< गणना 7 >
1 १ ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
၁မောရှေသည်တဲတော်ကိုတည်ဆောက်ပြီး သောနေ့တွင် တဲတော်နှင့်သက်ဆိုင်ရာပစ္စည်း များကိုလည်းကောင်း၊ ယဇ်ပလ္လင်နှင့်သက်ဆိုင် သောပစ္စည်းများကိုလည်းကောင်း ဘိသိက်ဆီ လောင်း၍ထာဝရဘုရားအားဆက်ကပ် လေသည်။-
2 २ त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
၂ထိုနောက်သန်းခေါင်စာရင်းကောက်ရာ၌ကြီး ကြပ်ဆောင်ရွက်ခဲ့သည့် ဣသရေလအနွယ် ခေါင်းဆောင်များဖြစ်ကြသောမိသားစု အကြီးအကဲတို့သည်၊-
3 ३ त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या.
၃ထာဝရဘုရားထံတော်သို့ပူဇော်သကာ များကိုယူဆောင်ခဲ့ကြ၏။ ခေါင်းဆောင်တစ် ဦးလျှင်နွားထီးတစ်ကောင်ကျနှင့်ခေါင်း ဆောင်နှစ်ဦးလျှင် လှည်းတစ်စီးကျစုစု ပေါင်းလှည်းခြောက်စီးနှင့်နွားတစ်ဆယ့် နှစ်ကောင်တို့ကိုထာဝရဘုရားအား ဆက်သကြသည်။-
4 ४ मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
၄ယင်းသို့ဆက်သပြီးနောက်ထာဝရဘုရား သည်မောရှေအား၊-
5 ५ “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.”
၅``သင်သည်တဲတော်နှင့်ဆိုင်သောအမှုကို ဆောင်ရွက်ရန် ဤလှူဖွယ်ပစ္စည်းတို့ကိုလက်ခံ လော့။ လေဝိအနွယ်ဝင်တို့ဆောင်ရွက်ရမည့် လုပ်ငန်းအလိုက် ထိုလှူဖွယ်ပစ္စည်းတို့ကိုသူ တို့အားပေးအပ်လော့'' ဟုမိန့်တော်မူ၏။-
6 ६ मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
၆ထို့ကြောင့်မောရှေသည်လှည်းနှင့်နွားများ ကို လေဝိအနွယ်ဝင်တို့အားပေးအပ်လေ သည်။-
7 ७ त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
၇သူသည်လှည်းနှစ်စီးနှင့်နွားလေးကောင်ကို ဂေရရှုန်သားချင်းစုတို့အားလည်းကောင်း၊-
8 ८ त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.
၈လှည်းလေးစီးနှင့်နွားရှစ်ကောင်ကို မေရာရိ သားချင်းစုတို့အားလည်းကောင်းပေးအပ် လေသည်။ သူတို့သည်အလုပ်ရှိသမျှကို အာရုန်၏သား ဣသမာညွှန်ကြားသည့် အတိုင်းဆောင်ရွက်ရကြသည်။-
9 ९ परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
၉ကောဟတ်သားချင်းစုတို့သည် မိမိတို့ကြည့် ရှုထိန်းသိမ်းရသောတဲတော်ဆိုင်ရာပစ္စည်း များကို ပခုံးပေါ်တွင်ထမ်းရသောကြောင့် မောရှေသည်သူတို့အတွက်လှည်းနှင့် နွားများကိုမပေးအပ်ချေ။
10 १० मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
၁၀ဣသရေလခေါင်းဆောင်တို့ယဇ်ပလ္လင်ကို အနုမောဒနာပြုရာ၌လည်းပူဇော်သကာ များကိုယူဆောင်ခဲ့ကြသည်။ သူတို့သည် ယဇ်ပလ္လင်၌လှူဖွယ်ပစ္စည်းများကို ဆက်သ ရန်အသင့်ရှိသောအခါ၊-
11 ११ परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
၁၁ထာဝရဘုရားကမောရှေအား``ယဇ်ပလ္လင် ကိုအနုမောဒနာပြုရာ၌ခေါင်းဆောင်တစ် ဆယ့်နှစ်ဦးတို့သည် တစ်ဦးလျှင်တစ်ရက်ကျ အလှည့်ယူ၍မိမိတို့၏လှူဖွယ်ပစ္စည်းများ ကိုဆက်သစေရမည်'' ဟုမိန့်တော်မူ၏။
