< गणना 21 >
1 १ अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्राएल लोक अथारीम वरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकांस कैद केले.
Kwathi inkosi yeAradi, umKhanani, eyayihlala eningizimu, isizwa ukuthi uIsrayeli uyeza ngendlela yabahloli, yalwa imelene loIsrayeli yathumba abanye kubo.
2 २ नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरास खास वचन दिले, परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हास मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.
UIsrayeli wathembisa isithembiso eNkosini wathi: Uba unikela lokunikela lababantu esandleni sami, ngizatshabalalisa imizi yabo.
3 ३ परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांस कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
INkosi yasisizwa ilizwi likaIsrayeli, yanikela amaKhanani, wawatshabalalisa lemizi yawo; ngakho wabiza ibizo laleyondawo ngokuthi yiHorma.
4 ४ इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.
Basebesuka entabeni yeHori, ngendlela yoLwandle oluBomvu ukuze baceze ilizwe leEdoma; lomphefumulo wabantu wadinwa endleleni.
5 ५ त्यांनी मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.
Abantu basebekhuluma bemelene loNkulunkulu njalo bemelene loMozisi bathi: Lasenyuselani lisikhupha eGibhithe ukuze sifele enkangala? Ngoba kakulasinkwa njalo kakulamanzi, futhi umphefumulo wethu unengwa yilesisinkwa esilula.
6 ६ तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले.
INkosi yasithuma inyoka ezilokutshisa phakathi kwabantu, zasezibaluma abantu, njalo kwafa abantu abanengi koIsrayeli.
7 ७ लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरूद्ध आणि परमेश्वराविरूद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.
Ngakho abantu beza kuMozisi bathi: Sonile, ngoba sikhulume simelene leNkosi njalo simelene lawe; khuleka eNkosini ukuze isuse izinyoka kithi. UMozisi wasebakhulekela abantu.
8 ८ परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही.
INkosi yasisithi kuMozisi: Zenzele inyoka elomlilo, uyibeke esigodweni; njalo kuzakuthi wonke olunyiweyo, nxa eyikhangela, uzaphila.
9 ९ मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
UMozisi wasesenza inyoka yethusi, wayibeka esigodweni; kwasekusithi lapho inyoka ilume loba nguwuphi umuntu, uba ekhangele inyoka yethusi, waphila.
10 १० इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले.
Njalo abantwana bakoIsrayeli basuka bamisa inkamba eObothi.
11 ११ नंतर ओबोथ सोडून त्यांनी ईये-अबारीमाला मवाबाच्या पूर्वेकडे रानात तळ दिला.
Basuka eObothi, bamisa inkamba eIye-Abarimi enkangala emaqondana lakoMowabi lapho okuphuma khona ilanga.
12 १२ तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.
Basuka lapho, bamisa inkamba esigodini seZeredi.
13 १३ ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती.
Basuka lapho, bamisa inkamba ngale kweArinoni esenkangala ephuma emingceleni yamaAmori; ngoba iArinoni lingumngcele wakoMowabi, phakathi kweMowabi lamaAmori.
14 १४ म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात पुढील शब्द लिहिले आहेत, सुफातला वाहेब व आर्णोनाची खोरी,
Ngakho kuthiwa egwalweni lwezimpi zeNkosi: IWahebi eseSufa, lezifula zeArinoni,
15 १५ त्या खोऱ्याची उतरण आर शहराकडे वळते, आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यंत खाली जाते.
leliwa lezifula elehlela endaweni yeAri, lisekele umngcele wakoMowabi.
16 १६ तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांस एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”
Basebesuka lapho baya eBeri; lo ngumthombo iNkosi eyakhuluma ngawo kuMozisi yathi: Buthanisa abantu, ngizabanika-ke amanzi.
17 १७ नंतर इस्राएली हे गाणे गाइलेः विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा.
Khona uIsrayeli wahlabela lingoma ethi: Mpompoza, mthombo! Hlabelelani kuwo,
18 १८ आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला.
umthombo ezawugebhayo iziphathamandla, ezawugebhayo izikhulu zabantu, ngomnikumthetho, ngendondolo zazo. Basebesuka enkangala baya eMathana.
19 १९ लोक मत्तानाहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथाला गेले.
Besuka eMathana baya eNahaliyeli; besuka eNahaliyeli baya eBamothi;
20 २० लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते.
besuka eBamothi esigodini esisemhlabeni wakoMowabi, engqongeni yePisiga ekhangele inkangala.
