< गणना 9 >
1 १ मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला,
Und der HERR redete zu Mose in der Wüste Sinai im zweiten Jahr, nachdem sie aus Ägypten gezogen waren, im ersten Monat, und sprach:
2 २ “इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
Laß die Kinder Israel das Passah zur bestimmten Zeit halten!
3 ३ या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”
Am vierzehnten Tage dieses Monats, gegen Abend, sollt ihr es halten, zur bestimmten Zeit; nach allen seinen Satzungen und Rechten haltet es.
4 ४ मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
Und Mose redete mit den Kindern Israel, daß sie das Passah hielten.
5 ५ तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
Und sie hielten das Passah am vierzehnten Tage des ersten Monats, gegen Abend, in der Wüste Sinai. Ganz wie der HERR Mose geboten hatte, so taten die Kinder Israel.
6 ६ त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.
Da waren etliche Männer unrein von einem entseelten Menschen, so daß sie das Passah an demselben Tage nicht halten konnten; sie traten vor Mose und Aaron an demselben Tag und sprachen:
7 ७ ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?”
Wir sind unrein von einem entseelten Menschen. Warum sollen wir zu kurz kommen, daß wir des HERRN Opfergabe nicht herzubringen dürfen unter den Kindern Israel zur bestimmten Zeit?
8 ८ मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”
Mose sprach zu ihnen: Wartet, bis ich vernehme, was euch der HERR gebietet!
9 ९ मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Und der HERR redete zu Mose und sprach:
10 १० तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा.
Sage den Kindern Israel und sprich: Wenn jemand von euch oder von euren Nachkommen durch einen Entseelten unrein wird oder fern auf der Reise ist, so soll er gleichwohl dem HERRN das Passah halten.
11 ११ त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा.
Im zweiten Monat, am vierzehnten Tage, gegen Abend, sollen sie es halten und sollen es mit ungesäuertem Brot und bittern Kräutern essen,
12 १२ त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत.
und sollen nichts davon übriglassen bis zum Morgen, auch kein Bein daran zerbrechen; nach der ganzen Passahordnung sollen sie es halten.
13 १३ परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.
Wer aber rein und nicht auf der Reise ist, und läßt es anstehen, das Passah zu halten, eine solche Seele soll ausgerottet werden, weil sie des HERRN Opfergabe nicht zur bestimmten Zeit dargebracht hat; sie soll ihre Sünde tragen!
14 १४ जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.
Und wenn ein Fremdling bei euch wohnt und dem HERRN das Passah halten will, so soll er es nach der Satzung und dem Rechte des Passah halten. Einerlei Satzung soll für euch gelten, für den Fremdling wie für die Landeskinder.
15 १५ ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला.
An dem Tage aber, als die Wohnung aufgerichtet ward, bedeckte die Wolke die Wohnung der Hütte des Zeugnisses, und vom Abend bis zum Morgen war sie über der Wohnung anzusehen wie Feuer.
16 १६ अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे.
So war es beständig; die Wolke bedeckte sie, aber bei Nacht war sie anzusehen wie Feuer.
17 १७ जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत.
Sooft sich die Wolke von der Hütte erhob, brachen die Kinder Israel auf; wo aber die Wolke blieb, da lagerten sich die Kinder Israel.
18 १८ परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत.
Nach dem Gebot des HERRN brachen die Kinder Israel auf, und nach dem Gebot des Herrn lagerten sie sich; solange die Wolke auf der Wohnung blieb, solange lagen sie still.
19 १९ जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.
Und wenn die Wolke viele Tage lang auf der Wohnung verharrte, so beachteten die Kinder Israel den Wink des HERRN und zogen nicht.
20 २० काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत.
Und wenn es vorkam, daß die Wolke nur etliche Tage auf der Wohnung blieb, so lagerten sie sich doch nach dem Gebot des HERRN und zogen nach dem Gebot des HERRN.
21 २१ काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की, ते एकसारखा प्रवास करीत असत.
Und wenn es auch vorkam, daß die Wolke nur vom Abend bis zum Morgen blieb und sich alsdann erhob, so zogen sie; und wenn sie sich des Tages oder des Nachts erhob, so zogen sie auch.
22 २२ जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत.
Wenn sie aber zwei Tage oder einen Monat oder längere Zeit auf der Wohnung verblieb, so lagerten sich die Kinder Israel und zogen nicht; erst wenn sie sich erhob, so zogen sie.
23 २३ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.
Nach dem Befehl des HERRN lagerten sie sich, und nach dem Befehl des HERRN zogen sie; sie achteten auf den Wink des HERRN, gemäß dem Befehl des HERRN, durch Mose.