< गणना 5 >

1 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
2 “इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;
צַו אֶת־בְּנֵי יִשְׂרָאֵל וִֽישַׁלְּחוּ מִן־הַֽמַּחֲנֶה כׇּל־צָרוּעַ וְכׇל־זָב וְכֹל טָמֵא לָנָֽפֶשׁ׃
3 मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहत आहे.”
מִזָּכָר עַד־נְקֵבָה תְּשַׁלֵּחוּ אֶל־מִחוּץ לַֽמַּחֲנֶה תְּשַׁלְּחוּם וְלֹא יְטַמְּאוּ אֶת־מַחֲנֵיהֶם אֲשֶׁר אֲנִי שֹׁכֵן בְּתוֹכָֽם׃
4 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांस छावणीबाहेर काढून टाकले.
וַיַּֽעֲשׂוּ־כֵן בְּנֵי יִשְׂרָאֵל וַיְשַׁלְּחוּ אוֹתָם אֶל־מִחוּץ לַֽמַּחֲנֶה כַּאֲשֶׁר דִּבֶּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה כֵּן עָשׂוּ בְּנֵי יִשְׂרָאֵֽל׃
5 परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
6 इस्राएल लोकांस हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
דַּבֵּר אֶל־בְּנֵי יִשְׂרָאֵל אִישׁ אֽוֹ־אִשָּׁה כִּי יַעֲשׂוּ מִכׇּל־חַטֹּאת הָֽאָדָם לִמְעֹל מַעַל בַּיהֹוָה וְאָֽשְׁמָה הַנֶּפֶשׁ הַהִֽוא׃
7 तेव्हा त्या मनुष्याने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्यास ती सर्व द्यावी.
וְהִתְוַדּוּ אֶֽת־חַטָּאתָם אֲשֶׁר עָשׂוּ וְהֵשִׁיב אֶת־אֲשָׁמוֹ בְּרֹאשׁוֹ וַחֲמִישִׁתוֹ יֹסֵף עָלָיו וְנָתַן לַאֲשֶׁר אָשַׁם לֽוֹ׃
8 पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
וְאִם־אֵין לָאִישׁ גֹּאֵל לְהָשִׁיב הָאָשָׁם אֵלָיו הָאָשָׁם הַמּוּשָׁב לַיהֹוָה לַכֹּהֵן מִלְּבַד אֵיל הַכִּפֻּרִים אֲשֶׁר יְכַפֶּר־בּוֹ עָלָֽיו׃
9 “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
וְכׇל־תְּרוּמָה לְכׇל־קׇדְשֵׁי בְנֵי־יִשְׂרָאֵל אֲשֶׁר־יַקְרִיבוּ לַכֹּהֵן לוֹ יִהְיֶֽה׃
10 १० प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.”
וְאִישׁ אֶת־קֳדָשָׁיו לוֹ יִהְיוּ אִישׁ אֲשֶׁר־יִתֵּן לַכֹּהֵן לוֹ יִהְיֶֽה׃
11 ११ मग परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
12 १२ इस्राएल लोकांस असे सांग की एखाद्या मनुष्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला.
דַּבֵּר אֶל־בְּנֵי יִשְׂרָאֵל וְאָמַרְתָּ אֲלֵהֶם אִישׁ אִישׁ כִּֽי־תִשְׂטֶה אִשְׁתּוֹ וּמָעֲלָה בוֹ מָֽעַל׃
13 १३ म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
וְשָׁכַב אִישׁ אֹתָהּ שִׁכְבַת־זֶרַע וְנֶעְלַם מֵעֵינֵי אִישָׁהּ וְנִסְתְּרָה וְהִיא נִטְמָאָה וְעֵד אֵין בָּהּ וְהִוא לֹא נִתְפָּֽשָׂה׃
14 १४ आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली.
וְעָבַר עָלָיו רֽוּחַ־קִנְאָה וְקִנֵּא אֶת־אִשְׁתּוֹ וְהִוא נִטְמָאָה אוֹ־עָבַר עָלָיו רֽוּחַ־קִנְאָה וְקִנֵּא אֶת־אִשְׁתּוֹ וְהִיא לֹא נִטְמָֽאָה׃
15 १५ जर असे झाले, तर त्या मनुष्याने आपल्या पत्नीला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय.
וְהֵבִיא הָאִישׁ אֶת־אִשְׁתּוֹ אֶל־הַכֹּהֵן וְהֵבִיא אֶת־קׇרְבָּנָהּ עָלֶיהָ עֲשִׂירִת הָאֵיפָה קֶמַח שְׂעֹרִים לֹֽא־יִצֹק עָלָיו שֶׁמֶן וְלֹֽא־יִתֵּן עָלָיו לְבֹנָה כִּֽי־מִנְחַת קְנָאֹת הוּא מִנְחַת זִכָּרוֹן מַזְכֶּרֶת עָוֺֽן׃
16 १६ याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
וְהִקְרִיב אֹתָהּ הַכֹּהֵן וְהֶֽעֱמִדָהּ לִפְנֵי יְהֹוָֽה׃
17 १७ मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी.
