< गणना 11 >
1 १ इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.
A lud zaczął się skarżyć, co się PANU nie podobało. Gdy więc PAN to usłyszał, bardzo się rozgniewał. I ogień PANA zapalił się przeciwko niemu i pochłonął krańce obozu.
2 २ तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला.
Wtedy wołał lud na Mojżesza, a Mojżesz pomodlił się do PANA i ogień zgasł.
3 ३ त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला.
I nazwał to miejsce Tabera, bo ogień PANA zapalił się przeciwko nim.
4 ४ जे परराष्ट्रीय इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल?
A pospólstwo, które było wśród nich, ogarnęło pragnienie. Synowie Izraela też płakali na nowo i mówili: Któż nas nakarmi mięsem?
5 ५ मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हास येते.
Wspominamy ryby, które jedliśmy w Egipcie za darmo, ogórki, melony, pory, cebulę i czosnek.
6 ६ आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
A teraz nasza dusza wyschła, bo nic innego [przed] oczami [nie mamy] oprócz tej manny.
7 ७ हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता.
A manna była jak nasienie kolendry, a jej kolor jak kolor bdellium.
8 ८ लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.
Ludzie wychodzili i zbierali ją, i mełli w żarnach albo tłukli w moździerzach, potem gotowali w kotłach i robili z niej placki. Jej smak był jak smak świeżej oliwy.
9 ९ जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.
Gdy bowiem nocą opadała rosa na obóz, spadała też na niego manna.
10 १० सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती.
Wtedy Mojżesz usłyszał, że lud płacze w swoich rodzinach, każdy przy wejściu do swojego namiotu. Wówczas mocno zapłonął gniew PANA, a i Mojżeszowi to się nie podobało.
11 ११ मोशे परमेश्वरास म्हणाला, तू आपल्या दासास इतके वाइट का वागवतोस? तू माझ्यावर प्रसन्न नाहीस का? या सर्व लोकांचा भार तू मला वाहण्यास सांगतोस.
I Mojżesz powiedział do PANA: Dlaczego tak źle się obchodzisz ze swoim sługą? Dlaczego nie znalazłem łaski w twoich oczach, że włożyłeś na mnie ciężar całego tego ludu?
12 १२ मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?
Czy ja począłem cały ten lud? Czy ja go zrodziłem, że mówisz do mnie: Nieś go na swoim łonie jak opiekun nosi niemowlę do ziemi, którą przysiągłeś ich ojcom?
13 १३ एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे!
Skąd wezmę mięso, aby dać całemu temu ludowi? Płaczą bowiem przede mną i mówią: Daj nam mięsa, abyśmy mogli jeść.
14 १४ मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे.
Nie mogę sam znosić całego tego ludu, gdyż jest dla mnie zbyt ciężki.
15 १५ जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
A jeśli tak ze mną postępujesz, to raczej zabij mnie, proszę, jeśli znalazłem łaskę w twoich oczach, abym nie patrzył na swoją niedolę.
16 १६ परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांस दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.
I PAN powiedział do Mojżesza: Zbierz mi siedemdziesięciu mężczyzn spośród starszych Izraela, o których wiesz, że są starszymi ludu oraz jego przełożonymi, przyprowadź ich do Namiotu Zgromadzenia i niech tam staną wraz z tobą.
17 १७ मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
A ja zstąpię i będę tam z tobą rozmawiał. Potem wezmę z ducha, który jest na tobie, i złożę na nich. Będą nosić razem z tobą brzemię ludu, abyś nie musiał go nosić ty sam.
18 १८ लोकांस सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल.
A do ludu powiesz: Poświęćcie się na jutro, a będziecie jeść mięso. Płakaliście bowiem, a to dotarło do uszu PANA: Któż nas nakarmi mięsem? Bo było nam lepiej w Egipcie! PAN da wam więc mięso i będziecie jeść.
19 १९ तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर,
Będziecie je jeść nie przez jeden dzień ani [nie] przez dwa dni, ani przez pięć, ani przez dziesięć dni, ani przez dwadzieścia dni;
20 २० परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर देश का सोडला?
Lecz przez cały miesiąc, aż wam wyjdzie przez nozdrza i zupełnie [wam] obrzydnie. Wzgardziliście bowiem PANEM, który jest wśród was, i płakaliście przed nim, mówiąc: Po co wyszliśmy z Egiptu?
21 २१ नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!
Mojżesz powiedział: Sześćset tysięcy pieszych liczy ten lud, pośród którego mieszkam, a ty powiedziałeś: Dam im mięsa i będą jeść przez cały miesiąc.
22 २२ आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?
Czy można zabić [tyle] owiec i wołów, aby im wystarczyło? Czy można dla nich zebrać wszystkie ryby morskie, aby mieli dosyć?
23 २३ परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”
PAN powiedział do Mojżesza: Czy ręka PANA jest zbyt krótka? Teraz zobaczysz, czy moje słowo się wypełni, czy też nie.
24 २४ मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले.
Mojżesz wyszedł więc i opowiedział ludowi słowa PANA. Następnie zebrał siedemdziesięciu mężczyzn spośród starszych ludu i postawił ich wokół namiotu.
25 २५ मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
Wtedy PAN zstąpił w obłoku i przemówił do niego. Potem wziął z ducha, który był na nim, i dał go siedemdziesięciu starszym. A gdy spoczął na nich duch, prorokowali i nie przestali.
26 २६ त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले.
Lecz dwaj mężczyźni pozostali w obozie: jeden miał na imię Eldad, a drugi – Medad. Na nich też spoczął duch, bo oni byli wśród spisanych, choć nie przybyli do namiotu. Prorokowali [jednak] w obozie.
27 २७ तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.
Wtedy młodzieniec przybiegł i powiedział do Mojżesza: Eldad i Medad prorokują w obozie.
28 २८ तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.
A Jozue, syn Nuna, sługa Mojżesza i jeden z jego młodzieńców, powiedział: Mojżeszu, panie mój, zabroń im.
29 २९ मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.
Mojżesz odpowiedział: Czy jesteś zazdrosny o mnie? Oby cały lud PANA zamienił się w proroków, aby PAN złożył na nim swego ducha!
30 ३० मग मोशे व इस्राएलाच्या वडीलजनासह छावणीत परत गेला.
Wtedy Mojżesz wrócił do obozu wraz ze starszymi Izraela.
31 ३१ मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता.
I zerwał się wiatr od PANA, który porwał od morza przepiórki i zrzucił je na obóz, na jeden dzień drogi z jednej strony i na jeden dzień drogi z drugiej strony, wokół obozu, [wysoko] na dwa łokcie nad ziemią.
32 ३२ लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
Lud stał przez cały dzień, przez całą noc i przez cały następny dzień i zbierał przepiórki. Ten, kto zebrał najmniej, [miał] dziesięć chomerów. I rozłożyli je sobie wokół obozu.
33 ३३ ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला.
Lecz gdy mięso było między ich zębami, jeszcze nieprzeżute, gniew PANA zapłonął przeciw ludowi i uderzył go wielką plagą.
34 ३४ त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ज्या लोकांस मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले.
I nazwano to miejsce Kibrot-Hattaawa, bo tam pochowano lud, który zapragnął [mięsa].
35 ३५ किब्रोथ-हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथ गावापर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.
A z Kibrot-Hattaawy lud wyruszył do Chaserot; i mieszkał w Chaserot.