< नहेम्या 9 >
1 १ आता त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी गोणपाट घालून व डोक्यांत धूळ घालून एकत्र जमले.
E odiechiengʼ mar piero ariyo gangʼwen mar dweno, jo-Israel nochokore kanyakla, ka gitweyo chiemo kendo ka girwako pien gugru ka gibuko wiyegi gi buru.
2 २ इस्राएली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाईट कृत्यांची कबुली दिली.
Jogo ma jo-Israel hie nopogore moa kuom jopinje mamoko. Negichungʼ ma gihulo richogi kod timbe mag anjawo mag kweregi.
3 ३ ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी सहा तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले.
Negichungʼ kanyo kendo ne gisomo Kitabu mar Chik mar Jehova Nyasaye ma Nyasachgi kuom seche adek, kendo ne gihulo richogi ka gipako Jehova Nyasaye ma Nyasachgi kuom seche adek mamoko.
4 ४ मग लेवी असलेले येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी जिन्यावर उभे राहिले आणि त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला.
Jo-Lawi mane ochungʼ e raidhi kaywak matek ni Jehova Nyasaye ma Nyasachgi ne gin, Jeshua, Bani, Kadmiel, Shebania, Buni, Sherebia, Bani kod Kenani.
5 ५ मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
To jo-Lawi kaka, Jeshua, Kadmiel, Bani, Hashabneya, Sherebia, Hodia, Shebania kod Pethahia nowacho niya, “Chungʼuru malo mondo upak Jehova Nyasaye ma Nyasachu mantiere mochwere manyaka chiengʼ.” “Ogwedh nyingi man-gi duongʼ, kendo mad tingʼe malo moloyo gweth kod pak duto.
6 ६ तू परमेश्वर आहे. तूच एक आहेस. तू आकाश, अत्युच्च आकाश, त्याबरोबर सर्व देवदूत लढाईसाठी त्यांची रचना करून निर्माण केलेस आणि ही पृथ्वी आणि तिच्यातील सर्वकाही आणि समुद्र आणि त्यातले सर्व काही तू केले. तू त्या सर्वांना जीवन देतोस आणि स्वर्गातील देवदूतांची सेना तुझी उपासना करते.
In kende e Jehova Nyasaye. Ne ichweyo polo nyaka polo man malo mogik, to gi gik moko duto manie iye, gi piny to gi gik moko duto man kuome, nembe kod gik moko duto manie igi. Ichiwo ngima ne gik moko duto, kendo jopolo pakoi.
7 ७ हे परमेश्वरा, तूच देव आहेस. ज्याने अब्रामाची निवड केली आणि बाबेलमधील (खास्द्यांच्या) ऊर नगरातून तू बाहेर काढून त्यास अब्राहाम असे नाव दिले.
“In e Jehova Nyasaye, mane oyiero Abram mi igole oa Ur mar jo-Kaldea bangʼe imiye nying ni Ibrahim.
8 ८ तो तुझ्याशी निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास की, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याच्या वंशजांना द्यायचे वचन दिलेस. आणि तू ते पाळलेस. कारण, तू न्यायी आहेस.
Ne iyudo ka en ngʼat ma ja-adiera e nyimi, kendo ne iloso kode singruok ni inimi nyikwaye piny jo-Kanaan, jo-Hiti, jo-Amor, jo-Perizi, jo-Jebus, kod jo-Girgash. Iserito singruok marino nikech in ja-ratiro.
9 ९ मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास. आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ केलेला धावा तू ऐकलास.
“Ne ineno kaka kwerewa nosandore e piny Misri; kendo ne iwinjo ywakgi kane gichopo e Nam Makwar.
10 १० फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. कारण तुला माहित होते की, मिसर देशातील लोक त्यांच्याशी गर्वाने वागत होते. पण तू आपल्या नावासाठी केले ते आजवर आहे.
Ne ioro ranyisi mag honni kod gik miwuoro ne Farao, kendo kuom jotende duto kod jopinyni duto, nimar ne ingʼeyo kaka jo-Misri ne tiyo jowa githuon. Ne iloso nyingi, ma pod en kamano nyaka chil kawuono.
