< गणना 29 >

1 सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. हा तुमचा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
«وَفِي ٱلشَّهْرِ ٱلسَّابِعِ، فِي ٱلْأَوَّلِ مِنَ ٱلشَّهْرِ، يَكُونُ لَكُمْ مَحْفَلٌ مُقَدَّسٌ. عَمَلًا مَّا مِنَ ٱلشُّغْلِ لَا تَعْمَلُوا. يَوْمَ هُتَافِ بُوقٍ يَكُونُ لَكُمْ.١
2 परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी.
وَتَعْمَلُونَ مُحْرَقَةً لِرَائِحَةِ سَرُورٍ لِلرَّبِّ: ثَوْرًا وَاحِدًا ٱبْنَ بَقَرٍ، وَكَبْشًا وَاحِدًا، وَسَبْعَةَ خِرَافٍ حَوْلِيَّةٍ صَحِيحَةٍ.٢
3 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
وَتَقْدِمَتَهُنَّ مِنْ دَقِيقٍ مَلْتُوتٍ بِزَيْتٍ: ثَلَاثَةَ أَعْشَارٍ لِلثَّوْرِ، وَعُشْرَيْنِ لِلْكَبْشِ،٣
4 मेंढ्याबरोबर आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करावे.
وَعُشْرًا وَاحِدًا لِكُلِّ خَرُوفٍ مِنَ ٱلسَّبْعَةِ ٱلْخِرَافِ.٤
5 तुम्हासाठी प्रायश्चित करायला पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
وَتَيْسًا وَاحِدًا مِنَ ٱلْمَعْزِ ذَبِيحَةَ خَطِيَّةٍ لِلتَّكْفِيرِ عَنْكُمْ،٥
6 चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे याव्यतिरिक्त परमेश्वरास मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे.
فَضْلًا عَنْ مُحْرَقَةِ ٱلشَّهْرِ وَتَقْدِمَتِهَا وَٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا مَعَ سَكَائِبِهِنَّ كَعَادَتِهِنَّ رَائِحَةَ سَرُورٍ وَقُودًا لِلرَّبِّ.٦
7 सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
«وَفِي عَاشِرِ هَذَا ٱلشَّهْرِ ٱلسَّابِعِ، يَكُونُ لَكُمْ مَحْفَلٌ مُقَدَّسٌ، وَتُذَلِّلُونَ أَنْفُسَكُمْ. عَمَلًا مَّا لَا تَعْمَلُوا.٧
8 तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत.
وَتُقَرِّبُونَ مُحْرَقَةً لِلرَّبِّ رَائِحَةَ سَرُورٍ: ثَوْرًا وَاحِدًا ٱبْنَ بَقَرٍ، وَكَبْشًا وَاحِدًا، وَسَبْعَةَ خِرَافٍ حَوْلِيَّةٍ. صَحِيحَةً تَكُونُ لَكُمْ.٨
9 आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
وَتَقْدِمَتُهُنَّ مِنْ دَقِيقٍ مَلْتُوتٍ بِزَيْتٍ: ثَلَاثَةُ أَعْشَارٍ لِلثَّوْرِ، وَعُشْرَانِ لِلْكَبْشِ ٱلْوَاحِدِ،٩
10 १० सात कोकरांपैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
وَعُشْرٌ وَاحِدٌ لِكُلِّ خَرُوفٍ مِنَ ٱلسَّبْعَةِ ٱلْخِرَافِ.١٠
11 ११ पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत.
وَتَيْسًا وَاحِدًا مِنَ ٱلْمَعْزِ ذَبِيحَةَ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنْ ذَبِيحَةِ ٱلْخَطِيَّةِ لِلْكَفَّارَةِ وَٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا مَعَ سَكَائِبِهِنَّ.١١
12 १२ सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلْخَامِسَ عَشَرَ مِنَ ٱلشَّهْرِ ٱلسَّابِعِ، يَكُونُ لَكُمْ مَحْفَلٌ مُقَدَّسٌ. عَمَلًا مَّا مِنَ ٱلشُّغْلِ لَا تَعْمَلُوا. وَتُعَيِّدُونَ عِيدًا لِلرَّبِّ سَبْعَةَ أَيَّامٍ.١٢
13 १३ तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे, ही दोषरहित असावी.
وَتُقَرِّبُونَ مُحْرَقَةً، وَقُودَ رَائِحَةِ سَرُورٍ لِلرَّبِّ: ثَلَاثَةَ عَشَرَ ثَوْرًا أَبْنَاءَ بَقَرٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا. صَحِيحَةً تَكُونُ لَكُمْ.١٣
14 १४ त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा,
وَتَقْدِمَتُهُنَّ مِنْ دَقِيقٍ مَلْتُوتٍ بِزَيْتٍ: ثَلَاثَةُ أَعْشَارٍ لِكُلِّ ثَوْرٍ مِنَ ٱلثَّلَاثَةَ عَشَرَ ثَوْرًا، وَعُشْرَانِ لِكُلِّ كَبْشٍ مِنَ ٱلْكَبْشَيْنِ،١٤
15 १५ आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
وَعُشْرٌ وَاحِدٌ لِكُلِّ خَرُوفٍ مِنَ ٱلْأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا،١٥
16 १६ आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत.