12 १२ पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၁၂သို့ဖြစ်၍သူတို့သည် မိမိတို့၏ပူဇော် သကာများကို အောက်တွင်ဖော်ပြပါ အစီအစဉ်အတိုင်းဆက်သကြ၏။ ရက် အနွယ် ခေါင်းဆောင် ပထမရက် ယုဒ အမိနဒပ်၏သားနာရှုန် ဒုတိယရက် ဣသခါ ဇုအာ၏သားနာသနေလ တတိယရက် ဇာဗုလုန် ဟေလုန်၏သားဧလျာဘ စတုတ္ထရက် ရုဗင် ရှေဒုရ၏သားဧလိဇုရ ပဉ္စမရက် ရှိမောင် ဇုရိရှဒ္ဒဲ၏သားရှေလုမျေလ ဆဋ္ဌမရက် ဂဒ် ဒွေလ၏သားဧလျာသပ် သတ္တမရက် ဧဖရိမ် အမိဟုဒ်၏သားဧလိရှမာ အဋ္ဌမရက် မနာရှေ ပေဒါဇုရ၏သား ဂါမလျေလ နဝမရက် ဗင်္ယာမိန် ဂိဒေါနိ၏သားအဘိဒန် ဒသမရက် ဒန် အမိရှဒ္ဒဲ၏သားအဟေဇာ ဧကဒသမရက် အာရှာ သြကရန်၏သားပါဂျေလ ဒွါဒသမရက် နဿလိ ဧနန်၏သားအဟိရ သူတို့တစ်ဦးစီဆက်သသောပူဇော်သကာ များသည် ထပ်တူထပ်မျှဖြစ်၏။ ယင်းတို့မှာ တရားဝင်ချင်တွယ်နည်းအရအောင်စငါး ဆယ်အလေးချိန်ရှိ ငွေဖလားတစ်လုံးနှင့် အောင်စသုံးဆယ်အလေးချိန်ရှိငွေအင်တုံ တစ်လုံး (ယင်းငွေခွက်နှစ်ခုစလုံးတွင် ဘောဇဉ် သကာအတွက်ဆီနှင့်ရောသောမုန့်ညက်အပြည့် ပါရှိသည်။) နံ့သာပေါင်းအပြည့်ရှိသော အလေးချိန်လေးအောင်စရှိရွှေလင်ပန်း တစ်ချပ်၊ မီးရှို့ရာယဇ်အတွက်နွားထီးပေါက် တစ်ကောင်၊ သိုးထီးတစ်ကောင်နှင့်တစ်နှစ်သား သိုးကလေးတစ်ကောင်၊ အပြစ်ဖြေရာယဇ် အတွက်ဆိတ်တစ်ကောင်၊ မိတ်သဟာယယဇ် အတွက်နွားထီးနှစ်ကောင်၊ သိုးထီးငါး ကောင်၊ ဆိတ်ငါးကောင်နှင့်တစ်နှစ်သားသိုး ကလေးငါးကောင်စသည်တို့ဖြစ်သည်။
13 १३ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၁၃
14 १४ त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.
၁၄
15 १५ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၁၅
16 १६ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၁၆
17 १७ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती.
၁၇
18 १८ दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၁၈
19 १९ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၁၉
20 २० त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၂၀
21 २१ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
၂၁
22 २२ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၂၂
23 २३ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.
၂၃
24 २४ तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၂၄
25 २५ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၂၅
26 २६ त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၂၆
27 २७ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၂၇
28 २८ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၂၈
29 २९ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
၂၉
30 ३० चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၃၀
31 ३१ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၃၁
32 ३२ त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
၃၂
33 ३३ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
၃၃
34 ३४ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၃၄
35 ३५ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
၃၅
36 ३६ पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၃၆
37 ३७ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၃၇
38 ३८ त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
၃၈
39 ३९ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၃၉
40 ४० त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၄၀
41 ४१ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते.
