< गणना 35 >

1 परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
여호와께서 여리고 맞은편 요단 가 모압 평지에서 모세에게 일러 가라사대
2 इस्राएल लोकांस सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांस द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांस द्यावी.
이스라엘 자손에게 명하여 그들의 얻은 기업에서 레위인에게 거할 성읍들을 주게 하고 너희는 또 그 성읍 사면의 들을 레위인에게 주어서
3 लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत.
성읍으로는 그들의 거처가 되게 하고 들로는 그들의 가축과 물산과 짐승들을 둘 곳이 되게 할 것이라
4 आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.
너희가 레위인에게 줄 성읍들의 들은 성벽에서부터 밖으로 사면 이천 규빗이라
5 नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.
성을 중앙에 두고 성 밖 동편으로 이천 규빗, 남편으로 이천 규빗서 편으로 이천 규빗, 북편으로 이천 규빗을 측량할지니 이는 그 들의 성읍의 들이며
6 त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवींना द्या.
너희가 레위인에게 줄 성읍은 살인자로 피케 할 도피성으로 여섯 성읍이요, 그 외에 사십 이 성읍이라
7 म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या.
너희가 레위인에게 모두 사십 팔 성읍을 주고 그 들도 함께 주되
8 इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.
이스라엘 자손의 산업에서 레위인에게 너희가 성읍을 줄 때에 많이 얻은 자에게서는 많이 취하여 주고 적게 얻은 자에게서는 적게 취하여 줄 것이라 각기 얻은 산업을 따라서 그 성읍들을 레위인에게 줄지니라
9 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
여호와께서 또 모세에게 일러 가라사대
10 १० इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.
이스라엘 자손에게 말하여 그들에게 이르라 너희가 요단을 건너 가나안 땅에 들어 가거든
11 ११ तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
너희를 위하여 성읍을 도피성으로 정하여 그릇 살인한 자로 그리로 피하게 하라
12 १२ आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
이는 너희가 보수할 자에게서 도피하는 성을 삼아 살인자가 회중앞에 서서 판결을 받기까지 죽지 않게 하기 위함이니라
13 १३ अशी सहा संरक्षक शहरे असतील.
너희가 줄 성읍 중에 여섯으로 도피성이 되게 하되
14 १४ यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.
세 성읍은 요단 이 편에서 주고 세 성읍은 가나안 땅에서 주어 도피성이 되게 하라
15 १५ ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
이 여섯 성읍은 이스라엘 자손과 타국인과 이스라엘 중에 우거하는 자의 도피성이 되리니 무릇 그릇 살인한 자가 그리로 도피할 수 있으리라
16 १६ जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे.
만일 철 연장으로 사람을 쳐죽이면 이는 고살한 자니 그 고살자를 반드시 죽일 것이요
17 १७ आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.
만일 사람을 죽일 만한 돌을 손에 들고 사람을 쳐죽이면 이는 고살한 자니 그 고살자를 반드시 죽일 것이요
18 १८ आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.
만일 사람을 죽일 만한 나무 연장을 손에 들고 사람을 쳐죽이면 이는 고살한 자니 그 고살자를 반드시 죽일 것이니라
19 १९ मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो.
피를 보수하는 자가 그 고살자를 친히 죽일 것이니 그를 만나거든 죽일 것이요
20 २० मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो.
만일 미워하는 까닭에 밀쳐 죽이거나 기회를 엿보아 무엇을 던져 죽이거나
21 २१ जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या मनुष्यास ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास मारु शकतो.
원한으로 인하여 손으로 쳐죽이면 그 친 자를 반드시 죽일 것이니 이는 고살하였음이라 피를 보수하는 자가 그 고살자를 만나거든 죽일 것이니라
22 २२ एखादा मनुष्य अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या मनुष्याचा त्याने द्वेष केला नाही त्यास त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
원한 없이 우연히 사람을 밀치거나 기회를 엿봄이 없이 무엇을 던지거나
23 २३ किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास न दिसलेल्या मनुष्यास लागला व तो मेला तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
보지 못하고 사람을 죽일 만한 돌을 던져서 죽였다 하자 이는 원한도 없고 해하려 한 것도 아닌즉
24 २४ जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
회중이 친 자와 피를 보수하는 자 간에 이 규례대로 판결하여
25 २५ जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर लोकांनी खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
피를 보수하는 자의 손에서 살인자를 건져내어 그가 피하였던 도피성으로 돌려 보낼 것이요 그는 거룩한 기름 부음을 받은 대제사장의 죽기까지 거기 거할 것이니라
26 २६ त्या मनुष्याने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या
그러나 살인자가 어느 때든지 그 피하였던 도피성 지경 밖에 나갔다 하자
27 २७ आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही.
피를 보수하는 자가 도피성 지경 밖에서 그 살인자를 만나 죽일지라도 위하여 피흘린 죄가 없나니
28 २८ एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत: च्या प्रदेशात जाऊ शकतो.
이는 살인자가 대제사장의 죽기까지 그 도피성에 유하였을 것임이라 대제사장의 죽은 후에는 그 살인자가 자기의 산업의 땅으로 돌아갈 수 있느니라
29 २९ तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
이는 너희 대대로 거하는 곳에서 판단하는 율례라
30 ३० मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
무릇 사람을 죽인 자 곧 고살자를 증인들의 말을 따라서 죽일 것이나 한 증인의 증거만 따라서 죽이지 말 것이요
31 ३१ जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका, त्या खुन्याला आवश्य जीवे मारावे.
살인죄를 범한 고살자의 생명의 속전을 받지 말고 반드시 죽일 것이며
32 ३२ जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
또 도피성에 피한 자를 대제사장의 죽기 전에는 속전을 받고 그의 땅으로 돌아가 거하게 하지 말 것이니라
33 ३३ ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
너희는 거하는 땅을 더럽히지 말라 피는 땅을 더럽히나니 피 흘림을 받은 땅은 이를 흘리게 한 자의 피가 아니면 속할 수 없느니라
34 ३४ मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.
너희는 너희 거하는 땅 곧 나의 거하는 땅을 더럽히지 말라 나 여호와가 이스라엘 자손 중에 거함이니라

< गणना 35 >