< गणना 29 >
1 १ सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. हा तुमचा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
mensis etiam septimi prima dies venerabilis et sancta erit vobis omne opus servile non facietis in ea quia dies clangoris est et tubarum
2 २ परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी.
offeretisque holocaustum in odorem suavissimum Domino vitulum de armento unum arietem unum agnos anniculos inmaculatos septem
3 ३ त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
et in sacrificiis eorum similae oleo conspersae tres decimas per singulos vitulos duas decimas per arietem
4 ४ मेंढ्याबरोबर आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करावे.
unam decimam per agnum qui simul sunt agni septem
5 ५ तुम्हासाठी प्रायश्चित करायला पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
et hircum pro peccato qui offertur in expiationem populi
6 ६ चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे याव्यतिरिक्त परमेश्वरास मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे.
praeter holocaustum kalendarum cum sacrificiis suis et holocaustum sempiternum cum libationibus solitis hisdem caerimoniis offeretis in odorem suavissimum incensum Domino
7 ७ सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
decima quoque dies mensis huius septimi erit vobis sancta atque venerabilis et adfligetis animas vestras omne opus servile non facietis in ea
8 ८ तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत.
offeretisque holocaustum Domino in odorem suavissimum vitulum de armento unum arietem unum agnos anniculos inmaculatos septem
9 ९ आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
et in sacrificiis eorum similae oleo conspersae tres decimas per vitulos singulos duas decimas per arietem
10 १० सात कोकरांपैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
decimam decimae per agnos singulos qui sunt simul septem agni
11 ११ पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत.
et hircum pro peccato absque his quae offerri pro delicto solent in expiationem et holocaustum sempiternum in sacrificio et libaminibus eorum
12 १२ सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
quintadecima vero die mensis septimi quae vobis erit sancta atque venerabilis omne opus servile non facietis in ea sed celebrabitis sollemnitatem Domino septem diebus
13 १३ तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे, ही दोषरहित असावी.
offeretisque holocaustum in odorem suavissimum Domino vitulos de armento tredecim arietes duos agnos anniculos quattuordecim inmaculatos
14 १४ त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा,
et in libamentis eorum similae oleo conspersae tres decimas per vitulos singulos qui sunt simul vituli tredecim et duas decimas arieti uno id est simul arietibus duobus
15 १५ आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
et decimam decimae agnis singulis qui sunt simul agni quattuordecim
16 १६ आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno et sacrificio et libamine eius
17 १७ दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
in die altero offeres vitulos de armento duodecim arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
18 १८ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
19 १९ आणि पापार्पणासाठी एक बकरा म्हणून द्यावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्यांची पेयार्पण ही असावीत.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
20 २० तिसऱ्या दिवशी तुम्ही अकरा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
die tertio offeres vitulos undecim arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
21 २१ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
22 २२ पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे निरंतरचे होमार्पण व अन्नार्पण व त्यांचे पेयार्पणाव्यतिरिक्त असावी.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno et sacrificio et libamine eius
23 २३ चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
die quarto offeres vitulos decem arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
24 २४ गोऱ्हे, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणही नियमाप्रमाणे करावी.
sacrificiaque eorum et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
25 २५ आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, त्याचे अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
26 २६ पाचव्या दिवशी तुम्ही नऊ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
die quinto offeres vitulos novem arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
27 २७ त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
28 २८ एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
29 २९ सहाव्या दिवशी तुम्ही आठ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
die sexto offeres vitulos octo arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
30 ३० आणि त्यांबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण, व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
31 ३१ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
32 ३२ सातव्या दिवशी तुम्ही सात गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
die septimo offeres vitulos septem arietes duos agnos anniculos inmaculatos quattuordecim
33 ३३ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
34 ३४ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
35 ३५ आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.
die octavo qui est celeberrimus omne opus servile non facietis
36 ३६ तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी.
offerentes holocaustum in odorem suavissimum Domino vitulum unum arietem unum agnos anniculos inmaculatos septem
37 ३७ आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.
sacrificiaque et libamina singulorum per vitulos et arietes et agnos rite celebrabis
38 ३८ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण, व त्यांचे पेयार्पण अर्पावा.
et hircum pro peccato absque holocausto sempiterno sacrificioque eius et libamine
39 ३९ तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.
haec offeretis Domino in sollemnitatibus vestris praeter vota et oblationes spontaneas in holocausto in sacrificio in libamine et in hostiis pacificis
40 ४० मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांस सांगितल्या.
narravitque Moses filiis Israhel omnia quae ei Dominus imperarat