၄၁
42 ४२ सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၄၂
43 ४३ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
၄၃
44 ४४ त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၄၄
45 ४५ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၄၅
46 ४६ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၄၆
47 ४७ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
၄၇
48 ४८ सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၄၈
49 ४९ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၄၉
50 ५० त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၅၀
51 ५१ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၅၁
52 ५२ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၅၂
53 ५३ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.
၅၃
54 ५४ आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၅၄
55 ५५ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၅၅
56 ५६ त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၅၆
57 ५७ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၅၇
58 ५८ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၅၈
59 ५९ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.
၅၉
60 ६० नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၆၀
61 ६१ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၆၁
62 ६२ त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၆၂
63 ६३ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၆၃
64 ६४ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၆၄
65 ६५ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
၆၅
66 ६६ दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၆၆
67 ६७ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၆၇
68 ६८ त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၆၈
69 ६९ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၆၉
70 ७० त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၇၀
71 ७१ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
၇၁
72 ७२ अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၇၂
73 ७३ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၇၃
74 ७४ त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၇၄
75 ७५ त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
၇၅
76 ७६ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၇၆
77 ७७ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते.
၇၇
78 ७८ बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
၇၈
79 ७९ त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
၇၉
80 ८० त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
၈၀
81 ८१ त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
၈၁
82 ८२ त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
၈၂
83 ८३ त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.
၈၃
84 ८४ मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
၈၄ယဇ်ပလ္လင်ကိုအနုမောဒနာပြုရာ၌ ဣသ ရေလအမျိုးခေါင်းဆောင်တစ်ဆယ့်နှစ်ဦး တို့ယူဆောင်ခဲ့ကြသောလှူဖွယ်ပစ္စည်းစုစု ပေါင်းမှာ၊ -အလေးချိန်စုစုပေါင်းပေါင်ခြောက်ဆယ်ရှိသော ငွေဖလားတစ်ဆယ့်နှစ်လုံးနှင့်ငွေအင်တုံတစ် ဆယ့်နှစ်လုံး၊ -နံ့သာပေါင်းအပြည့်ရှိသောအလေးချိန် စုစုပေါင်းလေးဆယ့်ရှစ်အောင်စရှိရွှေလင် ပန်းတစ်ဆယ့်နှစ်ချပ်၊ -မီးရှို့ရာယဇ်အတွက်နွားထီးတစ်ဆယ့်နှစ် ကောင်၊ သိုးထီးတစ်ဆယ့်နှစ်ကောင်၊ တစ်နှစ်သား သိုးကလေးတစ်ဆယ့်နှစ်ကောင်နှင့် ယင်းတို့ နှင့်သက်ဆိုင်သောဘောဇဉ်သကာများ၊ -အပြစ်ဖြေရာယဇ်အတွက်ဆိတ်တစ်ဆယ့် နှစ်ကောင်။ -မိတ်သဟာယယဇ်အတွက်နွားထီးနှစ်ဆယ့် လေးကောင်၊သိုးထီးအကောင်ခြောက်ဆယ်၊ဆိတ် အကောင်ခြောက်ဆယ်၊တစ်နှစ်သားသိုးကလေး အကောင်ခြောက်ဆယ်စသည်တို့ဖြစ်ကြသည်။
85 ८५ प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
၈၅
86 ८६ धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.
၈၆
87 ८७ त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
၈၇
88 ८८ शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली.
၈၈
89 ८९ जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.
၈၉မောရှေသည်ထာဝရဘုရားအားလျှောက် ထားရန်တဲတော်ထဲသို့ဝင်သောအခါ ပဋိ ညာဉ်သေတ္တာအဖုံးအထက်ခေရုဗိမ်ရုပ်နှစ်ခု ကြားမှထာဝရဘုရားမိန့်တော်မူသံကို ကြားရလေသည်။