21 २१ इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
UIsrayeli wasethuma izithunywa kuSihoni inkosi yamaAmori, esithi:
22 २२ “आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”
Ake ngidabule elizweni lakho; kasiyikuphambukela emasimini loba ezivinini; kasiyikunatha amanzi omthombo; sizahamba ngomgwaqo wenkosi, size sedlule imingcele yakho.
23 २३ पण सीहोन राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
Kodwa uSihoni kamvumelanga uIsrayeli ukudabula umngcele wakhe, kodwa uSihoni wabuthanisa bonke abantu bakhe, waphuma ukumelana loIsrayeli enkangala, wafika eJahazi, walwa emelene loIsrayeli.
24 २४ पण इस्राएलानी त्याच्यावर तलवार चालविली. नंतर त्यांनी आर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.
UIsrayeli wamtshaya ngobukhali benkemba, waba ngumnikazi welizwe lakhe kusukela eArinoni kuze kube seJaboki, kuze kube sebantwaneni bakoAmoni, ngoba umngcele wabantwana bakoAmoni wawuqinile.
25 २५ इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला.
UIsrayeli wasethatha yonke le imizi; uIsrayeli wasehlala emizini yonke yamaAmori, eHeshiboni layo yonke imizana yalo.
26 २६ हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन राहत होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
Ngoba iHeshiboni yayingumuzi kaSihoni inkosi yamaAmori, owayelwe emelene lenkosi yamandulo yakoMowabi, wayethethe ilizwe lonke layo esandleni sayo, kwaze kwafika eArinoni.
27 २७ यावरुन ते म्हणीमध्ये बोलतात; ते म्हणतात, हेशबोनाला या. पुन्हा सीहोनाचे शहर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या.
Ngakho abasebenzisa izaga bathi: Wozani eHeshiboni! Umuzi kaSihoni kawakhiwe, umiswe.
28 २८ हेशबोनामधून आग निघाली आहे, ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले. आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.
Ngoba umlilo waphuma eHeshiboni, ilangabi emzini kaSihoni, laqothula iAri loMowabi, amakhosi endawo eziphakemeyo zeArinoni.
29 २९ हे मवाबा! तू हायहाय करशील, कमोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले.
Maye kuwe, Mowabi! Selibhujisiwe, bantu bakaKemoshi! Unikele amadodana akhe aba ngababaleki, lamadodakazi akhe ekuthunjweni kuSihoni, inkosi yamaAmori.
30 ३० पण आम्ही सीहोन जिंकले आहे. दीबोनापर्यंत हेशबोन सर्व नष्ट झाले आहे. आम्ही नोफा जे मेदबाजवळ पोहचते तेथपर्यंत त्यांचा सर्व पराभव केला आहे.
Sesibatshokile; iHeshiboni ibhubhile kuze kube seDiboni; sesibachithile kuze kube seNofa, efika eMedeba.
31 ३१ याप्रमाणे इस्राएल लोक अमोऱ्यांच्या देशात राहू लागले.
UIsrayeli wasehlala elizweni lamaAmori.
32 ३२ मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांस पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले.
UMozisi wathuma ukuyahlola iJazeri; basebethumba imizana yalo, baxotsha amaAmori ayehlala khona.
33 ३३ नंतर इस्राएल लोक बाशानाच्या रस्त्याला लागले. बाशानाचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्राएल लोकांशी लढावयास निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रई येथे लढला.
Basebephenduka, benyuka ngendlela yeBashani. UOgi inkosi yeBashani wasephuma ukumelana labo, yena labantu bakhe bonke, empini eEdreyi.
34 ३४ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस. कारण मी तुला त्याच्यावर, त्याच्या सर्व सैन्यावर आणि त्याच्या देशावर विजय दिला आहे. तू हेशबोनमध्ये राहणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”
INkosi yasisithi kuMozisi: Ungamesabi; ngoba ngimnikele esandleni sakho, labantu bakhe bonke, lelizwe lakhe; njalo uzakwenza kuye njengokwenza kwakho kuSihoni inkosi yamaAmori owayehlala eHeshiboni.
35 ३५ तेव्हा त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व सैन्याला, इतके मारले की, त्याच्या लोकांपैकी कोणी जिवंत उरला नाही. मग त्यांनी त्यांचा सर्व प्रदेश घेतला.
Basebemtshaya, lamadodana akhe, labantu bakhe bonke, akwaze kwasala ophilayo kuye. Badla ilifa lelizwe lakhe.