< गणना 16 >

1 कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली.
וַיִּקַּח קֹרַח בֶּן־יִצְהָר בֶּן־קְהָת בֶּן־לֵוִי וְדָתָן וַאֲבִירָם בְּנֵי אֱלִיאָב וְאוֹן בֶּן־פֶּלֶת בְּנֵי רְאוּבֵֽן׃
2 या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते.
וַיָּקֻמוּ לִפְנֵי מֹשֶׁה וַאֲנָשִׁים מִבְּנֵֽי־יִשְׂרָאֵל חֲמִשִּׁים וּמָאתָיִם נְשִׂיאֵי עֵדָה קְרִאֵי מוֹעֵד אַנְשֵׁי־שֵֽׁם׃
3 ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत: ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
וַיִּֽקָּהֲלוּ עַל־מֹשֶׁה וְעַֽל־אַהֲרֹן וַיֹּאמְרוּ אֲלֵהֶם רַב־לָכֶם כִּי כׇל־הָֽעֵדָה כֻּלָּם קְדֹשִׁים וּבְתוֹכָם יְהֹוָה וּמַדּוּעַ תִּֽתְנַשְּׂאוּ עַל־קְהַל יְהֹוָֽה׃
4 जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.
וַיִּשְׁמַע מֹשֶׁה וַיִּפֹּל עַל־פָּנָֽיו׃
5 मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा मनुष्य आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या मनुष्यास त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या मनुष्याची निवड करील आणि त्यास स्वत: जवळ आणिल.
וַיְדַבֵּר אֶל־קֹרַח וְאֶֽל־כׇּל־עֲדָתוֹ לֵאמֹר בֹּקֶר וְיֹדַע יְהֹוָה אֶת־אֲשֶׁר־לוֹ וְאֶת־הַקָּדוֹשׁ וְהִקְרִיב אֵלָיו וְאֵת אֲשֶׁר יִבְחַר־בּוֹ יַקְרִיב אֵלָֽיו׃
6 म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा.
זֹאת עֲשׂוּ קְחוּ־לָכֶם מַחְתּוֹת קֹרַח וְכׇל־עֲדָתֽוֹ׃
7 उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
וּתְנוּ בָהֵן ׀ אֵשׁ וְשִׂימוּ עֲלֵיהֶן ׀ קְטֹרֶת לִפְנֵי יְהֹוָה מָחָר וְהָיָה הָאִישׁ אֲשֶׁר־יִבְחַר יְהֹוָה הוּא הַקָּדוֹשׁ רַב־לָכֶם בְּנֵי לֵוִֽי׃
8 मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
וַיֹּאמֶר מֹשֶׁה אֶל־קֹרַח שִׁמְעוּ־נָא בְּנֵי לֵוִֽי׃
9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
הַמְעַט מִכֶּם כִּֽי־הִבְדִּיל אֱלֹהֵי יִשְׂרָאֵל אֶתְכֶם מֵעֲדַת יִשְׂרָאֵל לְהַקְרִיב אֶתְכֶם אֵלָיו לַעֲבֹד אֶת־עֲבֹדַת מִשְׁכַּן יְהֹוָה וְלַעֲמֹד לִפְנֵי הָעֵדָה לְשָׁרְתָֽם׃
10 १० परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात.
וַיַּקְרֵב אֹֽתְךָ וְאֶת־כׇּל־אַחֶיךָ בְנֵי־לֵוִי אִתָּךְ וּבִקַּשְׁתֶּם גַּם־כְּהֻנָּֽה׃
11 ११ तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
לָכֵן אַתָּה וְכׇל־עֲדָתְךָ הַנֹּעָדִים עַל־יְהֹוָה וְאַהֲרֹן מַה־הוּא כִּי (תלונו) [תַלִּינוּ] עָלָֽיו׃
12 १२ नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही.
