< गणना 5 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Locutusque est Dominus ad Moysen, dicens:
2 २ “इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;
Præcipe filiis Israël, ut ejiciant de castris omnem leprosum, et qui semine fluit, pollutusque est super mortuo:
3 ३ मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहत आहे.”
tam masculum quam feminam ejicite de castris, ne contaminent ea cum habitaverint vobiscum.
4 ४ तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांस छावणीबाहेर काढून टाकले.
Feceruntque ita filii Israël, et ejecerunt eos extra castra, sicut locutus erat Dominus Moysi.
5 ५ परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Locutusque est Dominus ad Moysen, dicens:
6 ६ इस्राएल लोकांस हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
Loquere ad filios Israël: Vir, sive mulier, cum fecerint ex omnibus peccatis, quæ solent hominibus accidere, et per negligentiam transgressi fuerint mandatum Domini, atque deliquerint,
7 ७ तेव्हा त्या मनुष्याने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्यास ती सर्व द्यावी.
confitebuntur peccatum suum, et reddent ipsum caput, quintamque partem desuper, ei in quem peccaverint.
8 ८ पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
Sin autem non fuerit qui recipiat, dabunt Domino, et erit sacerdotis, excepto ariete, qui offertur pro expiatione, ut sit placabilis hostia.
9 ९ “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
Omnes quoque primitiæ, quas offerunt filii Israël, ad sacerdotem pertinent:
10 १० प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.”
et quidquid in sanctuarium offertur a singulis, et traditur manibus sacerdotis, ipsius erit.
11 ११ मग परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Locutusque est Dominus ad Moysen, dicens:
12 १२ इस्राएल लोकांस असे सांग की एखाद्या मनुष्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला.
Loquere ad filios Israël, et dices ad eos: Vir cujus uxor erraverit, maritumque contemnens
13 १३ म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
dormierit cum altero viro, et hoc maritus deprehendere non quiverit, sed latet adulterium, et testibus argui non potest, quia non est inventa in stupro:
14 १४ आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली.
si spiritus zelotypiæ concitaverit virum contra uxorem suam, quæ vel polluta est, vel falsa suspicione appetitur:
15 १५ जर असे झाले, तर त्या मनुष्याने आपल्या पत्नीला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय.
adducet eam ad sacerdotem, et offeret oblationem pro illa, decimam partem sati farinæ hordeaceæ: non fundet super eam oleum, nec imponet thus: quia sacrificium zelotypiæ est, et oblatio investigans adulterium.
16 १६ याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
Offeret igitur eam sacerdos, et statuet coram Domino,
17 १७ मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी.
assumetque aquam sanctam in vase fictili, et pauxillum terræ de pavimento tabernaculi mittet in eam.
18 १८ याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;
Cumque steterit mulier in conspectu Domini, discooperiet caput ejus, et ponet super manus illius sacrificium recordationis, et oblationem zelotypiæ: ipse autem tenebit aquas amarissimas, in quibus cum execratione maledicta congessit.
19 १९ मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो.
Adjurabitque eam, et dicet: Si non dormivit vir alienus tecum, et si non polluta es deserto mariti thoro, non te nocebunt aquæ istæ amarissimæ, in quas maledicta congessi.
20 २० परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस.
Sin autem declinasti a viro tuo, atque polluta es, et concubuisti cum altero viro:
21 २१ मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.
his maledictionibus subjacebis: det te Dominus in maledictionem, exemplumque cunctorum in populo suo: putrescere faciat femur tuum, et tumens uterus tuus disrumpatur.
22 २२ याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी व मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे.
Ingrediantur aquæ maledictæ in ventrem tuum, et utero tumescente putrescat femur. Et respondebit mulier: Amen, amen.
23 २३ मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते कडू पाण्यात धुवावे.
Scribetque sacerdos in libello ista maledicta, et delebit ea aquis amarissimis, in quas maledicta congessit,
24 २४ मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.
et dabit ei bibere. Quas cum exhauserit,
25 २५ नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.
tollet sacerdos de manu ejus sacrificium zelotypiæ, et elevabit illud coram Domino, imponetque illud super altare, ita dumtaxat ut prius:
26 २६ मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे.
pugillum sacrificii tollat de eo, quod offertur, et incendat super altare: et sic potum det mulieri aquas amarissimas.
27 २७ जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध अपराध केला असेल तर शापजनक पाणी पाजल्यावर ते तिच्या पोटात जाईल व कडूपणा उत्पन्न करील. तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल तिच्या लोकात तिचे नाव शापित होईल.
Quas cum biberit, si polluta est, et contempto viro adulterii rea, pertransibunt eam aquæ maledictionis, et inflato ventre, computrescet femur: eritque mulier in maledictionem, et in exemplum omni populo.
28 २८ परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.
Quod si polluta non fuerit, erit innoxia, et faciet liberos.
29 २९ तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
Ista est lex zelotypiæ. Si declinaverit mulier a viro suo, et si polluta fuerit,
30 ३० किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या मनुष्याने अशी कारवाई करावी; त्या मनुष्याने स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी.
maritusque zelotypiæ spiritu concitatus adduxerit eam in conspectu Domini, et fecerit ei sacerdos juxta omnia quæ scripta sunt:
31 ३१ मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.
maritus absque culpa erit, et illa recipiet iniquitatem suam.