וְלָקַח הַכֹּהֵן מַיִם קְדֹשִׁים בִּכְלִי־חָרֶשׂ וּמִן־הֶֽעָפָר אֲשֶׁר יִהְיֶה בְּקַרְקַע הַמִּשְׁכָּן יִקַּח הַכֹּהֵן וְנָתַן אֶל־הַמָּֽיִם׃
18 १८ याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;
וְהֶעֱמִיד הַכֹּהֵן אֶֽת־הָאִשָּׁה לִפְנֵי יְהֹוָה וּפָרַע אֶת־רֹאשׁ הָֽאִשָּׁה וְנָתַן עַל־כַּפֶּיהָ אֵת מִנְחַת הַזִּכָּרוֹן מִנְחַת קְנָאֹת הִוא וּבְיַד הַכֹּהֵן יִהְיוּ מֵי הַמָּרִים הַמְאָֽרְרִֽים׃
19 १९ मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो.
וְהִשְׁבִּיעַ אֹתָהּ הַכֹּהֵן וְאָמַר אֶל־הָֽאִשָּׁה אִם־לֹא שָׁכַב אִישׁ אֹתָךְ וְאִם־לֹא שָׂטִית טֻמְאָה תַּחַת אִישֵׁךְ הִנָּקִי מִמֵּי הַמָּרִים הַֽמְאָרְרִים הָאֵֽלֶּה׃
20 २० परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस.
וְאַתְּ כִּי שָׂטִית תַּחַת אִישֵׁךְ וְכִי נִטְמֵאת וַיִּתֵּן אִישׁ בָּךְ אֶת־שְׁכׇבְתּוֹ מִֽבַּלְעֲדֵי אִישֵֽׁךְ׃
21 २१ मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.
וְהִשְׁבִּיעַ הַכֹּהֵן אֶֽת־הָאִשָּׁה בִּשְׁבֻעַת הָאָלָה וְאָמַר הַכֹּהֵן לָֽאִשָּׁה יִתֵּן יְהֹוָה אוֹתָךְ לְאָלָה וְלִשְׁבֻעָה בְּתוֹךְ עַמֵּךְ בְּתֵת יְהֹוָה אֶת־יְרֵכֵךְ נֹפֶלֶת וְאֶת־בִּטְנֵךְ צָבָֽה׃
22 २२ याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी व मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे.
וּבָאוּ הַמַּיִם הַמְאָרְרִים הָאֵלֶּה בְּֽמֵעַיִךְ לַצְבּוֹת בֶּטֶן וְלַנְפִּל יָרֵךְ וְאָמְרָה הָאִשָּׁה אָמֵן ׀ אָמֵֽן׃
23 २३ मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते कडू पाण्यात धुवावे.
וְכָתַב אֶת־הָאָלֹת הָאֵלֶּה הַכֹּהֵן בַּסֵּפֶר וּמָחָה אֶל־מֵי הַמָּרִֽים׃
24 २४ मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.
וְהִשְׁקָה אֶת־הָאִשָּׁה אֶת־מֵי הַמָּרִים הַמְאָֽרְרִים וּבָאוּ בָהּ הַמַּיִם הַֽמְאָרְרִים לְמָרִֽים׃
25 २५ नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.
וְלָקַח הַכֹּהֵן מִיַּד הָֽאִשָּׁה אֵת מִנְחַת הַקְּנָאֹת וְהֵנִיף אֶת־הַמִּנְחָה לִפְנֵי יְהֹוָה וְהִקְרִיב אֹתָהּ אֶל־הַמִּזְבֵּֽחַ׃
26 २६ मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे.
וְקָמַץ הַכֹּהֵן מִן־הַמִּנְחָה אֶת־אַזְכָּרָתָהּ וְהִקְטִיר הַמִּזְבֵּחָה וְאַחַר יַשְׁקֶה אֶת־הָאִשָּׁה אֶת־הַמָּֽיִם׃
27 २७ जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध अपराध केला असेल तर शापजनक पाणी पाजल्यावर ते तिच्या पोटात जाईल व कडूपणा उत्पन्न करील. तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल तिच्या लोकात तिचे नाव शापित होईल.
וְהִשְׁקָהּ אֶת־הַמַּיִם וְהָיְתָה אִֽם־נִטְמְאָה וַתִּמְעֹל מַעַל בְּאִישָׁהּ וּבָאוּ בָהּ הַמַּיִם הַמְאָֽרְרִים לְמָרִים וְצָבְתָה בִטְנָהּ וְנָפְלָה יְרֵכָהּ וְהָיְתָה הָאִשָּׁה לְאָלָה בְּקֶרֶב עַמָּֽהּ׃
28 २८ परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.
וְאִם־לֹא נִטְמְאָה הָֽאִשָּׁה וּטְהֹרָה הִוא וְנִקְּתָה וְנִזְרְעָה זָֽרַע׃
29 २९ तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
זֹאת תּוֹרַת הַקְּנָאֹת אֲשֶׁר תִּשְׂטֶה אִשָּׁה תַּחַת אִישָׁהּ וְנִטְמָֽאָה׃
30 ३० किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या मनुष्याने अशी कारवाई करावी; त्या मनुष्याने स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी.
אוֹ אִישׁ אֲשֶׁר תַּעֲבֹר עָלָיו רוּחַ קִנְאָה וְקִנֵּא אֶת־אִשְׁתּוֹ וְהֶעֱמִיד אֶת־הָֽאִשָּׁה לִפְנֵי יְהֹוָה וְעָשָׂה לָהּ הַכֹּהֵן אֵת כׇּל־הַתּוֹרָה הַזֹּֽאת׃
31 ३१ मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.
וְנִקָּה הָאִישׁ מֵעָוֺן וְהָאִשָּׁה הַהִוא תִּשָּׂא אֶת־עֲוֺנָֽהּ׃

< गणना 5 >