וַיִּשְׁלַח מֹשֶׁה לִקְרֹא לְדָתָן וְלַאֲבִירָם בְּנֵי אֱלִיאָב וַיֹּאמְרוּ לֹא נַעֲלֶֽה׃
13 १३ तू आम्हास रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
הַמְעַט כִּי הֶֽעֱלִיתָנוּ מֵאֶרֶץ זָבַת חָלָב וּדְבַשׁ לַהֲמִיתֵנוּ בַּמִּדְבָּר כִּֽי־תִשְׂתָּרֵר עָלֵינוּ גַּם־הִשְׂתָּרֵֽר׃
14 १४ आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
אַף לֹא אֶל־אֶרֶץ זָבַת חָלָב וּדְבַשׁ הֲבִיאֹתָנוּ וַתִּתֶּן־לָנוּ נַחֲלַת שָׂדֶה וָכָרֶם הַעֵינֵי הָאֲנָשִׁים הָהֵם תְּנַקֵּר לֹא נַעֲלֶֽה׃
15 १५ म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वरास म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेही वाईट केले नाही.
וַיִּחַר לְמֹשֶׁה מְאֹד וַיֹּאמֶר אֶל־יְהֹוָה אַל־תֵּפֶן אֶל־מִנְחָתָם לֹא חֲמוֹר אֶחָד מֵהֶם נָשָׂאתִי וְלֹא הֲרֵעֹתִי אֶת־אַחַד מֵהֶֽם׃
16 १६ नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
וַיֹּאמֶר מֹשֶׁה אֶל־קֹרַח אַתָּה וְכׇל־עֲדָתְךָ הֱיוּ לִפְנֵי יְהֹוָה אַתָּה וָהֵם וְאַהֲרֹן מָחָֽר׃
17 १७ तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वरास द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
וּקְחוּ ׀ אִישׁ מַחְתָּתוֹ וּנְתַתֶּם עֲלֵיהֶם קְטֹרֶת וְהִקְרַבְתֶּם לִפְנֵי יְהֹוָה אִישׁ מַחְתָּתוֹ חֲמִשִּׁים וּמָאתַיִם מַחְתֹּת וְאַתָּה וְאַהֲרֹן אִישׁ מַחְתָּתֽוֹ׃
18 १८ म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
וַיִּקְחוּ אִישׁ מַחְתָּתוֹ וַיִּתְּנוּ עֲלֵיהֶם אֵשׁ וַיָּשִׂימוּ עֲלֵיהֶם קְטֹרֶת וַֽיַּעַמְדוּ פֶּתַח אֹהֶל מוֹעֵד וּמֹשֶׁה וְאַהֲרֹֽן׃
19 १९ कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
וַיַּקְהֵל עֲלֵיהֶם קֹרַח אֶת־כׇּל־הָעֵדָה אֶל־פֶּתַח אֹהֶל מוֹעֵד וַיֵּרָא כְבוֹד־יְהֹוָה אֶל־כׇּל־הָעֵדָֽה׃
20 २० परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה וְאֶֽל־אַהֲרֹן לֵאמֹֽר׃
21 २१ या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.
הִבָּדְלוּ מִתּוֹךְ הָעֵדָה הַזֹּאת וַאֲכַלֶּה אֹתָם כְּרָֽגַע׃
22 २२ पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.
וַיִּפְּלוּ עַל־פְּנֵיהֶם וַיֹּאמְרוּ אֵל אֱלֹהֵי הָרוּחֹת לְכׇל־בָּשָׂר הָאִישׁ אֶחָד יֶחֱטָא וְעַל כׇּל־הָעֵדָה תִּקְצֹֽף׃
23 २३ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
24 २४ सर्व लोकांस कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.
דַּבֵּר אֶל־הָעֵדָה לֵאמֹר הֵֽעָלוּ מִסָּבִיב לְמִשְׁכַּן־קֹרַח דָּתָן וַאֲבִירָֽם׃
25 २५ मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्यांच्यामागे गेले.
וַיָּקׇם מֹשֶׁה וַיֵּלֶךְ אֶל־דָּתָן וַאֲבִירָם וַיֵּלְכוּ אַחֲרָיו זִקְנֵי יִשְׂרָאֵֽל׃
26 २६ मोशेने सर्व लोकांस बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.
וַיְדַבֵּר אֶל־הָעֵדָה לֵאמֹר סוּרוּ נָא מֵעַל אׇהֳלֵי הָאֲנָשִׁים הָֽרְשָׁעִים הָאֵלֶּה וְאַֽל־תִּגְּעוּ בְּכׇל־אֲשֶׁר לָהֶם פֶּן־תִּסָּפוּ בְּכׇל־חַטֹּאתָֽם׃
27 २७ म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले.
