< फिलि. 3 >
1 १ शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे.
เห ภฺราตร: , เศเษ วทามิ ยูยํ ปฺรภาวานนฺทตฯ ปุน: ปุนเรกสฺย วโจ เลขนํ มม เกฺลศทํ นหิ ยุษฺมทรฺถญฺจ ภฺรมนาศกํ ภวติฯ
2 २ त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.
ยูยํ กุกฺกุเรภฺย: สาวธานา ภวต ทุษฺกรฺมฺมการิภฺย: สาวธานา ภวต ฉินฺนมูเลโภฺย โลเกภฺยศฺจ สาวธานา ภวตฯ
3 ३ कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
วยเมว ฉินฺนตฺวโจ โลกา ยโต วยมฺ อาตฺมเนศฺวรํ เสวามเห ขฺรีษฺเฏน ยีศุนา ศฺลาฆามเห ศรีเรณ จ ปฺรคลฺภตำ น กุรฺวฺวามเหฯ
4 ४ तरी देहावरही भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार.
กินฺตุ ศรีเร มม ปฺรคลฺภตายา: การณํ วิทฺยเต, กศฺจิทฺ ยทิ ศรีเรณ ปฺรคลฺภตำ จิกีรฺษติ ตรฺหิ ตสฺมาทฺ อปิ มม ปฺรคลฺภตายา คุรุตรํ การณํ วิทฺยเตฯ
5 ५ मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी;
ยโต'หมฺ อษฺฏมทิวเส ตฺวกฺเฉทปฺราปฺต อิสฺราเยลฺวํศีโย พินฺยามีนโคษฺฐีย อิพฺริกุลชาต อิพฺริโย วฺยวสฺถาจรเณ ผิรูศี
6 ६ आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
ธรฺมฺโมตฺสาหการณาตฺ สมิเตรุปทฺรวการี วฺยวสฺถาโต ลเภฺย ปุเณฺย จานินฺทนีย: ฯ
7 ७ तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.
กินฺตุ มม ยทฺยตฺ ลภฺยมฺ อาสีตฺ ตตฺ สรฺวฺวมฺ อหํ ขฺรีษฺฏสฺยานุโรธาตฺ กฺษติมฺ อมเนฺยฯ
8 ८ इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
กิญฺจาธุนาปฺยหํ มตฺปฺรโภ: ขฺรีษฺฏสฺย ยีโศ รฺชฺญานโสฺยตฺกฺฤษฺฏตำ พุทฺธฺวา ตตฺ สรฺวฺวํ กฺษตึ มเนฺยฯ
9 ९ आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे.
ยโต เหโตรหํ ยตฺ ขฺรีษฺฏํ ลเภย วฺยวสฺถาโต ชาตํ สฺวกียปุณฺยญฺจ น ธารยนฺ กินฺตุ ขฺรีษฺเฏ วิศฺวสนาตฺ ลภฺยํ ยตฺ ปุณฺยมฺ อีศฺวเรณ วิศฺวาสํ ทฺฤษฺฏฺวา ทียเต ตเทว ธารยนฺ ยตฺ ขฺรีษฺเฏ วิเทฺยย ตทรฺถํ ตสฺยานุโรธาตฺ สรฺเวฺวษำ กฺษตึ สฺวีกฺฤตฺย ตานิ สรฺวฺวาณฺยวกรานิว มเนฺยฯ
10 १० हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी.
ยโต เหโตรหํ ขฺรีษฺฏํ ตสฺย ปุนรุตฺถิเต รฺคุณํ ตสฺย ทุ: ขานำ ภาคิตฺวญฺจ ชฺญาตฺวา ตสฺย มฺฤโตฺยรากฺฤติญฺจ คฺฤหีตฺวา
11 ११ म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
เยน เกนจิตฺ ปฺรกาเรณ มฺฤตานำ ปุนรุตฺถิตึ ปฺราปฺตุํ ยเตฯ
12 १२ मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.
มยา ตตฺ สรฺวฺวมฺ อธุนา ปฺราปิ สิทฺธตา วาลมฺภิ ตนฺนหิ กินฺตุ ยทรฺถมฺ อหํ ขฺรีษฺเฏน ธาริตสฺตทฺ ธารยิตุํ ธาวามิฯ
13 १३ बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून,
เห ภฺราตร: , มยา ตทฺ ธาริตมฺ อิติ น มนฺยเต กินฺเตฺวตไทกมาตฺรํ วทามิ ยานิ ปศฺจาตฺ สฺถิตานิ ตานิ วิสฺมฺฤตฺยาหมฺ อคฺรสฺถิตานฺยุทฺทิศฺย
14 १४ ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
ปูรฺณยตฺเนน ลกฺษฺยํ ปฺรติ ธาวนฺ ขฺรีษฺฏยีศุโนรฺทฺธฺวาตฺ มามฺ อาหฺวยต อีศฺวราตฺ เชตฺฤปณํ ปฺราปฺตุํ เจษฺเฏฯ
15 १५ तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली, तरी देव तेही तुम्हास प्रकट करील.
อสฺมากํ มเธฺย เย สิทฺธาไสฺต: สรฺไวฺวสฺตเทว ภาวฺยตำ, ยทิ จ กญฺจน วิษยมฺ อธิ ยุษฺมากมฺ อปโร ภาโว ภวติ ตรฺหีศฺวรสฺตมปิ ยุษฺมากํ ปฺรติ ปฺรกาศยิษฺยติฯ
16 १६ तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
กินฺตุ วยํ ยทฺยทฺ อวคตา อาสฺมสฺตตฺราสฺมาภิเรโก วิธิราจริตวฺย เอกภาไว รฺภวิตวฺยญฺจฯ
17 १७ बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.
เห ภฺราตร: , ยูยํ มมานุคามิโน ภวต วยญฺจ ยาทฺฤคาจรณสฺย นิทรฺศนสฺวรูปา ภวามสฺตาทฺฤคาจาริโณ โลกานฺ อาโลกยธฺวํฯ
18 १८ कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
ยโต'เนเก วิปเถ จรนฺติ เต จ ขฺรีษฺฏสฺย กฺรุศสฺย ศตฺรว อิติ ปุรา มยา ปุน: ปุน: กถิตมฺ อธุนาปิ รุทตา มยา กถฺยเตฯ
19 १९ नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
เตษำ เศษทศา สรฺวฺวนาศ อุทรศฺเจศฺวโร ลชฺชา จ ศฺลาฆา ปฺฤถิวฺยาญฺจ ลคฺนํ มน: ฯ
20 २० आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.
กินฺตฺวสฺมากํ ชนปท: สฺวรฺเค วิทฺยเต ตสฺมาจฺจาคมิษฺยนฺตํ ตฺราตารํ ปฺรภุํ ยีศุขฺรีษฺฏํ วยํ ปฺรตีกฺษามเหฯ
21 २१ ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
ส จ ยยา ศกฺตฺยา สรฺวฺวาเณฺยว สฺวสฺย วศีกรฺตฺตุํ ปารยติ ตยาสฺมากมฺ อธมํ ศรีรํ รูปานฺตรีกฺฤตฺย สฺวกียเตโชมยศรีรสฺย สมาการํ กริษฺยติฯ