< नहेम्या 1 >
1 १ हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचनेः आता असे झाले की, अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.
Magi e weche Nehemia wuod Hakalia: E dwe mar Kislev e higa mar piero ariyo, kane pod antiere kama ochiel gi ohinga motegno mar Susa,
2 २ माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरूशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली.
Hanani, ma en achiel kuom owetena, nobiro koa Juda kaachiel gi joma moko, kendo ne apenjogi kuom jo-Yahudi mane otony, bende ne apenjogi kuom Jerusalem.
3 ३ त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
Ne giwachona niya, “Jogo mane otony oa e twech kendo modwogo e gwengʼni nigi chandruok malich to gi wichkuot. Ohinga mar Jerusalem osemukore kendo dhorangeyege osewangʼ gi mach.”
4 ४ आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.
Kane awinjo wechegi, to ne abet piny mi aywak. Kuom ndalo manok nakuyo kendo natweyo chiemo kalamo e nyim Nyasach polo.
5 ५ मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस.
Bangʼe ne alemo kama: “Jehova Nyasaye, ma Nyasach Polo, in Nyasaye maduongʼ kendo malich miwuoro, marito singruok mare mar hera gi jogo mohere kendo morito chikene.
6 ६ तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक, तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.
Yie ichik iti kendo iyaw wangʼi mondo iwinj lemo ma jatichni lamo odiechiengʼ gotieno ne jotichni, ma gin jo-Israel. Ahulo richowa ma wan jo-Israel, kaachiel gi an kod od wuora wasetimoni;
7 ७ आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.
waseketho e nyimi adier kendo ok waseluoro chike kod puonj mane imiyo jatichni Musa.
8 ८ कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन,
“Parie puonj mane imiyo jatichni Musa, kiwacho ni, ‘Ka ok ubedo jo-ratiro, to abiro keyou e dier ogendini,
9 ९ पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”
to ka udwogo ira kendo urito chikena, to kata obedo ni jou oke e tungʼ piny ka tungʼ piny, abiro chokogi ka agologi kuondego mi akelgi kama aseyiero kaka kar dak mar Nyinga.’
10 १० आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस.
“Gin jotichgi kendo jogi, mane ireso gi tekoni maduongʼ kod badi maratego.
11 ११ तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
Yaye, Ruoth Nyasaye, mad ichik iti ne lamo mar jatichnini kendo bende ni lamo mag jotichni man-gi ilo mar miyo nyingi luor. Mi jatichni odhi maber ka inyise ngʼwono e nyim ngʼatni.” Ne an jatingʼ divai mar ruoth.