וַיֵּעָלוּ מֵעַל מִשְׁכַּן־קֹרַח דָּתָן וַאֲבִירָם מִסָּבִיב וְדָתָן וַאֲבִירָם יָצְאוּ נִצָּבִים פֶּתַח אׇֽהֳלֵיהֶם וּנְשֵׁיהֶם וּבְנֵיהֶם וְטַפָּֽם׃
28 २८ नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हास सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हास दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हास दाखवीन.
וַיֹּאמֶר מֹשֶׁה בְּזֹאת תֵּֽדְעוּן כִּֽי־יְהֹוָה שְׁלָחַנִי לַעֲשׂוֹת אֵת כׇּל־הַֽמַּעֲשִׂים הָאֵלֶּה כִּי־לֹא מִלִּבִּֽי׃
29 २९ हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही.
אִם־כְּמוֹת כׇּל־הָֽאָדָם יְמֻתוּן אֵלֶּה וּפְקֻדַּת כׇּל־הָאָדָם יִפָּקֵד עֲלֵיהֶם לֹא יְהֹוָה שְׁלָחָֽנִי׃
30 ३० पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.” (Sheol h7585)
וְאִם־בְּרִיאָה יִבְרָא יְהֹוָה וּפָצְתָה הָאֲדָמָה אֶת־פִּיהָ וּבָלְעָה אֹתָם וְאֶת־כׇּל־אֲשֶׁר לָהֶם וְיָרְדוּ חַיִּים שְׁאֹלָה וִֽידַעְתֶּם כִּי נִֽאֲצוּ הָאֲנָשִׁים הָאֵלֶּה אֶת־יְהֹוָֽה׃ (Sheol h7585)
31 ३१ जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
וַיְהִי כְּכַלֹּתוֹ לְדַבֵּר אֵת כׇּל־הַדְּבָרִים הָאֵלֶּה וַתִּבָּקַע הָאֲדָמָה אֲשֶׁר תַּחְתֵּיהֶֽם׃
32 ३२ धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
וַתִּפְתַּח הָאָרֶץ אֶת־פִּיהָ וַתִּבְלַע אֹתָם וְאֶת־בָּתֵּיהֶם וְאֵת כׇּל־הָאָדָם אֲשֶׁר לְקֹרַח וְאֵת כׇּל־הָרְכֽוּשׁ׃
33 ३३ ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले. (Sheol h7585)
וַיֵּרְדוּ הֵם וְכׇל־אֲשֶׁר לָהֶם חַיִּים שְׁאֹלָה וַתְּכַס עֲלֵיהֶם הָאָרֶץ וַיֹּאבְדוּ מִתּוֹךְ הַקָּהָֽל׃ (Sheol h7585)
34 ३४ इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.
וְכׇל־יִשְׂרָאֵל אֲשֶׁר סְבִיבֹתֵיהֶם נָסוּ לְקֹלָם כִּי אָֽמְרוּ פֶּן־תִּבְלָעֵנוּ הָאָֽרֶץ׃
35 ३५ नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला.
וְאֵשׁ יָצְאָה מֵאֵת יְהֹוָה וַתֹּאכַל אֵת הַחֲמִשִּׁים וּמָאתַיִם אִישׁ מַקְרִיבֵי הַקְּטֹֽרֶת׃
36 ३६ परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला व म्हणाला
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
37 ३७ याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत आणि तो अग्नी पसरावयाला सांग.
אֱמֹר אֶל־אֶלְעָזָר בֶּן־אַהֲרֹן הַכֹּהֵן וְיָרֵם אֶת־הַמַּחְתֹּת מִבֵּין הַשְּׂרֵפָה וְאֶת־הָאֵשׁ זְרֵה־הָלְאָה כִּי קָדֵֽשׁוּ׃
38 ३८ लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल.
אֵת מַחְתּוֹת הַֽחַטָּאִים הָאֵלֶּה בְּנַפְשֹׁתָם וְעָשׂוּ אֹתָם רִקֻּעֵי פַחִים צִפּוּי לַמִּזְבֵּחַ כִּֽי־הִקְרִיבֻם לִפְנֵֽי־יְהֹוָה וַיִּקְדָּשׁוּ וְיִֽהְיוּ לְאוֹת לִבְנֵי יִשְׂרָאֵֽל׃
39 ३९ म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली.
