< ओबद्या 1 >
1 १ ओबद्याचा दृष्टांत. अदोमाबद्दल प्रभू परमेश्वराने म्हटलेः आम्ही परमेश्वराकडून बातमी ऐकली आणि एक राजदूत राष्ट्रांमध्ये पाठवला आहे. तो म्हणतो, “उठा! आपण त्याच्याविरुध्द लढण्यास उठू.”
The prophecy of Obadiah. Thus saith the Lord Jehovah concerning Edom. We have heard a message from Jehovah, And an ambassador hath been sent among the nations “Arise ye, and let us rise up against her to war.”
2 २ पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये लहान करीन, तू खूप तिरस्करणीय आहेस.
Behold, I will make thee small among the nations; Thou shalt be greatly despised.
3 ३ जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.
The pride of thine heart hath deceived thee, Thou that dwellest in the clefts of the rock, Whose habitation is high, Who sayest in thine heart, “Who shall bring me down to the ground?”
4 ४ परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
Though thou lift thyself up as the eagle, And though thou set thy nest among the stars, Thence will I bring thee down, saith Jehovah.
5 ५ तू कसा छेदला गेला आहेस! जर तुझ्याकडे चोर आले, तुझ्याकडे रात्री लुटारू आले, तर ते त्यांना पाहिजे तितकेच चोरून घेणार नाहीत का? द्राक्षे गोळा करणारे तुजकडे आले तर ते सरवा नाही का ठेवणार?
If thieves had come upon thee, Or robbers by night, Would they not have ceased stealing when they had enough? How art thou utterly destroyed! If grape-gatherers had come upon thee, Would they not have left gleanings of the grapes?
6 ६ एसावाची मालमत्ता कशी लुटण्यात आली आहे आणि त्याचा गुप्त खजिना कसा शोधून काढण्यात आला.
How is Esau searched through! How are his hidden places explored!
7 ७ तुझ्या कराराच्या सर्व मनुष्यांनी तुला तुझ्या सीमेपर्यंत घालवले आहे, तुझ्याबरोबर सल्ला केलेल्या मनुष्यांनी तुला फसवले आहे, आणि ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझी भाकर खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे. त्याच्यात काही समजूतदारपणा नाही.
All thine allies have brought thee to the border; They that were at peace with thee have deceived thee, and prevailed against thee; They that ate thy bread have spread a snare under thee; There is no understanding in thee.
8 ८ परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय?
In that day, saith Jehovah, I will destroy the wise men from Edom, And understanding from the mount of Esau.
9 ९ आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील.
Thy mighty men, O Teman, shall be dismayed; Every one shall be cut off from the mount of Esau.
10 १० तू आपला भाऊ याकोब याच्यावर जो जुलूम केला त्यामुळे लाज तुला झाकील आणि तुझा कायमचा नाश होईल.
For slaughter and for oppression of thy brother Jacob shall shame cover thee, And thou shalt be destroyed forever.
11 ११ ज्या दिवशी तू अलिप्त राहिलास, ज्या दिवशी परक्यांनी त्यांची संपत्ती लुटून नेली, परदेशी त्यांच्या वेशीत शिरून; आणि त्यांनी यरूशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या; आणि त्या दिवशी तूही त्यातला एक होतास.
In the day when thou stoodest over against him, In the day when strangers carried away captive his forces, And when foreigners entered his gates, And when they cast lots upon Jerusalem, Thou also wast as one of them.
12 १२ परंतु तू आपल्या भावाचा दिवस, त्याच्या विपत्तीचा दिवस पाहू नकोस, आणि तू यहूदाच्या वंशजास नाशाच्या दिवशी आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी तू गर्वाने बोलू नको.
But thou shouldst not have looked with delight on the day of thy brother in the day of his calamity; Nor shouldst thou have rejoiced over the children of Judah in the day of their destruction, Nor have spoken haughtily in the day of his distress.
13 १३ तू माझ्या लोकांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांच्या वेशीत शिरू नको, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहू नको, आणि त्यांच्या विपत्तीच्या दिवशी तू त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको.
Thou shouldst not have entered into the gate of my people in the day of their calamity, Nor have looked with delight on their affliction in the day of their calamity, Nor have laid hand on their substance in the day of their calamity,
14 १४ आणि त्यांच्या पळून जाणाऱ्यांस मारून टाकण्यासाठी चौकात उभा राहू नको संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांस शत्रूच्या हाती देऊ नको.
Nor have stood in the cross-way to cut off their fugitives, Nor have delivered up those that remained in the day of distress!
15 १५ कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल.
For the day of Jehovah is near upon all the nations: As thou hast done, so shall it be done to thee; Thy dealing shall return upon thine own head.
16 १६ कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.
For as ye have drunk upon my holy mountain, So shall all the nations drink perpetually, Yea, they shall drink and swallow it down, And they shall be as though they had not been.
17 १७ पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
But upon mount Zion shall be deliverance, and it shall be holy; And the house of Jacob shall regain their possessions.
18 १८ याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.
And the house of Jacob shall be a fire, And the house of Joseph a flame, And the house of Esau stubble, And they shall kindle them and devour them. And there shall be none remaining of the house of Esau; For Jehovah hath spoken it.
19 १९ नेगेबचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राइमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील, बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
And they of the south shall possess the mountain of Esau, And they of the plain, the Philistines; And they shall possess the fields of Ephraim, And the fields of Samaria; And Benjamin shall possess Gilead.
20 २० इस्राएल लोकांच्या या सैन्यातील जे बंदिवान झालेले लोक, ते कनान्यांचे सारफथापर्यंतचे प्रदेश आपल्या ताब्यात घेतील, आणि यरूशलेमचे जे बंदिवान सफारदात आहेत ते नेगेबची गावे घेतील.
And the captives of this host of the sons of Israel shall possess the land of the Canaanites unto Sarepta, And the captives of Jerusalem which are at Sepharad shall possess the cities of the south.
21 २१ आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.
And saviors shall go up to mount Zion, To rule the mount of Esau. And the kingdom shall be Jehovah's.