< गणना 9 >

1 मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला,
Ngenyanga yakuqala ngomnyaka wesibili ngemva kokuphuma kwabo eGibhithe uThixo wakhuluma loMosi enkangala yaseSinayi, wathi,
2 “इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
“Yenza abako-Israyeli bagcine iPhasika ngesikhathi esimisiweyo.
3 या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”
Gcinani umkhosi walo ngesikhathi esimisiweyo, kusihlwa ngosuku lwetshumi lane lwayonale inyanga, ngokwezimiso kanye lemithetho yawo.”
4 मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
Ngakho uMosi watshela abako-Israyeli ukuthi bagcine iPhasika,
5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
benza njalo kusihlwa ngosuku lwetshumi lane lwenyanga yakuqala enkangala yaseSinayi. Abako-Israyeli benza konke njengokulaywa kukaMosi nguThixo.
6 त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.
Kodwa abanye babo abazange bagcine iPhasika ngalolosuku ngoba babengcolile ngokomkhuba ngenxa yesidumbu. Ngakho beza kuMosi lo-Aroni ngalolosuku
7 ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?”
bathi kuMosi, “Sesingcolile ngenxa yesidumbu, kambe kungani sinqatshelwa ukwethula umnikelo kaThixo kanye labanye bako-Israyeli ngesikhathi esimisiweyo na?”
8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”
UMosi wabaphendula wathi, “Manini, ukuze ngizwe ukuthi uThixo uzakuthini ngani.”
9 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Ngakho uThixo wathi kuMosi,
10 १० तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा.
“Tshono kwabako-Israyeli uthi: ‘Nxa omunye wenu loba ubani wakini kumbe izizukulwane zenu ezingcoliswe yisidumbu kumbe ethethe uhambo, angagcina iPhasika likaThixo.
11 ११ त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा.
Bangagcina lumkhosi kusihlwa ngosuku lwetshumi lane lwenyanga yesibili. Kabadle iwundlu, kanye lesinkwa esingelamvubelo lemibhida ebabayo.
12 १२ त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत.
Bangatshiyi lutho lwakho kuze kuse kumbe ukwephula loba yiliphi lamathambo alo. Nxa begcina iPhasika, kabalandele yonke imithetho yalo.
13 १३ परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.
Kodwa nxa umuntu ehlambulukile ngokomkhuba njalo engekho ohanjweni ehluleke ukugcina iPhasika, lowomuntu kasuswe ebantwini bakibo ngoba engethulanga umnikelo kaThixo ngesikhathi esimisiweyo. Lowomuntu uzathwala umlandu wesono sakhe.
14 १४ जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.
Owezizweni ohlala phakathi kwenu ofuna ukugcina iPhasika likaThixo kakwenze ngokwezimiso kanye lemithetho yalo. Wobani lezimiso zinye kowezizweni kanye lowakini.’”
15 १५ ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला.
Ngosuku okwamiswa ngalo ithabanikeli, ithente lobuFakazi lamiswa, iyezi lalisibekela. Kusukela kusihlwa kwaze kwasa iyezi elaliphezu kwethabanikeli lalinjengomlilo.
16 १६ अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे.
Laqhubeka linjalo; lembeswe liyezi, ebusuku lalinjengomlilo.
17 १७ जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत.
Kwakusithi iyezi lingaphakama lisuka phezu kwethente, abako-Israyeli labo babesuka bahambe kuthi lapho elima khona, abako-Israyeli bamise izihonqo zabo khona.
18 १८ परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत.
Abako-Israyeli babesuka bahambe ngokulaya kukaThixo, kuthi njalo ngokulaya kwakhe bamise izihonqo zabo. Ngesikhathi sonke iyezi limi phezu kwethabanikeli, abako-Israyeli bahlala ezihonqweni zabo.
19 १९ जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.
Lapho iyezi lihlala isikhathi eside phezu kwethabanikeli, abako-Israyeli bamlalela uThixo abaze bahamba.
20 २० काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत.
Kwesinye isikhathi iyezi lalisima phezu kwethabanikeli okwezinsukwana nje kuphela; ngokulaya kukaThixo babehlala ezihonqweni khonapho, kuthi njalo ngokulaya kwakhe basuke bahambe.
21 २१ काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की, ते एकसारखा प्रवास करीत असत.
Kwesinye isikhathi iyezi lalisima kusukela kusihlwa kuze kuse, kuthi nxa lisuka ekuseni, labo bahambe. Kungakhathalekile ukuthi kusemini loba kusebusuku, sonke isikhathi lapho iyezi lisuka babesuka bahambe.
22 २२ जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत.
Loba iyezi lalisima phezu kwethabanikeli okwensuku ezimbili, kumbe okwenyanga eyodwa loba okomnyaka, abako-Israyeli babehlala khonapho ezihonqweni bangasuki; kodwa nxa lingasuka, labo babesuka.
23 २३ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.
Ngokulaya kukaThixo babehlala ezihonqweni, langokulaya kwakhe njalo babesuka bahambe. Balalela okwakutshiwo nguThixo ngokulaya kwakhe ngoMosi.

< गणना 9 >