< गणना 31 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
耶和华吩咐摩西说:
2 २ इस्राएल लोकांसाठी मिद्यान्याविरूद्ध सूड घे. हे केल्यानंतर तू मरण पावशील आणि त्यानंतर तू तुझ्या लोकांस जाऊन मिळशील.
“你要在米甸人身上报以色列人的仇,后来要归到你列祖那里。”
3 ३ मग मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.
摩西吩咐百姓说:“要从你们中间叫人带兵器出去攻击米甸,好在米甸人身上为耶和华报仇。
4 ४ इस्राएलाच्या प्रत्येक वंशातून एक एक हजार लढाईस पाठवा.
从以色列众支派中,每支派要打发一千人去打仗。”
5 ५ इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील.
于是从以色列千万人中,每支派交出一千人,共一万二千人,带着兵器预备打仗。
6 ६ मोशेने प्रत्येक वंशातून एक हजार असे बारा हजार लोकांस लढाईवर पाठवले. त्यांना आणि त्यांच्याबरोबर याजक एलाजाराचा मुलगा फिनहासास पवित्र पात्रे व इशारा देण्यासाठी रणशिंगे त्यांच्या हवाली करून पाठवले.
摩西就打发每支派的一千人去打仗,并打发祭司以利亚撒的儿子非尼哈同去;非尼哈手里拿着圣所的器皿和吹大声的号筒。
7 ७ मग मोशेने व एलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले.
他们就照耶和华所吩咐摩西的,与米甸人打仗,杀了所有的男丁。
8 ८ त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामासही तलवारीने मारले.
在所杀的人中,杀了米甸的五王,就是以未、利金、苏珥、户珥、利巴,又用刀杀了比珥的儿子巴兰。
9 ९ इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करून नेले. त्यांनी त्यांची सर्व गुरे व त्यांचे सर्व कळप व सर्व धन लूट म्हणून त्यांनी घेतले.
以色列人掳了米甸人的妇女孩子,并将他们的牲畜、羊群,和所有的财物都夺了来,当作掳物,
10 १० त्यांनी त्यांची सर्व वस्तीची नगरे व त्यांच्या सर्व छावण्याही जाळल्या.
又用火焚烧他们所住的城邑和所有的营寨,
11 ११ त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान, दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली.
把一切所夺的、所掳的,连人带牲畜都带了去,
12 १२ यरीहोपाशी यार्देनतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले.
将所掳的人,所夺的牲畜、财物,都带到摩押平原,在约旦河边与耶利哥相对的营盘,交给摩西和祭司以利亚撒,并以色列的会众。
13 १३ नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.
摩西和祭司以利亚撒,并会众一切的首领,都出到营外迎接他们。
14 १४ जे सैनिकांचे सेनापती युद्धावरुन परतले होते एक हजार सैनिकांच्या प्रमुखावर आणि शंभर सैनिकांच्या प्रमुखावर मोशे खूप रागावला.
摩西向打仗回来的军长,就是千夫长、百夫长,发怒,
15 १५ मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?
对他们说:“你们要存留这一切妇女的活命吗?
16 १६ पाहा ह्यांनीच बलामाच्या मसलतीवरून पौराच्या प्रकरणी इस्राएलाच्या वंशाना परमेश्वराविरूद्ध अपराध करायला लावले. यावरुन परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.
这些妇女因巴兰的计谋,叫以色列人在毗珥的事上得罪耶和华,以致耶和华的会众遭遇瘟疫。
17 १७ आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.
所以,你们要把一切的男孩和所有已嫁的女子都杀了。
18 १८ “आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर रहावे.
但女孩子中,凡没有出嫁的,你们都可以存留她的活命。
19 १९ तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत: ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.
你们要在营外驻扎七日;凡杀了人的,和一切摸了被杀的,并你们所掳来的人口,第三日,第七日,都要洁净自己,
20 २० तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”
也要因一切的衣服、皮物、山羊毛织的物,和各样的木器,洁净自己。”
21 २१ नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,
祭司以利亚撒对打仗回来的兵丁说:“耶和华所吩咐摩西律法中的条例乃是这样:
22 २२ पितळ, लोखंड, पत्रा किंवा शिसे वगैरे
金、银、铜、铁、锡、铅,
23 २३ जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा ते शुद्ध होईल: तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे.
凡能见火的,你们要叫它经火就为洁净,然而还要用除污秽的水洁净它;凡不能见火的,你们要叫它过水。
24 २४ सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”
第七日,你们要洗衣服,就为洁净,然后可以进营。”
25 २५ नंतर परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
耶和华晓谕摩西说:
26 २६ सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.
“你和祭司以利亚撒,并会众的各族长,要计算所掳来的人口和牲畜的总数。
27 २७ नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलाच्या इतर लोकात त्यांची वाटणी करा.
