< गणना 26 >
1 १ मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
Un notikās pēc tās mocības, tad Tas Kungs runāja uz Mozu un uz Eleazaru, priestera Ārona dēlu, un sacīja:
2 २ “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
Skaiti visas Israēla bērnu draudzes pulku, kas ir divdesmit gadu un pāri, pēc viņu tēvu namiem, visus, kas iekš Israēla var iet karā.
3 ३ तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
Tad Mozus un Eleazars, tas priesteris, ar tiem runāja Moaba klajumos, pie Jardānes pret Jēriku un sacīja:
4 ४ मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
(Lai top skaitīti) kas ir divdesmit gadu un pāri, itin kā Tas Kungs Mozum pavēlējis. Bet Israēla bērni, kas no Ēģiptes zemes izgājuši, bija:
5 ५ रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
Rūbens Israēla pirmdzimtais. Rūbena dēli bija Hanoks, no tā ir Hanoka cilts; no Pallus ir Pallus cilts,
6 ६ हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
No Hecrona ir Hecrona cilts, no Karmus ir Karmus cilts.
7 ७ रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
Šās ir Rūbena ciltis, un viņu skaits bija četrdesmit trīs tūkstoši septiņsimt un trīsdesmit.
8 ८ पल्लूचा मुलगा अलीयाब.
Un Pallus dēls bija Eliabs.
9 ९ अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
Un Eliaba dēli bija Nemuēls un Datans un Abirams. Šis Datans un Abirams bija tās draudzes virsnieki, kas pret Mozu un Āronu sacēlās Koraha pulkā, kad tas sacēlās pret To Kungu.
10 १० त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
Un zeme atdarīja savu muti un tos aprija līdz ar Korahu, ka tas pulks nomira; tur uguns divsimt un piecdesmit vīrus aprija, un tie tapa par biedēkli.
11 ११ परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
Bet Koraha dēli nenomira.
12 १२ शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
Sīmeana dēli pēc savām ciltīm: no Nemuēļa ir Nemuēļa cilts, no Jāmina ir Jāmina cilts, no Jākina ir Jākina cilts,
13 १३ जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
No Zerus ir Zerus cilts, no Saulus ir Saulus cilts.
14 १४ ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
Šās ir Sīmeana ciltis, divdesmit un divi tūkstoši un divi simti.
15 १५ गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
Gada dēli pēc savām ciltīm: no Cevona ir Cevona cilts, no Hagus ir Hagus cilts, no Zūnus ir Zūnus cilts,
16 १६ आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
No Oznus ir Oznus cilts, no Erus ir Erus cilts,
17 १७ अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
No Aroda ir Aroda cilts, no Ariēļa ir Ariēļa cilts.
18 १८ गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
Šās ir Gada dēlu ciltis, pēc sava skaita četrdesmit tūkstoši un piecsimt.
19 १९ जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
Jūda dēli bija Ģers un Onans, bet Ģers un Onans nomira Kanaāna zemē.
20 २० यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
Tad Jūda bērni bija pēc savām ciltīm: no Šelus Šelus cilts, no Pereca Pereca cilts, no Zerus Zerus cilts.
21 २१ पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
Un Pereca dēli bija Hecrons, no tā ir Hecrona cilts, no Hamula ir Hamula cilts.
22 २२ ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
Šās ir Jūda ciltis, pēc sava skaita septiņdesmit un seši tūkstoši un piecsimt.
23 २३ इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी: तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
Īsašara dēli pēc savām ciltīm bija: Tolus, no tā ir Tolus cilts, no Pūvus ir Pūvus cilts,
24 २४ याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
No Jašuba ir Jašuba cilts, no Šimrona ir Šimrona cilts.
25 २५ इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
Šās ir Īsašara ciltis, pēc sava skaita sešdesmit un četri tūkstoši un trīssimt.
26 २६ जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
Zebulona dēli pēc savām ciltīm bija: Sereds, no tā ir Sereda cilts, no Elona ir Elona cilts, no Jaleēļa ir Jaleēļa cilts.
27 २७ जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
Šās ir Zebulona ciltis, pēc sava skaita sešdesmit tūkstoši un piecsimt.
28 २८ योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
Jāzepa dēli pēc savām ciltīm bija Manasus un Efraīms.
29 २९ मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
Manasus dēli bija: Mahirs, no tā ir Mahira cilts, un Mahirs dzemdināja Gileādu, no Gileāda ir Gileāda cilts.
30 ३० गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
Šie ir Gileāda dēli: Jēzers no tā ir Jēzera cilts, Heleks, no tā ir Heleka cilts,
31 ३१ अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.
Un no Asriēla ir Asriēla cilts, no Šehema ir Šehema cilts,
32 ३२ शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.
Un no Šemida ir Šemida cilts, un no Hefera ir Hefera cilts.
33 ३३ हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
Bet Celofehadam, Hefera dēlam, nebija dēlu, bet meitas, un Celofehada meitu vārdi bija Maēla un Noa, Hagla, Milka un Tirca.
34 ३४ ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
Šās ir Manasus ciltis, un viņu skaits piecdesmit un divi tūkstoši un septiņsimt.
