< गणना 14 >
1 १ त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.
Tada zagraja sva zajednica i poče vikati. I te noći narod plakaše.
2 २ इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
Svi su Izraelci mrmljali protiv Mojsija i Arona. Sva im je zajednica govorila: “Kamo sreće da smo pomrli u zemlji egipatskoj! Ili da smo pomrli u ovoj pustinji!
3 ३ तलवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हास इथे आणले का? शत्रू आम्हास मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
Zašto nas Jahve vodi u tu zemlju da padnemo od mača a žene naše i djeca da postanu roblje! Zar nam ne bi bilo bolje da se vratimo u Egipat!”
4 ४ नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
Jedan je drugome govorio: “Postavimo sebi vođu i vratimo se u Egipat!”
5 ५ तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
Mojsije i Aron padoše ničice pred svom okupljenom izraelskom zajednicom.
6 ६ नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले होते त्यामधील हे दोघे होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली.
A Jošua, sin Nunov, i Kaleb, sin Jefuneov, koji bijahu među onima što su izviđali zemlju, razderaše svoju odjeću.
7 ७ ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.
Zatim rekoše svoj zajednici izraelskoj: “Zemlja kroz koju smo prošli da je istražimo izvanredno je dobra.
8 ८ जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.
Ako nam Jahve bude dobrostiv, u tu će nas zemlju dovesti i dat će nam je. To je zemlja u kojoj teče med i mlijeko.
9 ९ “परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”
Samo, nemojte se buniti protiv Jahve! Ne bojte se naroda one zemlje: tÓa on je zalogaj za nas. Oni su bez zaštite, a s nama je Jahve! Ne bojte ih se!”
10 १० पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांस दिसले.
I dok je sva zajednica već mislila da ih kamenuje, pokaza se Slava Jahvina u Šatoru sastanka svima sinovima Izraelovim.
11 ११ परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
Tada reče Mojsiju: “Dokle će me taj narod prezirati? Dokle mi neće vjerovati unatoč svim znamenjima što sam ih među njima izvodio?
12 १२ मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
Udarit ću ih pomorom i istrijebiti, a od tebe ću učiniti narod veći i moćniji od njega.”
13 १३ मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले.
Onda Mojsije reče Jahvi: “Egipćani su shvatili da si ti, svojom moći, izveo ovaj narod između njih.
14 १४ ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.
Oni su to kazali žiteljima one zemlje. Već su saznali da si ti, Jahve, usred ovog naroda, kojemu se očituješ licem u lice, i da ti, Jahve, u oblaku stojiš nad njima; da obdan u stupu od oblaka, a obnoć u stupu od ognja ideš pred njima.
15 १५ आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
Zato, ako pobiješ ovaj narod kao jednoga čovjeka, narodi koji su čuli glas o tebi reći će:
16 १६ परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.
'Jahve je bio nemoćan da dovede ovaj narod u zemlju koju mu je pod zakletvom obećao, i zato ih je poubijao u pustinji.'
17 १७ “म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,
Zato neka se snaga moga Gospodina uzvisi, kako si najavio rekavši:
18 १८ परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.
'Jahve je spor na srdžbu, a bogat milosrđem; podnosi opačinu i prijestup, ali krivca ne ostavlja nekažnjena, nego opačinu otaca kažnjava na djeci do trećega i četvrtog koljena.'
19 १९ मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”
Oprosti krivnju ovome narodu po veličini svoga milosrđa, kao što si vodio ovaj narod od Egipta dovde.”
20 २० परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”
“Opraštam po riječi tvojoj”, reče Jahve.
21 २१ पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.
“Ali ipak, tako ja živ bio i slave se Jahvine napunila sva zemlja,
22 २२ ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही.
ni jedan od ljudi koji su vidjeli slavu moju i znamenja što sam ih izveo u Egiptu i u pustinji, pa me ipak iskušavali već deset puta ne hoteći poslušati moj glas,
23 २३ मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.
neće vidjeti zemlje što sam je pod zakletvom obećao njihovim ocima; nitko od onih koji me preziru neće je vidjeti.
