< फिलि. 4 >
1 १ म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
Tad nu, mani mīļie brāļi, manas sirds ilgošanās, mans prieks un mans kronis, - tā stāviet iekš Tā Kunga, jūs mīļie.
2 २ मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा.
Es lūdzu Evodiju un lūdzu Sintihu, lai ir vienis prātis iekš Tā Kunga;
3 ३ आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
Un tevi arīdzan lūdzu, tu mans īstais darba biedri: gādā par šīm sievām, kas līdz ar mani ir cīnījušās iekš evaņģēlija, tā kā arī Klements, un mani citi darba biedri, kuru vārdi ir dzīvības grāmatā.
4 ४ प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
Priecājaties iekš Tā Kunga vienmēr; es saku atkal: priecājaties!
5 ५ सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.
Lai jūsu lēnība top zināma visiem cilvēkiem; Tas Kungs ir tuvu.
6 ६ कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
Nebēdājaties par neko; bet jūsu lūgšanas visās lietās lai pie Dieva top zināmas caur piesaukšanu un pielūgšanu ar pateikšanu.
7 ७ म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
Un tas Dieva miers, kas augstāks nekā visa saprašana, tas pasargās jūsu sirdis un jūsu domas iekš Kristus Jēzus.
8 ८ बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
Un vēl, brāļi, visu, kas patiesīgs, visu, kas godīgs, visu, kas taisns, visu, kas šķīsts, visu, kas mīlīgs, visu, kam laba slava, ja ir kāds labs tikums, un ja ko var teikt, - to liekat vērā.
9 ९ माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
Ko jūs arī esat mācījušies un dabūjuši un dzirdējuši un redzējuši pie manis, to dariet; tad tas miera Dievs būs ar jums.
10 १० मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती.
Bet es ļoti esmu priecājies iekš Tā Kunga, ka jūs nu atkal reiz esat uzsākuši gādāt par mani: par ko jūs arī esat gādājuši, bet tas laiks jums nav izdevies.
11 ११ मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे.
Es to nesaku nekāda trūkuma dēļ; jo es esmu mācījies iztikt ar to, kas man ir.
12 १२ दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे.
Un es zinu zems būt, un es zinu augsts būt; visādi un visās lietās esmu mācījies, gan paēdis būt, gan izsalcis, pilnībā dzīvot un trūkumu ciest.
13 १३ आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
Es spēju visas lietas iekš Tā, kas mani dara spēcīgu, proti iekš Kristus.
14 १४ पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत.
Tomēr jūs esat labi darījuši, ka jūs manas bēdas līdz ar mani esat nesuši.
15 १५ फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही.
Un arī jūs, Filipieši, zināt, ka no evaņģēlija sākuma laikiem, kad es no Maķedonijas esmu izgājis, neviena draudze nav ar mani biedrībā stāvējusi iekš došanas un ņemšanas, kā tikai jūs vien.
16 १६ मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली.
Jo arī, kad es biju Tesalonikā, jūs vienu un otru reizi man esat sūtījuši priekš manas vajadzības.
17 १७ मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो.
Ne tā kā es to dāvanu meklēju, bet es meklēju to augli, kas no tās bagātīgi atlec priekš jums.
18 १८ पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.
Bet es visu esmu dabūjis un man ir pār pārim; es esmu papilnam apgādāts ar to, ko jūs caur Epafroditu man sūtījuši, kā saldu smaržu, kā pieņēmīgu un Dievam patīkamu upuri.
19 १९ माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील.
Bet mans Dievs piepildīs visu jūsu vajadzību pēc Savas bagātības iekš godības caur Kristu Jēzu.
20 २० आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn )
Bet mūsu Dievam un Tēvam lai ir gods mūžīgi mūžam. Āmen. (aiōn )
21 २१ ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात.
Sveicinājiet ikvienu svētu iekš Kristus Jēzus; tie brāļi, kas pie manis, jūs sveicina.
22 २२ सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात.
Visi tie svētie jūs sveicina un visvairāk tie no ķeizara nama.
23 २३ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
Mūsu Kunga Jēzus Kristus žēlastība lai ir ar jums visiem. Āmen.