< फिलि. 1 >
1 १ पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम;
Paweł i Tymoteusz, słudzy Jezusa Chrystusa, do wszystkich świętych w Chrystusie Jezusie, którzy są w Filippi, wraz z biskupami i diakonami.
2 २ देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
Łaska wam i pokój od Boga, naszego Ojca, i Pana Jezusa Chrystusa.
3 ३ मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.
Dziękuję memu Bogu, ilekroć was wspominam;
4 ४ माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो;
Zawsze w każdej mojej modlitwie prosząc z radością za was wszystkich;
5 ५ पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.
Za wasz współudział w ewangelii od pierwszego dnia aż do chwili obecnej;
6 ६ आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.
Będąc tego pewien, że [ten], który rozpoczął w was dobre dzieło, dokończy [go] do dnia Jezusa Chrystusa.
7 ७ आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे.
Słuszne jest, abym tak myślał o was wszystkich, dlatego że mam was w moim sercu, bo w moim więzieniu, jak i w obronie i utwierdzaniu ewangelii wszyscy jesteście ze mną uczestnikami łaski.
8 ८ देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,
Bóg bowiem jest mi świadkiem, jak tęsknię do was wszystkich najgłębszymi uczuciami Jezusa Chrystusa.
9 ९ मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
I o to się modlę, aby wasza miłość coraz bardziej obfitowała w poznanie i we wszelkie zrozumienie;
10 १० यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
Abyście mogli rozpoznać to, co lepsze, żebyście byli szczerzy i bez zarzutu na dzień Chrystusa;
11 ११ आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
Napełnieni owocami sprawiedliwości, które [przynosicie] przez Jezusa Chrystusa ku chwale i czci Boga.
12 १२ माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.
A chcę, bracia, abyście wiedzieli, że to, co mnie spotkało, spowodowało jeszcze większe rozkrzewienie ewangelii;
13 १३ म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले;
Tak że moje więzy z powodu Chrystusa stały się znane w całym pałacu i u wszystkich innych.
14 १४ आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.
A wielu braci w Panu nabrało otuchy z powodu moich więzów i z większą odwagą, bez lęku zaczęło głosić słowo.
15 १५ कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत.
Niektórzy wprawdzie z zazdrości i sporu, inni zaś z dobrej woli głoszą Chrystusa.
16 १६ मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात.
Jedni ze sporu głoszą Chrystusa nieszczerze, sądząc, że dodadzą ucisku moim więzom;
17 १७ पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.
Inni zaś z miłości, wiedząc, że jestem przeznaczony do obrony ewangelii.
18 १८ ह्यापासून काय झाले? निमित्ताने असो किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.
Cóż więc? Mimo wszystko każdym sposobem, czy obłudnie, czy szczerze, Chrystus jest głoszony. Z tego się raduję i będę się radował.
19 १९ कारण मी जाणतो की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल.
Wiem bowiem, że to doprowadzi do mojego zbawienia dzięki waszej modlitwie i pomocy Ducha Jezusa Chrystusa;
20 २० कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Zgodnie z moim gorliwym oczekiwaniem i nadzieją, że w niczym nie będę zawstydzony, lecz z całą odwagą, jak zawsze, [tak] i teraz, uwielbiony będzie Chrystus w moim ciele, czy to przez życie, czy przez śmierć.
21 २१ कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.
Dla mnie bowiem życie [to] Chrystus, a śmierć to zysk.
22 २२ पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.
Lecz jeśli życie w ciele jest dla mnie owocem mojej pracy, to nie wiem, co mam wybrać.
23 २३ कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
Jedno i drugie bowiem mnie naciska: chcę odejść i być z Chrystusem, bo [to] o wiele lepsze;
24 २४ तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.
Lecz pozostać w ciele jest bardziej potrzebne ze względu na was.
25 २५ मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे.
A będąc tego pewien, wiem, że pozostanę i będę z wami wszystkimi dla waszego rozwoju i radości wiary;
26 २६ हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे.
Aby obfitowała wasza chluba w Chrystusie Jezusie ze mnie, gdy znowu przybędę do was.
27 २७ सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Tylko postępujcie jak przystoi na ewangelię Chrystusa, abym czy przyjdę i zobaczę was, czy nie przyjdę, słyszał o was, że trwacie w jednym duchu, jednomyślnie walcząc o wiarę ewangelii;
28 २८ आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.
I w niczym nie dając się zastraszyć przeciwnikom. Dla nich jest to dowód zguby, a dla was zbawienia, i to od Boga.
29 २९ कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
Gdyż wam dla Chrystusa dane jest nie tylko w niego wierzyć, ale też dla niego cierpieć;
30 ३० मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.
Staczając tę samą walkę, którą widzieliście we mnie, i o [której] słyszycie, że teraz we mnie [się toczy].