< गणना 18 >
1 १ परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.
E o SENHOR disse a Arão: Tu e teus filhos, e a casa de teu pai contigo, levareis o pecado do santuário: e tu e teus filhos contigo levareis o pecado de vosso sacerdócio.
2 २ तुझ्या वंशातील इतर लेवी लोकांस आण. तुझ्याबरोबर आणि साक्षपटाच्या तंबूत काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.
E a teus irmãos também, a tribo de Levi, a tribo de teu pai, faze-os chegar a ti, e juntem-se contigo, e te servirão; e tu e teus filhos contigo servireis diante do tabernáculo do testemunho.
3 ३ लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
E guardarão o que tu ordenares, e o cargo de todo o tabernáculo: mas não chegarão aos utensílios santos nem ao altar, para que não morram eles e vós.
4 ४ ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये.
Eles se juntarão, pois, contigo, e terão o cargo do tabernáculo do testemunho em todo o serviço do tabernáculo; nenhum estranho se há de chegar a vós.
5 ५ पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही.
E tereis a guarda do santuário, e a guarda do altar, para que não seja mais a ira sobre os filhos de Israel.
6 ६ इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी वंशाच्या लोकांस निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांस मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपामध्ये काम करतील.
Porque eis que eu tomei os vossos irmãos, os levitas, dentre os filhos de Israel, são dados a vós como presente da parte do SENHOR, para que sirvam no ministério do tabernáculo do testemunho.
7 ७ पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल.
Porém tu e teus filhos contigo guardareis vosso sacerdócio em todo negócio do altar, e do véu dentro, e ministrareis. Eu vos dei como presente o serviço de vosso sacerdócio; e o estranho que se aproximar morrerá.
8 ८ नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय.
Disse mais o SENHOR a Arão: Eis que eu te dei também a guarda de minhas ofertas: todas as coisas consagradas dos filhos de Israel te dei por razão da unção, e a teus filhos, por estatuto perpétuo.
9 ९ लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
Isto será teu da oferta das coisas santas separadas do fogo: toda oferta deles, toda oferta de alimentos deles, e toda expiação pelo pecado deles, que me restituirão, será coisa santíssima para ti e para os teus filhos.
10 १० त्या गोष्टी फक्त पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
No santuário a comerás; todo homem comerá dela: coisa santa será para ti.
11 ११ आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व मनुष्यांनी ती खावी.
Isto também será teu: a oferta elevada de suas doações, e todas as ofertas movidas dos filhos de Israel, dei a ti, e aos teus filhos, e às tuas filhas contigo, por estatuto perpétuo; todo o limpo na tua casa comerá delas.
12 १२ आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
De azeite, e de mosto, e de trigo, tudo o mais escolhido, as primícias disso, que apresentarão ao SENHOR, a ti as dei.
13 १३ लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
As primícias de todas as coisas da terra deles, as quais trarão ao SENHOR, serão tuas: todo limpo em tua casa comerá delas.
14 १४ इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.
Todo o consagrado por voto em Israel será teu.
15 १५ स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
Todo o que abrir madre em toda carne que oferecerão ao SENHOR, tanto de homens como de animais, será teu: mas farás resgatar o primogênito do homem: também farás resgatar o primogênito de animal impuro.
16 १६ ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे.
E de um mês farás efetuar o resgate deles, conforme tua avaliação, por preço de cinco siclos, ao siclo do santuário, que é de vinte óbolos.
17 १७ परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास संतोष देतो.
Mas o primogênito de vaca, e o primogênito de ovelha, e o primogênito de cabra, não resgatarás; são santificados; o sangue deles espargirás sobre o altar, e queimarás a gordura deles, como oferta queimada em cheiro suave ao SENHOR.
18 १८ पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल.
E a carne deles será tua: como o peito da oferta movida e como a coxa direita, será tua.
19 १९ “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
Todas as ofertas elevadas das coisas santas, que os filhos de Israel oferecerem ao SENHOR, dei-as a ti, e a teus filhos e a tuas filhas contigo, por estatuto perpétuo: pacto de sal perpétuo é diante do SENHOR para ti e para tua descendência contigo.
20 २० परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.
E o SENHOR disse a Arão: Da terra deles não terás herança, nem entre eles terás parte: Eu sou tua parte e tua herança em meio dos filhos de Israel.
21 २१ लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.
E eis que eu dei aos filhos de Levi todos os dízimos em Israel por herança, por seu ministério, porquanto eles servem no ministério do tabernáculo do testemunho.
22 २२ यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील.
E não chegarão mais os filhos de Israel ao tabernáculo do testemunho, para que não levem pecado, pelo qual morram.
23 २३ लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.
Mas os levitas farão o serviço do tabernáculo do testemunho, e eles levarão sua iniquidade: estatuto perpétuo por vossas gerações; e não possuirão herança entre os filhos de Israel.
24 २४ परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वरास अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही.
Porque aos levitas dei por herança os dízimos dos filhos de Israel, que oferecerão ao SENHOR em oferta; pelo qual lhes disse: Entre os filhos de Israel não possuirão herança.
25 २५ परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
E falou o SENHOR a Moisés, dizendo:
26 २६ तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.
Assim falarás aos levitas, e lhes dirás: Quando receberdes dos filhos de Israel os dízimos que da parte deles vos dei por vossa herança, deles oferecereis em oferta movida ao SENHOR, o dízimo dos dízimos.
27 २७ हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षरसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल.
E a vossa oferta vos será contada como o grão da eira, e como a plenitude da prensa de uvas.
28 २८ याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वरास अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वरास जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.
Assim também vós oferecereis uma oferta ao SENHOR de todos os vossos dízimos que receberdes dos filhos de Israel; e deles dareis a oferta do SENHOR ao sacerdote Arão.
29 २९ इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.
De todas as vossas doações oferecereis toda oferta ao SENHOR; de todo o melhor delas oferecereis a porção que será consagrada.
30 ३० “मोशे लेवी लोकांस सांग, तुम्ही त्यातून जे उत्तम त्याची उचलणी करता तेव्हा ते लेव्यांकडे, खळ्यातले उत्पन्न आणि द्राक्षरसाच्या कुंडातले उत्पन्न यासारखे मोजले जाईल.
E lhes dirás: Quando oferecerdes o melhor delas, será contado aos levitas por fruto da eira, e como produto da prensa de uvas.
31 ३१ उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपामध्ये जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
E o comereis em qualquer lugar, vós e vossa família; pois é vossa remuneração por vosso ministério no tabernáculo do testemunho.
32 ३२ आणि जर तुम्ही सर्वांत चांगला भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हास पाप लागणार नाही. इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.”
E quando vós houverdes oferecido disso o melhor seu, não levareis por ele pecado: e não haveis de contaminar as coisas santas dos filhos de Israel, e não morrereis.