< गणना 25 >

1 इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले.
Mientras Israel permanecía en Sitim, el pueblo comenzó a prostituírse con las hijas de Moab,
2 मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले.
las cuales invitaban al pueblo a los sacrificios a sus ʼelohim. El pueblo comió y se postró ante los ʼelohim de ellas.
3 इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.
Así Israel se unió a baal Peor, y la ira de Yavé se encendió contra Israel.
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.”
Y Yavé dijo a Moisés: Detén a todos los jefes del pueblo y ahórcalos a pleno sol delante de Yavé. Y el ardor de la ira de Yavé se apartará de Israel.
5 मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.”
Entonces Moisés dijo a los jueces de Israel: Que cada uno mate a sus hombres que se unieron a baal Peor.
6 त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते.
Y mientras ellos lloraban en la entrada del Tabernáculo de Reunión, ahí llegaba un varón de los hijos de Israel que llevaba una madianita a vista de Moisés y de toda la congregación de los hijos de Israel.
7 जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.
Cuando lo vio Finees, hijo de Eleazar, hijo del sacerdote Aarón, se levantó de en medio de la congregación. Al tomar una lanza en su mano,
8 तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली.
fue tras el israelita hacia el Tabernáculo y los atravesó a ambos por su vientre, al varón de Israel y a la mujer. Y en seguida se detuvo la mortandad de sobre los hijos de Israel.
9 या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.
Pero en aquella mortandad murieron 24.000.
10 १० परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Entonces Yavé habló a Moisés:
11 ११ एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांस माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही.
Finees, hijo de Eleazar, hijo del sacerdote Aarón, desvió mi furor de sobre los hijos de Israel, al mostrar su celo por Mí en medio de ellos, por lo cual Yo no consumí en mi celo a [todos] los hijos de Israel.
12 १२ फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे.
Por tanto, anuncia: Ciertamente Yo establezco un Pacto de paz
13 १३ हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.
con él y su descendencia, el Pacto del sacerdocio perpetuo, porque él fue celoso por su ʼElohim e hizo sacrificio que apacigua por los hijos de Israel.
14 १४ “मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली मनुष्य मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
El nombre del israelita que fue asesinado con la madianita era Zimri, hijo de Salu, jefe de una familia de la tribu de Simeón.
15 १५ आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
El nombre de la madianita asesinada era Cozbi, hija de Zur, jefe de una tribu, padre de una familia de Madián.
16 १६ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः
Entonces Yavé habló a Moisés:
17 १७ “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत.
Ataquen a los madianitas y destrúyanlos,
18 १८ कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हास जाचतात.”
pues ellos son sus enemigos por las astucias con las cuales los engañaron en el asunto de Peor y en el asunto de Cozbi, hija del jefe de Madián, hermana de ellos, que fue asesinada el día de la mortandad a causa de Peor.

< गणना 25 >