把所掳来的分作两半:一半归与出去打仗的精兵,一半归与全会众。
28 २८ युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भागातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा.
又要从出去打仗所得的人口、牛、驴、羊群中,每五百取一,作为贡物奉给耶和华。
29 २९ त्यांच्या हिश्श्यातून घेऊन तो परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून याजक एलाजाराला द्यावा.
从他们一半之中,要取出来交给祭司以利亚撒,作为耶和华的举祭。
30 ३० “नंतर इस्राएल लोकांस मिळालेल्या हिश्श्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे.”
从以色列人的一半之中,就是从人口、牛、驴、羊群、各样牲畜中,每五十取一,交给看守耶和华帐幕的利未人。”
31 ३१ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजकाने केले.
于是摩西和祭司以利亚撒照耶和华所吩咐摩西的行了。
32 ३२ सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,
除了兵丁所夺的财物以外,所掳来的:羊六十七万五千只;
33 ३३ बहात्तर हजार गाईबैल,
牛七万二千只;
35 ३५ आणि बत्तीस हजार स्त्रिया आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे).
女人共三万二千口,都是没有出嫁的。
36 ३६ युद्धावर गेलेल्या सैनिकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या मिळाल्या.
出去打仗之人的分,就是他们所得的那一半,共计羊三十三万七千五百只,
37 ३७ त्यांनी सहाशे पंच्याहत्तर मेंढ्या परमेश्वरास दिल्या.
从其中归耶和华为贡物的,有六百七十五只;
38 ३८ गाईबैल छत्तीस हजार असून त्यातील बहात्तर परमेश्वराचा कर होते.
牛三万六千只,从其中归耶和华为贡物的,有七十二只;
39 ३९ सैनिकांना तीस हजार पाचशे गाढवे मिळाली. त्यातील एकसष्ट गाढवे त्यांनी परमेश्वरास दिले.
驴三万零五百匹,从其中归耶和华为贡物的,有六十一匹;
40 ४० सैनिकांना सोळा हजार स्त्रिया मिळाल्या. त्यांपैकी बत्तीस स्त्रिया त्यांनी परमेश्वरास दिल्या.
人一万六千口,从其中归耶和华的,有三十二口。
41 ४१ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने याजक एलाजाराला दिल्या.
摩西把贡物,就是归与耶和华的举祭,交给祭司以利亚撒,是照耶和华所吩咐摩西的。
42 ४२ नंतर युद्धावर गेलेल्या इस्राएली सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता.
以色列人所得的那一半,就是摩西从打仗的人取来分给他们的。(
43 ४३ लोकांस तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या.
会众的那一半有:羊三十三万七千五百只;
44 ४४ छत्तीस हजार गाईबैल,
牛三万六千只;
45 ४५ गाढवे तीस हजार पाचशे
驴三万零五百匹;
46 ४६ आणि सोळा हजार स्त्रिया मिळाल्या.
人一万六千口。)
47 ४७ आणि इस्राएलाच्या वंशाच्या अर्ध्या भागातून, मनुष्यातून व जनावरांतून प्रत्येक पन्नास वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यामध्ये पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवासमंडपाची काळजी घेतली.
无论是人口是牲畜,摩西每五十取一,交给看守耶和华帐幕的利未人,是照耶和华所吩咐摩西的。
48 ४८ नंतर सैनिकांचे पुढारी सहस्त्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले.
带领千军的各军长,就是千夫长、百夫长,都近前来见摩西,
49 ४९ त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.
对他说:“仆人权下的兵已经计算总数,并不短少一人。
50 ५० म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेश्वराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत; बाजूबंद, बांगडया, आंगठ्या, कुड्या आणि हार. ही आम्ही परमेश्वरास अर्पण म्हणून आमच्या जिवासाठी परमेश्वरारासमोर प्रायश्चित करण्याकरता आणली आहेत.
如今我们将各人所得的金器,就是脚链子、镯子、打印的戒指、耳环、手钏,都送来为耶和华的供物,好在耶和华面前为我们的生命赎罪。”
51 ५१ मोशे आणि एलाजार याजकाने ते सर्व सोने व घडीव वस्तू त्यांच्याकडून स्विकारल्या.
摩西和祭司以利亚撒就收了他们的金子,都是打成的器皿。
52 ५२ सहस्त्रपती आणि शतपती ह्यांनी परमेश्वरास समर्पण केलेले सोने सोळा हजार सातशे शेकेल भरले.
千夫长、百夫长所献给耶和华为举祭的金子共有一万六千七百五十舍客勒。
53 ५३ सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वतःजवळ ठेवल्या.
各兵丁都为自己夺了财物。
54 ५४ मोशे आणि एलाजार याजक यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्राएल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपामध्ये नेऊन ठेवले.
摩西和祭司以利亚撒收了千夫长、百夫长的金子,就带进会幕,在耶和华面前作为以色列人的纪念。