसा खे छाडी की ओरी किने बी मण्डल़िए लणे-देणे रे बारे रे मेरी मताद नि कित्ती।
16 १६ मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली.
ईंयां ई जेबे आऊँ थिस्सलुनीके रे था, तेबे बी तुसे मेरी जरूरत पूरी करने खे, एकी बारिया ते बी जादा मताद पेजी।
17 १७ मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो.
आँऊ ये इजी खे नि बोलदा कि माखे पैसेया री कुछ मताद चाईयो, पर ये कि तुसे से आशीष पाओ जो परमेशरो री तरफा ते दान देणे ते आओई।
18 १८ पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.
मांगे सब कुछ ए, बल्कि बऊत जादा बी ए, जो चीजा तुसे इपफ्रुदीतुसो रे आथो रे पेजिया थिया, तिना खे पाई की आऊँ रज्जी गा रा। से तो सुख देणे वाल़ी खुशबू जेड़ी और मानणे जोगा बलिदान ए, जो परमेशरो खे अच्छा लगोआ।
19 १९ माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील.
आँऊ प्रार्थना करूँआ कि परमेशर बी आपणे तेस धनो रे मुताबिक, जो महिमा समेत यीशु मसीह रे ए, तुसा री सारी जरूरता खे पूरी करो।
20 २० आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn g165)
म्हारे परमेशर और पिते री महिमा जुगो-जुगो तक ऊँदी रओ। आमीन् (aiōn g165)
21 २१ ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात.
यीशु मसीह रे परमेशरो रे सब पवित्र लोका खे मेरी तरफा ते नमस्कार बोलो। जो विश्वासी पाई मां साथे ए, सेयो तुसा खे नमस्कार बोलोए।
22 २२ सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात.
सब परमेशरो रे पवित्र लोक जो एती ए, खास करी की जो महाराजा कैसरो रे कराने रे विश्वासी ए, तुसा खे नमस्कार बोलोए।
23 २३ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
म्हारे प्रभु यीशु मसीह री कृपा तुसा सबी साथे सदा ऊँदी रओ। आमीन्।

< फिलि. 4 >