< गणना 15 >
1 १ मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
上主訓示梅瑟說:「
2 २ इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग. परमेश्वर तुम्हास एक देश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे पोहचाल,
你吩咐以色列子民說:你們進入了我賜給你們居住的地方時,
3 ३ आणि तुम्ही परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे यांचे परमेश्वराकरता अर्पण कराल, मग ते होमार्पणाचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या सणातला तो यज्ञ असो.
如要以牛或羊獻給上主作火祭,或作全燔祭,或作任何祭獻,或為還願,或出於自願,或因逢節期,以之作為悅樂上主的馨香祭,
4 ४ जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.
獻祭的人應給上主加獻十分之一「厄法」細麵,調和四分之一「辛」油,作為素祭。
5 ५ प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर.
此外,為全燔祭或為任何祭獻,還應奠上酒:為每隻公羔羊,奠四分之一「辛」酒。
6 ६ अन्नार्पण म्हणून प्रत्येक मेंढ्यामागे एकतृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.
如果是隻公綿羊,應加獻十分之二「厄法」細麵,調和上三分之一「辛」油,作為素祭;
7 ७ परमेश्वरास सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे.
再奠上三分之一「辛」酒,作為悅樂上主的馨香祭。
8 ८ जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा.
如果你以一隻牛犢獻作全燔祭或任何祭獻,或為還願,或獻與上主作和平祭,
9 ९ तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
除牛犢外,還應加獻十分之三「厄法」細麵,調和上半「辛」油,作為素祭;
10 १० तू पेयार्पणासाठी अर्धा हीन द्राक्षरस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वरास सुवासाचे अर्पण कर.
再奠上半「辛」酒,作為悅樂上主的馨香火祭。
11 ११ तुम्ही परमेश्वरास जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे.
每獻一頭公牛,或一隻公綿羊,或一隻公羔羊,或一隻公山羊,都應照此而行;
12 १२ तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.
你們所獻的數目無論多少,為每一隻都應照此而行。
13 १३ अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वरास सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.
本地人不論誰,獻悅樂上主的馨香火祭時,都應這樣行。
14 १४ तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेही केले पाहिजे.
幾時一個與你們同住的,或與你們的後代同住的外方人,願獻悅樂上主的馨香火祭,你們怎樣行,他也應怎樣行。
15 १५ हेच नियम सर्वांना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
全會眾,不論是為你們,或為與你們同住的外方人,只有一樣的規定;這為你們世世代代,是一永遠的規定:在上主面前你們與外方人一樣;
16 १६ हे नियम व विधी तुम्हास आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.
為你們和與你們同住的外方人,只有一種法律,只有一種制度。」
17 १७ परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
上主訓示梅瑟說:「
18 १८ इस्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पोहचाल.
你吩咐以色列子民說:幾時你們進入了我引你們去的地方,
19 १९ जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.
吃那地方的食糧時,應拿一分獻給上主作禮品:
20 २० मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.
由初熟的麥麵團中,獻一個餅作禮品,有如奉獻纔從禾場打下之物一樣。
21 २१ मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वरास पिढ्यानपिढ्या द्यावा.
你們世世代代,應從初熟麥麵團中取出,獻給上主作禮品。
22 २२ जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.
如果你們誤犯了過失,而沒有遵行上主向梅瑟所吩咐的某條誡命,
23 २३ परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हास मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत.
即上主藉梅瑟向你們所吩咐的,由上主出命之日起,直到你們世世代代,
24 २४ तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.
那麼,如果是會眾出於無心誤犯了過失,全會眾應獻一公牛犢當全燔祭,作為悅樂上主的馨香祭,並依照禮規獻素祭和奠酒禮,再獻一公山羊作贖罪祭。
25 २५ म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.
司祭應為以色列子民全會眾行贖罪禮,他們即可獲得赦免,因為這是無心之過。當他們為這無心之過,給上主奉獻了火祭,並在上主面前獻了贖罪祭後,
26 २६ इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
以色列子民全會眾以及住在你們中的外方人,都獲得赦免,因為全人民犯了無心之過。
27 २७ पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
如果是一人出於無心犯了罪,應獻一隻一歲的母山羊作贖罪祭。
28 २८ त्या मनुष्याने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
司祭為這犯無心之過的人,在上主面前行贖罪禮,因為他由於無心犯了罪;為他行了贖罪禮,他即可獲得赦免。
29 २९ जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
凡以色列子民,不拘是本地人或住在你們中的外方人,對誤犯過失的人,只有一條法律。
30 ३० पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या मनुष्यासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्यास आपल्या लोकांतून काढून टाकावे.
但如果一人,不論是本地人,或是外方人,敢大膽妄為,侮辱上主,這人應由民間剷除;
31 ३१ कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.
因為他輕視了上主的話,違犯了他的誡命,這人應被除滅,應自負罪債。」
32 ३२ यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले.
以色列子民尚在曠野的時候,遇見一人在安息日拾柴,
33 ३३ ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
遇見他拾柴的人,就帶他到梅瑟及亞郎和全會眾前;
34 ३४ त्यांनी त्या मनुष्यास तिथेच ठेवले कारण त्यास काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
他們將他押在看守所內,因為尚未指明應如何處置他。
35 ३५ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो मनुष्य मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावी.”
那時上主對梅瑟說:「這人應處死刑,全會眾應在營外用石頭將他砸死。」
36 ३६ म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
全會眾遂拉他到營外,用石頭砸死他,照上主對梅瑟所吩咐的。
37 ३७ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
上主訓示梅瑟說:「
38 ३८ इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.
你吩咐以色列子民,命他們世世代代,在自己衣邊上做上繸頭;衣邊的每個繸頭,應用紫繩繫著。
39 ३९ या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.
這繸頭是為叫你們一看見,就想起上主的誡命,依照遵行,免得你們隨從心中和眼目的慾望,而放縱淫亂。
40 ४० “माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे.
這樣,你們必對我的一切誡命,懷念不忘,依照遵行;這樣在你們的天主面前,你們常是聖潔的。
41 ४१ मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”
我上主是你們的天主,我領你們出埃及是為作你們的天主:我上主是你們的天主。」