< गणना 2 >

1 परमेश्वर, मोशे व अहरोन यांच्याशी पुन्हा बोलला, तो म्हणाला,
خداوند به موسی و هارون فرمود:
2 इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे.
«قبایل بنی‌اسرائیل باید گرداگرد خیمهٔ ملاقات با فاصلهٔ معینی از آن اردو بزنند و هر یک پرچم و نشان ویژهٔ خود را داشته باشند.»
3 यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.
جایگاه قبیله‌ها به ترتیب زیر بود: قبیله رهبر تعداد یهودا نحشون (پسر عمیناداب) ۷۴٬۶۰۰ نفر یساکار نتنائیل (پسر صوغر) ۵۴٬۴۰۰ نفر زبولون الی‌آب (پسر حیلون) ۵۷٬۴۰۰ نفر بنابراین، تعداد کل افراد ساکن در بخش یهودا که در سمت شرقی اردوگاه قرار داشت، ۱۸۶٬۴۰۰ نفر بود. هرگاه بنی‌اسرائیل به مکان تازه‌ای کوچ می‌کردند، این سه قبیله به ترتیب، پیشاپیش آنها حرکت می‌کردند و راه را نشان می‌دادند. قبیله رهبر تعداد رئوبین الیصور (پسر شدی‌ئور) ۴۶٬۵۰۰ نفر شمعون شلومی‌ئیل (پسر صوریشدای) ۵۹٬۳۰۰ نفر جاد الیاساف (پسر دعوئیل) ۴۵٬۶۵۰ نفر بنابراین، تعداد کل افراد ساکن در بخش رئوبین که در سمت جنوبی اردوگاه قرار داشت، ۱۵۱٬۴۵۰ نفر بود. هر وقت بنی‌اسرائیل کوچ می‌کردند، این سه قبیله به ترتیب در ردیف بعدی قرار می‌گرفتند. پشت سر این دو ردیف، لاویان با خیمهٔ عبادت حرکت می‌کردند. هنگام کوچ، افراد هر قبیله زیر علم خاص خود، دسته جمعی حرکت می‌کردند، به همان ترتیبی که در اردوگاه، هر قبیله از قبیلهٔ دیگر جدا بود. قبیله رهبر تعداد افرایم الیشمع (پسر عمیهود) ۴۰٬۵۰۰ نفر منسی جملی‌ئیل (پسر فدهصور) ۳۲٬۲۰۰ نفر بنیامین ابیدان (پسر جدعونی) ۳۵٬۴۰۰ نفر بنابراین، تعداد کل افراد ساکن در بخش افرایم که در سمت غربی اردوگاه قرار داشت، ۱۰۸٬۱۰۰ نفر بود. موقع کوچ کردن، این سه قبیله به ترتیب در ردیف بعدی قرار داشتند. قبیله رهبر تعداد دان اخیعزر (پسر عمیشدای) ۶۲٬۷۰۰ نفر اشیر فجعی‌ئیل (پسر عکران) ۴۱٬۵۰۰ نفر نفتالی اخیرع (پسر عینان) ۵۳٬۴۰۰ نفر بنابراین تعداد کل افراد ساکن در بخش دان که در سمت شمالی اردوگاه قرار داشت، ۱۵۷٬۶۰۰ نفر بود. هنگام کوچ، این سه قبیله به ترتیب، پس از همه حرکت می‌کردند.
4 त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
5 इस्साखार वंशाच्या लोकांनी यहूदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.
6 त्याच्या दलात चौपन्न हजार चारशे लोक होते.
7 जबुलून वंशाच्या लोकांनीही यहूदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.
8 त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.
9 यहूदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहूदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.
10 १० पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
11 ११ त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.
12 १२ शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
13 १३ त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशे लोक होते.
14 १४ गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.
15 १५ त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास लोक होते.
16 १६ रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशे पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.
17 १७ त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक मनुष्याने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ रहावे.
18 १८ एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा.
19 १९ त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
20 २० मनश्शे वंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा.
21 २१ त्याच्या दलात बत्तीस हजार दोनशे लोक होते.
22 २२ बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाचा प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा.
23 २३ त्याच्या दलात पस्तीस हजार चारशे लोक होते.
24 २४ एफ्राइम वंशाच्या छावणीत एकूण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.
25 २५ दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर हा दानवंशाचा सरदार असावा.
26 २६ त्याच्या दलात बासष्ट हजार सातशे लोक होते.
27 २७ आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.
28 २८ त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.
29 २९ नफताली वंशाचे लोक. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.
30 ३० त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशे लोक होते.
31 ३१ दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशे लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे.
32 ३२ अशी इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास होती.
پس تعداد کل سپاهیان بنی‌اسرائیل، ۶۰۳٬۵۵۰ نفر بود (غیر از لاویان که به دستور خداوند سرشماری نشدند).
33 ३३ मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.
34 ३४ तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपआपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.
به این ترتیب قوم اسرائیل طبق دستوری که خداوند به موسی داده بود، عمل کردند؛ آنان با خاندان و خانوادهٔ خود کوچ می‌کردند و زیر پرچم قبیلهٔ خود اردو می‌زدند.

< गणना 2 >