11 ११ त्यांच्या डोळयांदेखत तू तांबडा समुद्र दुभागून दाखवलास. आणि ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरुन चालत गेले आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलेस जसा एखादा दगड खोल पाण्यात बुडावा.
Ne ibaro nam makwar ka gineno, mondo ne mi gikal kama otwo, makmana jogo mane lawogi ne inyumo e bwo nam, mana kaka kidi modir e ataro mar pi.
12 १२ दिवसा तू त्यांना मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री अग्नीस्तंभाने त्यांच्या वाटेवर प्रकाश दिला अशासाठी की त्याप्रकाशात ते चालू शकतील.
Godiechiengʼ ne itelonegi gi bor polo, to gotieno to ne itelonegi gi mach makakni mondo omigi ler e wangʼ yo kama ne giwuothoe.
13 १३ मग तू सीनाय पर्वतावर उतरलास आणि त्यांच्याशी आकाशातून बोललास आणि तू त्यांना योग्य निर्णय, खरी शिकवण, चांगले नियम आणि आज्ञा दिल्यास.
“Ne ilor e Got Sinai; mane iwuoyo kodgi gie polo. Ne imiyogi puonj kod chike makare kendo madiera kendo ne imiyogi puonj maber.
14 १४ तुझ्या पवित्र शब्बाथाचा त्यांना परिचय करून दिलास आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.
Ne imiyo gingʼeyo Sabato-ni maler mi imiyogi chike, kod buche kokalo kuom jatichni Musa.
15 १५ ते भुकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस. ते तहानलेले होते, म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास की, मी शपथपूर्वक तुम्हास दिलेल्या वचनदत्त जमिनीचा ताबा घ्या.
Ka kech ne kayogi to ne imiyogi makati koa e polo kendo ka riyo noloyogi to ne ikelo pi koa e kor lwanda; bende ne inyisogi mondo gidhi gikaw pinyno mane isesingo kikwongʼori ni ibiro miyogi.
16 १६ पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले.
“To kwerewa, nobedo jongʼayi kendo joma tokgi tek, mine ok giluoro chikegi.
17 १७ त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
Negitamore winji kendo ne ok giparo honni mane itimo e diergi. Tokgi nobedo matek kendo e ngʼanyo margino ne giyiero jatelo mondo gidog gibed wasumbini. To in Nyasaye maweyone ji richogi, ma jangʼwono kendo maneno ne ji lit, iyi bende ok wangʼ piyo kendo hera mari ogundho.
18 १८ त्यांनी ओतीव धातुपासून वासरांची मूर्ती केली आणि आम्हास मिसर देशातून सोडवणारा हाच देव असे ते म्हणाले आणि त्यांनी खूप निंदा केली तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
Omiyo ne ok ijwangʼogi kata obedo nine gitimo timbe mag anjawo, ka giloso kido mar nyaroya mi giwacho niya, ‘Ma en nyasachu, mane ogolou e piny Misri.’
19 १९ तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्नीस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवीत राहिलास.
“Nikech ngʼwono mari mathoth ne ok ijwangʼogi e thim. Godiechiengʼ, bor polo nodhi nyime ka telonegi e yo, to gotieno mach makakni nomedo menyonegi kama giluwo.
20 २० त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस, त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस.
Ne ichiwo Roho mari maber mondo opuonjgi. Ne ok ituonogi manna, kendo ne imiyogi pi kuom riyo mane oloyogi.
21 २१ चाळीस वर्षे तू त्यांचे वाळवंटात पालनपोषण केलेस आणि त्यांना कशाचीही उणीव भासली नाही. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत त्यांच्या पावलांना सूज आली नाही.
Ne iritogi e thim kuom higni piero angʼwen; onge gimoro amora mane gionge godo, lepgi ne ok oti kata tiendegi bende ne ok okuot.
22 २२ त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले.
“Ne imiyogi loyo pinyruodhi kod ogendini, mi ipogogi nyaka kuonde motimo ongoro. Negikawo piny Sihon ma ruodh Heshbon kod piny Og ma ruodh Bashan.
23 २३ त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस आणि त्यांना त्या प्रदेशात आणले. तू सांगितल्यावर त्यांच्या पूर्वजांनी तो प्रदेश ताब्यात घेतला.
