< गणना 20 >
1 १ इस्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
정월에 이스라엘 자손 곧 온 회중이 신 광야에 이르러서 백성이 가데스에 거하더니 미리암이 거기서 죽으매 거기 장사하니라
2 २ त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.
회중이 물이 없으므로 모여서 모세와 아론을 공박하니라
3 ३ लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते.
백성이 모세와 다투어 말하여 가로되 `우리 형제들이 여호와 앞에서 죽을 때에 우리도 죽었더면 좋을 뻔 하였도다
4 ४ “तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का?
너희가 어찌하여 여호와의 총회를 이 광야로 인도하여 올려서 우리와 우리 짐승으로 다 여기서 죽게 하느냐?
5 ५ तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
너희가 어찌하여 우리를 애굽에서 나오게 하여 이 악한 곳으로 인도하였느냐? 이 곳에는 파종할 곳이 없고, 무화과도 없고, 포도도 없고, 석류도 없고, 마실 물도 없도다'
6 ६ म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
모세와 아론이 총회 앞을 떠나 회막 문에 이르러 엎드리매 여호와의 영광이 그들에게 나타나며
7 ७ परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
여호와께서 모세에게 일러 가라사대
8 ८ तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
지팡이를 가지고 네 형 아론과 함께 회중을 모으고 그들의 목전에서 너희는 반석에게 명하여 물을 내라 하라 네가 그 반석으로 물을 내게 하여 회중과 그들의 짐승에게 마시울지니라
9 ९ मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली.
모세가 그 명대로 여호와의 앞에서 지팡이를 취하니라
10 १० मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय?
모세와 아론이 총회를 그 반석 앞에 모으고 모세가 그들에게 이르되 패역한 너희여 들으라 우리가 너희를 위하여 이 반석에서 물을 내랴 하고
11 ११ मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
그 손을 들어 그 지팡이로 반석을 두번 치매 물이 많이 솟아 나오므로 회중과 그들의 짐승이 마시니라
12 १२ पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.
여호와께서 모세와 아론에게 이르시되 너희가 나를 믿지 아니하고 이스라엘 자손의 목전에 나의 거룩함을 나타내지 아니한 고로 너희는 이 총회를 내가 그들에게 준 땅으로 인도하여 들이지 못하리라 하시니라
13 १३ त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
이스라엘 자손이 여호와와 다투었으므로 이를 므리바 물이라 하니라 여호와께서 그들 중에서 그 거룩함을 나타내셨더라
14 १४ मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
모세가 가데스에서 에돔 왕에게 사자를 보내며 이르되 `당신의 형제 이스라엘의 말에 우리의 당한 모든 고난을 당신도 아시거니와
15 १५ खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
우리 열조가 애굽으로 내려갔으므로 우리가 애굽에 오래 거하였더니 애굽인이 우리 열조와 우리를 학대하였으므로
16 १६ पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.
우리가 여호와께 부르짖었더니 우리 소리를 들으시고 천사를 보내사 우리를 애굽에서 인도하여 내셨나이다 이제 우리가 당신의 변방 모퉁이 한 성읍 가데스에 있사오니
17 १७ कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
청컨대 우리로 당신의 땅을 통과하게 하소서 우리가 밭으로나 포도원으로나 통과하지 아니하고 우물물도 공히 마시지 아니하고 우리가 왕의 대로로만 통과하고 당신의 지경에서 나가기까지 좌편으로나 우편으로 치우치지 아니하리이다 한다 하라' 하였더니
18 १८ परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
에돔 왕이 대답하되 `너는 우리 가운데로 통과하지 못하리라 내가 나가서 칼로 너를 맞을까 염려하라'
19 १९ इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
이스라엘 자손이 이르되 `우리가 대로로 통과하겠고 우리나 우리 짐승이 당신의 물을 마시면 그 값을 줄 것이라 우리가 도보로 통과할 뿐인즉 아무 일도 없으리이다' 하나
20 २० पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला.
그는 가로되 `너는 지나가지 못하리라' 하고 에돔 왕이 많은 백성을 거느리고 나와서 강한 손으로 막으니
21 २१ अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
에돔 왕이 이같이 이스라엘의 그 경내로 통과함을 용납지 아니하므로 이스라엘이 그들에게서 돌이키니라
22 २२ इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.
이스라엘 자손 곧 온 회중이 가데스에서 진행하여 호르산에 이르렀더니
23 २३ होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
여호와께서 에돔 땅 변경 호르산에서 모세와 아론에게 말씀하시니라 가라사대
24 २४ अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांस ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.
아론은 그 열조에게로 돌아가고 내가 이스라엘 자손에게 준 땅에는 들어가지 못하리니 이는 너희가 므리바 물에서 내 말을 거역한 연고니라
25 २५ आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
너는 아론과 그 아들 엘르아살을 데리고 호르산에 올라
26 २६ अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल.
아론의 옷을 벗겨 그 아들 엘르아살에게 입히라 아론은 거기서 죽어 그 열조에게로 돌아가리라
27 २७ मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले.
모세가 여호와의 명을 좇아 그들과 함께 회중의 목전에서 호르산에 오르니라
28 २८ मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
모세가 아론의 옷을 벗겨 그 아들 엘르아살에게 입히매 아론이 그 산꼭대기에서 죽으니라 모세와 엘르아살이 산에서 내려오니
29 २९ इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.
온 회중 곧 이스라엘 온 족속이 아론의 죽은 것을 보고 위하여 삼십일을 애곡하였더라