وَتَيْسًا وَاحِدًا مِنَ ٱلْمَعْزِ ذَبِيحَةَ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.١٦
17 १७ दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلثَّانِي: ٱثْنَيْ عَشَرَ ثَوْرًا أَبْنَاءَ بَقَرٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.١٧
18 १८ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.١٨
19 १९ आणि पापार्पणासाठी एक बकरा म्हणून द्यावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्यांची पेयार्पण ही असावीत.
وَتَيْسًا وَاحِدًا مِنَ ٱلْمَعْزِ ذَبِيحَةَ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا مَعَ سَكَائِبِهِنَّ.١٩
20 २० तिसऱ्या दिवशी तुम्ही अकरा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلثَّالِثِ: أَحَدَ عَشَرَ ثَوْرًا، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.٢٠
21 २१ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.٢١
22 २२ पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे निरंतरचे होमार्पण व अन्नार्पण व त्यांचे पेयार्पणाव्यतिरिक्त असावी.
وَتَيْسًا وَاحِدًا لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٢٢
23 २३ चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلرَّابِعِ: عَشَرَةَ ثِيرَانٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.٢٣
24 २४ गोऱ्हे, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणही नियमाप्रमाणे करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.٢٤
25 २५ आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, त्याचे अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
وَتَيْسًا وَاحِدًا مِنَ ٱلْمَعْزِ لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٢٥
26 २६ पाचव्या दिवशी तुम्ही नऊ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلْخَامِسِ: تِسْعَةَ ثِيرَانٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.٢٦
27 २७ त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.٢٧
28 २८ एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी.
وَتَيْسًا وَاحِدًا لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٢٨
29 २९ सहाव्या दिवशी तुम्ही आठ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلسَّادِسِ: ثَمَانِيَةَ ثِيرَانٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.٢٩
30 ३० आणि त्यांबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण, व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.٣٠
31 ३१ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
وَتَيْسًا وَاحِدًا لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٣١
32 ३२ सातव्या दिवशी तुम्ही सात गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
«وَفِي ٱلْيَوْمِ ٱلسَّابِعِ: سَبْعَةَ ثِيرَانٍ، وَكَبْشَيْنِ، وَأَرْبَعَةَ عَشَرَ خَرُوفًا حَوْلِيًّا صَحِيحًا.٣٢
33 ३३ त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثِّيرَانِ وَٱلْكَبْشَيْنِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَعَادَتِهِنَّ.٣٣
34 ३४ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी.
وَتَيْسًا وَاحِدًا لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٣٤
35 ३५ आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.
«فِي ٱلْيَوْمِ ٱلثَّامِنِ: يَكُونُ لَكُمُ ٱعْتِكَافٌ. عَمَلًا مَّا مِنَ ٱلشُّغْلِ لَا تَعْمَلُوا.٣٥
36 ३६ तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी.
وَتُقَرِّبُونَ مُحْرَقَةً وَقُودًا رَائِحَةَ سَرُورٍ لِلرَّبِّ: ثَوْرًا وَاحِدًا، وَكَبْشًا وَاحِدًا، وَسَبْعَةَ خِرَافٍ حَوْلِيَّةٍ صَحِيحَةٍ.٣٦
37 ३७ आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.
وَتَقْدِمَتَهُنَّ وَسَكَائِبَهُنَّ لِلثَّوْرِ وَٱلْكَبْشِ وَٱلْخِرَافِ حَسَبَ عَدَدِهِنَّ كَٱلْعَادَةِ.٣٧
38 ३८ एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण, व त्यांचे पेयार्पण अर्पावा.
وَتَيْسًا وَاحِدًا لِذَبِيحَةِ خَطِيَّةٍ، فَضْلًا عَنِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَتَقْدِمَتِهَا وَسَكِيبِهَا.٣٨
39 ३९ तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.
هَذِهِ تُقَرِّبُونَهَا لِلرَّبِّ فِي مَوَاسِمِكُمْ، فَضْلًا عَنْ نُذُورِكُمْ وَنَوَافِلِكُمْ مِنْ مُحْرَقَاتِكُمْ وَتَقْدِمَاتِكُمْ وَسَكَائِبِكُمْ وَذَبَائِحِ سَلَامَتِكُمْ».٣٩
40 ४० मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांस सांगितल्या.
فَكَلَّمَ مُوسَى بَنِي إِسْرَائِيلَ حَسَبَ كُلِّ مَا أَمَرَ بِهِ ٱلرَّبُّ مُوسَى.٤٠

< गणना 29 >