< गणना 12 >
1 १ मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले.
Wtedy Miriam i Aaron mówili [źle] przeciwko Mojżeszowi z powodu etiopskiej kobiety, którą pojął. Pojął bowiem za żonę Etiopkę;
2 २ ते म्हणाले, “परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले.”
I mówili: Czy PAN przemawiał tylko przez Mojżesza? Czy nie przemawiał też przez nas? A PAN to usłyszał.
3 ३ आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता.
A Mojżesz był człowiekiem bardzo pokornym, najbardziej ze wszystkich ludzi, którzy [żyli] na ziemi.
4 ४ तेव्हा परमेश्वर एकाएकी मोशे, अहरोन व मिर्याम ह्याच्याशी बोलला. “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा ते तिघे बाहेर आले.
I nagle PAN powiedział do Mojżesza, Aarona i Miriam: Wyjdźcie we troje do Namiotu Zgromadzenia. I wyszli we troje.
5 ५ परमेश्वर एका ढगाच्या खांबातून खाली आला मंडपाच्या प्रवेशदारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, अहरोन व मिर्याम तेव्हा ते दोघे पुढे आले.
Wtedy PAN zstąpił w słupie obłoku, stanął u wejścia do namiotu i wezwał Aarona i Miriam; a oni przyszli oboje.
6 ६ परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका. जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत, मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो, आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
I powiedział [do nich]: Słuchajcie teraz moich słów: Jeśli będzie wśród was prorok, ja, PAN, objawię mu się w widzeniu, będę mówił do niego we śnie.
7 ७ माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.
Lecz nie tak jest z moim sługą Mojżeszem, który [jest] wierny w całym moim domu.
8 ८ मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?
Z ust do ust mówię do niego, jawnie, a nie w zagadkach; on ogląda postać PANA. Dlaczego nie baliście się mówić [źle] przeciwko memu słudze Mojżeszowi?
9 ९ परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि नंतर तो त्यांना सोडून गेला.
I zapłonął gniew PANA przeciwko nim, i odszedł.
10 १० ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.
Obłok także odstąpił znad namiotu i oto Miriam stała się trędowata, [biała] jak śnieg. Gdy Aaron spojrzał na Miriam, oto była trędowata.
11 ११ अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको.
Wtedy Aaron powiedział do Mojżesza: Ach, mój panie! Proszę, nie poczytaj nam tego grzechu, że głupio postąpiliśmy i zgrzeszyliśmy.
12 १२ कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये.
Niech ona nie będzie jak martwy [płód], którego ciało jest już na wpół rozłożone, gdy wychodzi z łona swojej matki.
13 १३ म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर.
Wtedy Mojżesz zawołał do PANA: Boże, proszę, uzdrów ją teraz.
14 १४ परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
I PAN odpowiedział Mojżeszowi: Gdyby jej ojciec plunął jej w twarz, czyż nie musiałaby się wstydzić przez siedem dni? Niech przez siedem dni będzie wyłączona z obozu, a potem zostanie przyjęta.
15 १५ म्हणून त्यांनी मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
I Miriam została wyłączona z obozu na siedem dni. Lud jednak nie wyruszył, póki Miriam nie została przyjęta.
16 १६ त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.
Potem lud wyruszył z Chaserot i rozbił obóz na pustyni Paran.