< गणना 8 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
BWANA akanena na Musa, akamwambia,
2 २ “अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”
“Sema na Haruni umwambie, 'zile taa saba lazima zimulike mbele ya kinara utakapoziwasha,”
3 ३ अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले.
Haruni alifanya haya. Aliziwasha zile taa juu ya kinara ili ziangaze mbele yake kama BWANA alivyomwagiza Musa.
4 ४ दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होताः परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला.
Kinara kilitengenezwa kwa njia hii kama BWANA alivyomwelekeza Musa muundo wake. Kiitakaiwa kutengenezwa kwa dhahabu kuanzia kwenye kitako chake hadi juu, ndivyo kilivyotakiwa kutengenezwa kwa dhahabu kwa maua hadi juu.
5 ५ पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Tena, BWANA akanena na Musa, akasema,
6 ६ लेवींना इस्राएल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर.
'“Uwatwae Walawi kati ya wana wa Israeli na uwatakase.”
7 ७ त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.
Uwafanyie hivi ili kuwatakasa: Uwanyunyizie maji ya utakaso juu yao. Hakikisha wamenyoa miili yao yote, wafue nguo zao, na kwa njia hii wajitakase wenyewe.
8 ८ मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा.
Kisha wachukue fahari mchanga na sadaka ya unga mwembamba uliochanganywa na mafuta. Halafu wachukue fahari mchanga kwa ajili ya sadaka ya dhambi.
9 ९ लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव.
Uwalete Walawi mbele ya hema ya kukutania, na uwakusanye jamii yote ya wana wa Israeli.
10 १० लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
Uwalete Walawi mbele yangu, BWANA. Wana wa Israeli wataweka mikono yao juu ya Walawi.
11 ११ अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे.
Haruni atawatoa Walawi mbele yangu, kuwa sadaka ya kutikiswa. Atafanya hivi ili kwamba Walawi wanitumikie.
12 १२ लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा.
Walawi wataweka mikono yao juu ya hao fahari. Mtatoa fahari mmoja kuwa sadaka ya dhambi na fahari mwingine kuwa sadaka ya kuteketezwa kwangu, ili kuwa upatanisho kwa Walawi.
13 १३ लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.
Walete Walawi mbele ya Haruni na mbele ya wana wake, uwainue kuwa sadaka ya kutikiswa kwa ajili yangu.
14 १४ याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील.
Kwa njia hii utawatenganisha Walawi toka wana wa Israeli. Walawi watakuwa wangu.
15 १५ तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी.
Baadaye Walawi wataingia ndani ya hema ya kukutania. Utawatakasa. utawatoa kuwa sadaka ya kutikiswa
16 १६ हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे.
Fanya hivi kwa sababu wao ni wangu wote kutoka kwa wana wa Israeli. Watachukua nafasi ya kila mzaliwa wa kwanza afunguaye tumbo, mzaliwa wa kwanza wa uzao wa Israeli. Nimewachukua Walawi kwa ajili yangu.
17 १७ इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.
Wazaliwa wa kwanza wote kutoka kwa wana wa Israeli ni wangu, watu wote pamoja na wanyama pia. Siku ile nilipowachukua wazaliwa wa kwanza katika nchi ya Misri, Niliwatenga kwa ajili yangu
18 १८ मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
Nimewachukua Walawi kutoka kwa wana wa Israeli badala ya wazaliwa wa kwanza.
19 १९ अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.
Nimewatoa Walawi kuwa zawadi kwa Haruni na wana wake. Nimewachukua toka wana wa Isreali ili kuwatumikia wana wa Israeli katika hema ya kukutania. Nimewatoa ili kuwa upatanisho kwa watu ili kwamba wasipatwe na mapigo wakati wanapokaribia kwenye eneo takatifu.
20 २० तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले.
Musa, Haruni na jamii ya Waisraeli wote waliwafanyia Walawi hivi. Walifanya kila kitu ambacho BWANA alikuwa amemwamuru Musa kuhusu Walawi. Wana wa Israeli wakafanya haya pamoja nao.
21 २१ लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
Walawi wakajitakasa wenyewe na kufua mavazi yao, Na Haruni akawatoa kama sadaka ya kutikiswa kwa BWANA na akafanya upatanisho kwao ili kuwatakasa.
22 २२ त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.
Baada ya hayo, Walawi waliingia ndani kufanya utumishi wao katika hema ya kukutania mbele ya Haruni na mbele ya wanawe. Kama BWANA alivyokuwa amemwagiza Musa juu ya Walawi. Waliwahudumia Walawi wote kwa jinsi hii.
23 २३ पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
BWANA akanena na Musa tena, Akasema,
24 २४ जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.
“Haya yote ni kwa ajili ya Walawi ambao wana umri wa miaka ishirini na mitano na zaidi. Wataungana na wale wanaohudumia hekaluni.
25 २५ त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे.
Wataacha kutoa huduma hii watakapokuwa na umri wa miaka hamsini. Katika umri huu hawatakiwi kuendelea na huduma tena.
26 २६ त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.
Wanaweza kuwasaidia ndugu zao wanaoendelea kufanya kazi ndani ya hema ya kukutania, lakini hawatakiwai kufanya kazi tena. Utawaelekeza Walawi kuyafahamu haya yote.”