< गणना 33 >
1 १ मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत.
以色列人按着军队,在摩西、亚伦的手下出埃及地所行的路程记在下面。
2 २ परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.
摩西遵着耶和华的吩咐记载他们所行的路程,其路程乃是这样:
3 ३ पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
正月十五日,就是逾越节的次日,以色列人从兰塞起行,在一切埃及人眼前昂然无惧地出去。
4 ४ मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
那时,埃及人正葬埋他们的长子,就是耶和华在他们中间所击杀的;耶和华也败坏他们的神。
5 ५ इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.
以色列人从兰塞起行,安营在疏割。
6 ६ ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले.
从疏割起行,安营在旷野边的以倘。
7 ७ त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.
从以倘起行,转到比哈·希录,是在巴力·洗分对面,就在密夺安营。
8 ८ मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला.
从比哈·希录对面起行,经过海中到了书珥旷野,又在伊坦的旷野走了三天的路程,就安营在玛拉。
9 ९ लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती.
从玛拉起行,来到以琳(以琳有十二股水泉,七十棵棕树),就在那里安营。
10 १० लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.
从以琳起行,安营在红海边。
11 ११ त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला.
从红海边起行,安营在汛的旷野。
12 १२ सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला.
从汛的旷野起行,安营在脱加。
13 १३ लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
从脱加起行,安营在亚录。
14 १४ लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
从亚录起行,安营在利非订;在那里,百姓没有水喝。
15 १५ लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
从利非订起行,安营在西奈的旷野。
16 १६ त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
从西奈的旷野起行,安营在基博罗·哈他瓦。
17 १७ किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
从基博罗·哈他瓦起行,安营在哈洗录。
18 १८ हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.
从哈洗录起行,安营在利提玛。
19 १९ रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
从利提玛起行,安营在临门·帕烈。
20 २० रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
从临门·帕烈起行,安营在立拿。
21 २१ लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
从立拿起行,安营在勒撒。
22 २२ रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
从勒撒起行,安营在基希拉他。
23 २३ लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
从基希拉他起行,安营在沙斐山。
24 २४ शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
从沙斐山起行,安营在哈拉大。
25 २५ लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
从哈拉大起行,安营在玛吉希录。
26 २६ मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
从玛吉希录起行,安营在他哈。
27 २७ लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
从他哈起行,安营在他拉。
28 २८ तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
从他拉起行,安营在密加。
29 २९ लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला.
从密加起行,安营在哈摩拿。
30 ३० हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
从哈摩拿起行,安营在摩西录。
31 ३१ त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला.
从摩西录起行,安营在比尼·亚干。
32 ३२ बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
从比尼·亚干起行,安营在曷·哈及甲。
33 ३३ होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
从曷·哈及甲起行,安营在约巴他。
34 ३४ याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
从约巴他起行,安营在阿博拿。
35 ३५ अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
从阿博拿起行,安营在以旬·迦别。
36 ३६ लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.
从以旬·迦别起行,安营在寻的旷野,就是加低斯。
37 ३७ लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
从加低斯起行,安营在何珥山,以东地的边界。
38 ३८ याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
以色列人出了埃及地后四十年,五月初一日,祭司亚伦遵着耶和华的吩咐上何珥山,就死在那里。
39 ३९ अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
亚伦死在何珥山的时候年一百二十三岁。
40 ४० कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
住在迦南南地的迦南人亚拉得王听说以色列人来了。
41 ४१ लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.
以色列人从何珥山起行,安营在撒摩拿。
42 ४२ त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले.
从撒摩拿起行,安营在普嫩。
43 ४३ पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.
从普嫩起行,安营在阿伯。
44 ४४ लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
从阿伯起行,安营在以耶·亚巴琳,摩押的边界。
45 ४५ मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
从以耶·亚巴琳起行,安营在底本·迦得。
46 ४६ लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.
从底本·迦得起行,安营在亚门·低比拉太音。
47 ४७ अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला.
从亚门·低比拉太音起行,安营在尼波对面的亚巴琳山里。
48 ४८ लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
从亚巴琳山起行,安营在摩押平原—约旦河边、耶利哥对面。
49 ४९ त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.
他们在摩押平原沿约旦河边安营,从伯·耶施末直到亚伯·什亭。
50 ५० आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
耶和华在摩押平原—约旦河边、耶利哥对面晓谕摩西说:
51 ५१ इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
“你吩咐以色列人说:你们过约旦河进迦南地的时候,
52 ५२ तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
就要从你们面前赶出那里所有的居民,毁灭他们一切錾成的石像和他们一切铸成的偶像,又拆毁他们一切的邱坛。
53 ५३ तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे.
你们要夺那地,住在其中,因我把那地赐给你们为业。
54 ५४ तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.
你们要按家室拈阄,承受那地;人多的,要把产业多分给他们;人少的,要把产业少分给他们。拈出何地给何人,就要归何人。你们要按宗族的支派承受。
55 ५५ परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
倘若你们不赶出那地的居民,所容留的居民就必作你们眼中的刺,肋下的荆棘,也必在你们所住的地上扰害你们。
56 ५६ मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.
而且我素常有意怎样待他们,也必照样待你们。”