< गणना 6 >

1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
फिर ख़ुदावन्द ने मूसा से कहा कि;
2 इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा विशेष नवस करील,
'बनी — इस्राईल से कह कि जब कोई मर्द या 'औरत नज़ीर की मिन्नत, या'नी अपने आप को ख़ुदावन्द के लिए अलग रखने की ख़ास मिन्नत माने,
3 त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.
तो वह मय और शराब से परहेज़ करे, और मय का या शराब का सिरका न पिए और न अंगूर का रस पिए और न ताज़ा या ख़ुश्क अंगूर खाए।
4 तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये.
और अपनी नज़ारत के तमाम दिनों में बीज से लेकर छिल्के तक जो कुछ अंगूर के दरख़्त में पैदा हो उसे न खाए।
5 त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत.
'और उसकी नज़ारत की मिन्नत के दिनों में उसके सिर पर उस्तरा न फेरा जाए; जब तक वह मुद्दत जिसके लिए वह ख़ुदावन्द का नज़ीर बना है पूरी न हो, तब तक वह पाक रहे और अपने सिर के बालों की लटों को बढ़ने दे।
6 त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
उन तमाम दिनों में जब वह ख़ुदावन्द का नज़ीर हो वह किसी लाश के नज़दीक न जाए।
7 त्याच्या स्वत: चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील.
वह अपने बाप या माँ या भाई या बहन की ख़ातिर भी जब वह मरें, अपने आप को नजिस न करे। क्यूँकि उसकी नज़ारत जो ख़ुदा के लिए है, उसके सिर पर है।
8 आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे.
वह अपनी नज़ारत की पूरी मुद्दत तक ख़ुदावन्द के लिए पाक है।
9 जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे.
“और अगर कोई आदमी नागहान उसके पास ही मर जाए और उसकी नज़ारत के सिर को नापाक कर दे, तो वह अपने पाक होने के दिन अपना सिर मुण्डवाए, या'नी सातवें दिन सिर मुण्डवाए।
10 १० आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत.
और आठवें दिन दो कुमरियाँ या कबूतर के दो बच्चे ख़ेमा — ए — इजितमा'अ के दरवाज़े पर काहिन के पास लाए।
11 ११ मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे.
और काहिन एक को ख़ता की क़ुर्बानी के लिए और दूसरे को सोख़्तनी क़ुर्बानी के लिए पेश करे और उसके लिए कफ़्फ़ारा दे, क्यूँकि वह मुर्दे की वजह से गुनहगार ठहरा है; और उसके सिर को उसी दिन पाक करे।
12 १२ त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत: ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.
फिर वह अपनी नज़ारत की मुद्दत को ख़ुदावन्द के लिए पाक करे, और एक यकसाला नर बर्रा जुर्म की क़ुर्बानी के लिए लाए; लेकिन जो दिन गुज़र गए हैं वह गिने नहीं जाएँगे क्यूँकि उसकी नज़ारत नापाक हो गई थी।
13 १३ मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.
'और नज़ीर के लिए शरा' यह है, कि जब उसकी नज़ारत के दिन पूरे हो जाएँ तो वह ख़ेमा — ए — इजितमा'अ के दरवाज़े पर हाज़िर किया जाए।
14 १४ त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
और वह ख़ुदावन्द के सामने अपना चढ़ावा चढ़ाए, या'नी सोख़्तनी क़ुर्बानी के लिए एक बे — 'ऐब यक — साला नर बर्रा, और ख़ता की क़ुर्बानी के लिए एक बे — 'ऐब यक — साला मादा बर्रा, और सलामती की क़ुर्बानी के लिए एक बे — 'ऐब मेंढा,
15 १५ त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.
और बेख़मीरी रोटियों की एक टोकरी, और तेल मिले हुए मैदे के कुल्चे, और तेल चुपड़ी हुई बे — ख़मीरी रोटियाँ, और उनकी नज़्र की कुर्बानी, और उनके तपावन लाए।
16 १६ याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वरास अर्पावेत;
और काहिन उनको ख़ुदावन्द के सामने ला कर उसकी तरफ़ से ख़ता की क़ुर्बानी और सोख़्तनी क़ुर्बानी पेश करे।
17 १७ त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी.
और उस मेंढे को बेख़मीरी रोटियों की टोकरी के साथ ख़ुदावन्द के सामने सलामती की क़ुर्बानी के तौर पर पेश करे, और काहिन उसकी नज़्र की क़ुर्बानी और उसका तपावन भी अदा करे।
18 १८ मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.
फिर वह नज़ीर ख़ेमा — ए — इजितमा'अ के दरवाज़े पर अपनी नज़ारत के बाल मुण्डवाए, और नज़ारत के बालों को उस आग में डाल दे जो सलामती की क़ुर्बानी के नीचे होगी।
19 १९ नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.
और जब नज़ीर अपनी नज़ारत के बाल मुण्डवा चुके, तो काहिन उस मेंढे का उबाला हुआ शाना और एक बे — ख़मीरी रोटी टोकरी में से और एक बे — ख़मीरी कुल्चा लेकर उस नज़ीर के हाथों पर उनको धरे।
20 २० मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.
फिर काहिन उनको हिलाने की क़ुर्बानी के तौर पर ख़ुदावन्द के सामने हिलाए। हिलाने की क़ुर्बानी के सीने और उठाने की क़ुर्बानी के शाने के साथ यह भी काहिन के लिए पाक हैं। इसके बाद नज़ीर मय पी सकेगा।
21 २१ “जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वरास अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.”
“नज़ीर जो मिन्नत माने और जो चढ़ावा अपनी नज़ारत के लिए ख़ुदावन्द के सामने लाये 'अलावा उसके जिसका उसे मक़दूर हो उन सभों के बारे में शरा' यह है। जैसी मिन्नत उसने मानी हो वैसा ही उसको नज़ारत की शरा' के मुताबिक़ 'अमल करना पड़ेगा।”
22 २२ पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
और ख़ुदावन्द ने मूसा से कहा कि;
23 २३ अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे.
“हारून और उसके बेटों से कह कि तुम बनी — इस्राईल को इस तरह दुआ दिया करना। तुम उनसे कहना:
24 २४ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो.
'ख़ुदावन्द तुझे बरकत दे और तुझे महफ़ूज़ रख्खें।
25 २५ परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो.
“ख़ुदावन्द अपना चेहरा तुझ पर जलवागर फ़रमाए, और तुझ पर मेहरबान रहे।
26 २६ परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
“ख़ुदावन्द अपना चेहरा तेरी तरफ़ मुतवज्जिह करे, और तुझे सलामती बख़्शे।
27 २७ याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन.
“इस तरह वह मेरे नाम को बनी — इस्राईल पर रख्खें और मैं उनको बरकत बख़्शूँगा।”

< गणना 6 >