וַיִּקַּח אֶלְעָזָר הַכֹּהֵן אֵת מַחְתּוֹת הַנְּחֹשֶׁת אֲשֶׁר הִקְרִיבוּ הַשְּׂרֻפִים וַֽיְרַקְּעוּם צִפּוּי לַמִּזְבֵּֽחַ׃
40 ४० परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
זִכָּרוֹן לִבְנֵי יִשְׂרָאֵל לְמַעַן אֲשֶׁר לֹֽא־יִקְרַב אִישׁ זָר אֲשֶׁר לֹא מִזֶּרַע אַהֲרֹן הוּא לְהַקְטִיר קְטֹרֶת לִפְנֵי יְהֹוָה וְלֹֽא־יִהְיֶה כְקֹרַח וְכַעֲדָתוֹ כַּאֲשֶׁר דִּבֶּר יְהֹוָה בְּיַד־מֹשֶׁה לֽוֹ׃
41 ४१ दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.
וַיִּלֹּנוּ כׇּל־עֲדַת בְּנֵֽי־יִשְׂרָאֵל מִֽמׇּחֳרָת עַל־מֹשֶׁה וְעַֽל־אַהֲרֹן לֵאמֹר אַתֶּם הֲמִתֶּם אֶת־עַם יְהֹוָֽה׃
42 ४२ मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्यास झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
וַיְהִי בְּהִקָּהֵל הָֽעֵדָה עַל־מֹשֶׁה וְעַֽל־אַהֲרֹן וַיִּפְנוּ אֶל־אֹהֶל מוֹעֵד וְהִנֵּה כִסָּהוּ הֶעָנָן וַיֵּרָא כְּבוֹד יְהֹוָֽה׃
43 ४३ हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.
וַיָּבֹא מֹשֶׁה וְאַהֲרֹן אֶל־פְּנֵי אֹהֶל מוֹעֵֽד׃
44 ४४ मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
וַיְדַבֵּר יְהֹוָה אֶל־מֹשֶׁה לֵּאמֹֽר׃
45 ४५ त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.
הֵרֹמּוּ מִתּוֹךְ הָעֵדָה הַזֹּאת וַאֲכַלֶּה אֹתָם כְּרָגַע וַֽיִּפְּלוּ עַל־פְּנֵיהֶֽם׃
46 ४६ नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.
וַיֹּאמֶר מֹשֶׁה אֶֽל־אַהֲרֹן קַח אֶת־הַמַּחְתָּה וְתֶן־עָלֶיהָ אֵשׁ מֵעַל הַמִּזְבֵּחַ וְשִׂים קְטֹרֶת וְהוֹלֵךְ מְהֵרָה אֶל־הָעֵדָה וְכַפֵּר עֲלֵיהֶם כִּֽי־יָצָא הַקֶּצֶף מִלִּפְנֵי יְהֹוָה הֵחֵל הַנָּֽגֶף׃
47 ४७ म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले.
וַיִּקַּח אַהֲרֹן כַּאֲשֶׁר ׀ דִּבֶּר מֹשֶׁה וַיָּרׇץ אֶל־תּוֹךְ הַקָּהָל וְהִנֵּה הֵחֵל הַנֶּגֶף בָּעָם וַיִּתֵּן אֶֽת־הַקְּטֹרֶת וַיְכַפֵּר עַל־הָעָֽם׃
48 ४८ अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली.
וַיַּעֲמֹד בֵּֽין־הַמֵּתִים וּבֵין הַֽחַיִּים וַתֵּעָצַר הַמַּגֵּפָֽה׃
49 ४९ पण त्या मरीमुळे चौदा हजार सातशे लोक मरण पावले. यामध्ये कोरहामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.
וַיִּהְיוּ הַמֵּתִים בַּמַּגֵּפָה אַרְבָּעָה עָשָׂר אֶלֶף וּשְׁבַע מֵאוֹת מִלְּבַד הַמֵּתִים עַל־דְּבַר־קֹֽרַח׃
50 ५० भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.
וַיָּשׇׁב אַהֲרֹן אֶל־מֹשֶׁה אֶל־פֶּתַח אֹהֶל מוֹעֵד וְהַמַּגֵּפָה נֶעֱצָֽרָה׃

< गणना 16 >