24 २४ पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल.
A slugu svoga Kaleba, jer je u njemu drukčiji duh i jer mi bijaše poslušan, njega ću ja dovesti u zemlju u koju je išao i njegovi će je potomci zaposjesti! Neka Amalečani i Kanaanci samo ostanu u dolini.
25 २५ अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.
Sutra se vratite i krenite u pustinju put Crvenog mora.”
26 २६ परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
Još reče Jahve Mojsiju i Aronu:
27 २७ ही दुष्ट मंडळी माझ्याविरूद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्राएली लोक माझ्याविरूद्ध तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत.
“Dokle će ta opaka zajednica mrmljati protiv mene? Čuo sam tužbe što ih Izraelci na me dižu.
28 २८ तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.
Kaži im: Tako ja živ bio, objavljuje Jahve, kako ste na moje uši govorili, tako ću vam i učiniti.
29 २९ तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले,
U ovoj pustinji popadat će vaša mrtva tijela: svih vas koji ste ubilježeni u bilo koji vaš popis od dvadeset godina pa naprijed, koji ste rogoborili protiv mene.
30 ३० ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.
Nećete ući u zemlju na koju sam svoju ruku digao da vas u njoj nastanim, osim Kaleba, sina Jefuneova, i Jošue, sina Nunova.
31 ३१ ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.
A vašu djecu, o kojoj kažete da bi postala roblje, njih ću uvesti da nastane zemlju što ste je vi prezreli.
32 ३२ आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.
A vi? Neka vam tjelesa popadaju u ovoj pustinji!
33 ३३ तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.
Vaši sinovi neka lutaju pustinjom četrdeset godina, neka trpe zbog vaše nevjere dok vam ne ispropadaju tjelesa u ovoj pustinji.
34 ३४ तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु: ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.
Prema broju dana u koje ste istraživali zemlju - dana četrdeset, za svaki dan jednu godinu - ispaštajte svoje opačine četrdeset godina. Iskusite što znači mene napustiti.
35 ३५ “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”
Ja, Jahve, to kažem: tako ću postupiti s ovom opakom zajednicom što se sjatila protiv mene. U ovoj istoj pustinji neka završi! Tu neka izgine.”
36 ३६ मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.
A oni ljudi koje Mojsije bijaše poslao da istraže zemlju i koji su nakon povratka potakli svu zajednicu da rogobori protiv njega ozloglašujući zemlju;
37 ३७ ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले.
oni, dakle, ljudi koji su zlobno ozloglasili zemlju bijahu pomoreni pred Jahvom.
38 ३८ यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.
Od onih ljudi koji su išli da istraže zemlju ostadoše na životu jedino Jošua, sin Nunov, i Kaleb, sin Jefuneov.
39 ३९ मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांस सांगितल्या. लोक खूप दु: खी झाले.
Kad je Mojsije prenio te riječi svim Izraelcima, narod se uvelike ražalosti.
40 ४० दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हास वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”
I uranivši ujutro počnu se uspinjati na vrh brda govoreći. “Evo uzlazimo na mjesto o kojem je govorio Jahve jer smo zgriješili.”
41 ४१ पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही.
A Mojsije rekne: “Zašto kršite zapovijed Jahvinu? Nećete uspjeti.
42 ४२ त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
Ne penjite se, da vas ne potuku vaši neprijatelji, jer Jahve nije među vama.
43 ४३ अमालेकी आणि कनानी लोक आहेत तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
Ta ondje se pred vama nalaze Amalečani i Kanaanci te ćete od mača pasti jer ste se odvratili od Jahve i jer Jahve neće biti s vama.”
44 ४४ परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
Ali se oni prkosno penjahu prema vrhu brda, iako se ni Kovčeg saveza Jahvina ni Mojsije nisu micali iz tabora.
45 ४५ डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मा नगरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
Amalečani i Kanaanci koji su živjeli na onome brdu spuste se, udare po njima i rasprše ih sve do Horme.