35 ३५ एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
Šie ir Efraīma bērni pēc savām ciltīm: no Šūtelus ir Šūtelus cilts, no Bekera Bekera cilts, no Taāna Taāna cilts.
36 ३६ एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
Un šie ir Šūtelus dēli: no Erana ir Erana cilts.
37 ३७ ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
Šās ir Efraīma dēlu ciltis, pēc sava skaita trīsdesmit divi tūkstoši un piecsimt. Šie ir Jāzepa dēli pēc savām ciltīm.
38 ३८ बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.
Benjamina dēli pēc savām ciltīm: no Belus ir Belus cilts, no Ašbela Ašbela cilts, no Ahirus Ahirus cilts,
39 ३९ शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ.
No Šūpus Šūpus cilts, no Hūpus Hūpus cilts.
40 ४० बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
Un Belus dēli bija: Ards un Naēmans: no viņa ir Arda cilts, no Naēmana ir Naēmana cilts.
41 ४१ ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
Šie ir Benjamina dēli pēc savām ciltīm, un viņu skaits bija četrdesmit pieci tūkstoši un sešsimt.
42 ४२ दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.
Šie ir Dana dēli pēc savām ciltīm: no Šuhāma ir Šuhāma cilts.
43 ४३ शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
Šās ir Dana ciltis pēc savām ciltīm, visi Šuhāma radi pēc sava skaita sešdesmit četri tūkstoši un četrsimt.
44 ४४ आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.
Ašera dēli pēc savām ciltīm: no Jemna ir Jemna cilts, no Jisvus ir Jisvus cilts, no Berius ir Berius cilts,
45 ४५ बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.
No Berius bērniem, no Hebera ir Hebera cilts, no Melķiēļa ir Melķiēļa cilts.
46 ४६ आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
Un Ašera meitas vārds bija Sāra.
47 ४७ ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
Šās ir Ašera bērnu ciltis, pēc sava skaita piecdesmit trīs tūkstoši un četrsimt.
48 ४८ नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.
Naftalus dēli pēc savām ciltīm: no Jaēciēļa ir Jaēciēļa cilts, no Gunus ir Gunus cilts,
49 ४९ येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
No Jecera ir Jecera cilts, no Šilema ir Šilema cilts.
50 ५० ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
Šie ir Naftalus dēli pēc savām ciltīm, un viņu skaits bija četrdesmit pieci tūkstoši un četrsimt.
51 ५१ ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
Šie ir Israēla bērnu skaitītie, sešsimt tūkstoši viens tūkstotis septiņsimt un trīsdesmit.
52 ५२ परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
Un Tas Kungs runāja uz Mozu un sacīja:
53 ५३ त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
Šiem lai tā zeme top izdalīta par mantu pēc tā vārdu skaita.
54 ५४ मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
Kuru ir daudz, tiem tev to daļu būs vairot, un, kuru ir mazāk, tiem būs mazāk dot par daļu, ikvienam tā daļa lai top dota pēc tā skaitīta pulka.
55 ५५ देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
Bet tā zeme caur īpašu meslošanu lai top izdalīta, pēc viņu tēvu cilts vārdiem tiem būs mantot.
56 ५६ प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
Kā tā meslošana rādīs, tā lai ikviena daļa top dota pēc tā lielā vai tā mazā skaita.
57 ५७ त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.
Šie nu ir tie skaitītie Leviti pēc savām ciltīm: no Geršona ir Geršona cilts, no Kehāta ir Kehāta cilts, no Merarus ir Merarus cilts.
58 ५८ लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.
Šās ir Levja ciltis: Libnus cilts, Hebrona cilts, Maēlus cilts, Muzus cilts, Koraha cilts.
59 ५९ अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
Un Kehāts dzemdināja Amramu, un Amrama sievas vārds bija Joķebete, Levja meita, kas Levjam Ēģiptes zemē dzimusi, un šī dzemdēja Amramam Āronu un Mozu un Mirjami, viņa māsu.
60 ६० नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
Un Āronam piedzima Nadabs un Abijus, Eleazars un Ītamars.
61 ६१ पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
Bet Nadabs un Abijus bija nomiruši, kad tie svešu uguni Tam Kungam pienesa.
62 ६२ लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
Un viņu skaits bija divdesmit trīs tūkstoši, visi vīrieši, kas vienu mēnesi veci un pāri; jo tie netapa skaitīti pie Israēla bērniem, tāpēc ka tiem nekāda daļa nebija dota starp Israēla bērniem.
63 ६३ मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
Šie ir skaitīti no Mozus un priestera Eleazara, kas Israēla bērnus skaitīja Moaba klajumos, pie Jardānes pret Jēriku.
64 ६४ खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
Un starp tiem nebija neviena no tā Israēla bērnu skaita, ko Mozus un Ārons, tas priesteris, bija skaitījuši Sinaī tuksnesī.
65 ६५ कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
Jo Tas Kungs uz tiem bija sacījis: tie mirtin mirs tuksnesī, un no tiem neviens nebija atlicies kā vien Kālebs, Jefunna dēls, un Jozuas, Nuna dēls.