Ne imiyo yawuotgi obedo mangʼeny ka sulwe manie lwasi, mi ikelogi nyaka e piny mane isingone kweregi mondo odhiye kendo okaw.
24 २४ या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला आणि तूच हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांना त्यांच्या हातात देऊन मन मानेल तसे वागू दिलेस.
Yawuotgi nodonjo mi gikawo pinyno. Niloyonegi jo-Kanaan, mane odak e pinyno; ne ichiwonegi jo-Kanaan, kaachiel gi ruodhi mag-gi gi jopinyno, mondo gitimgi kaka bernegi.
25 २५ त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला आणि सुपीक प्रदेश मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांनी ताब्यात घेतली, खोदलेल्या विहिरी त्यांना मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे यांचा त्यांनी ताबा घेतला, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तुझ्या महान चांगुलपणामुळे ते आनंदीत झाले.
Negikawo mier madongo mochiel motegno gohinga kod lowo mamiyo; bende negikawo udi mopongʼ gi gik mangʼeny mabeyo, sokni mane osekuny, puothe mzabibu, gi mag zeituni kod yiende mag olembe mangʼeny. Negichiemo ma giyiengʼ kendo negibedo gi mor mogundho; negiil kuom berni maduongʼ mane itimonegi.
26 २६ आणि मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुध्द बंड केले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, ज्या संदेष्ट्यांनी तुझ्याकडे परत वळण्यासाठी सांगितले त्यांचा त्यांनी वध केला आणि त्यांनी तुझ्याविरूद्ध भयंकर दुराचरण केले.
“Kata kamano negibedo maonge luor mi gingʼanyoni; kendo wigi nowil kod chikeni. Neginego jonabi magi; mane osebedo ka puonjogi mondo gidwog iri; negitimo timbe maricho miwuoro.
27 २७ म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुझा धावा केला आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांची शत्रूपासून सुटका केलीस.
Omiyo ne ichiwogi e lwet wasikgi, mane omiyogi tingʼ mapek. To kane tingʼ mapek oromogi ne giywakni. Ne iwinjogi koa e polo, kendo gi ngʼwononi mogundho ne imiyogi jokony, mane oresogi giaye lwet wasikgi.
28 २८ मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रूकडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि तुझ्या दयेस्तव अनेकदा त्यांना सोडवलेस.
“To apoya nono kane giseyudo yweyo, negitimo gima ok owinjore e nyim wangʼi. Bangʼe ne ijwangʼogi e lwet wasikgi mondo omi wasikgigo obed ruodhgi. To kane gichak giywakni kendo ne iwinjogi ka in e polo, to e ngʼwononi mogundho ne iresogi kuom kinde ka kinde.
29 २९ त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.
“Ne isiemogi mondo gidwog kuom chikni, to negibedo jongʼayi kendo ma ok oluoro chikeni. Negitimo richo kuom chayo puonj magi, maka ngʼato orito to kelone ngima. Negilokore giweyi ka tokgi tek ta mi ok girito chikeni.
30 ३० अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.
Kuom higni mangʼeny ne ihori kodgi. Kuom Roho mari ne ipuonjori kodgi kokalo kuom jonabi magi. Kata kamano, ne ok gichiko itgi malongʼo, omiyo ne ichiwogi ne joma ok jo-Yahudi.
31 ३१ पण तू दयाळू आहेस म्हणून तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस, त्यांचा तू त्याग केला नाहीस कारण देवा, तू कृपाळू आणि दयाळू आहेस.
To e ngʼwono mari makende ne ok itiekogi chuth bende ne ok ijwangʼogi, nikech in Nyasaye ma jangʼwono kendo makecho joge.
32 ३२ हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
“Emomiyo koro sani, yaye Nyasachwa, in e Nyasaye maduongʼ, Nyasaye nyakalaga kendo Nyasaye Maratego bende in e Nyasaye marito singruokne mar hera. Kik ikaw chandruok mwanenogi mayot; chandruokgi osebiro kuomwa, kuom ruodhi magwa kod jotendwa, kuom jodolo magwa kod jonabi, kuom kwerewa kod jogi duto, kochakore ndalo loch mag ruodhi jo-Asuria nyaka kawuono.
33 ३३ पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे.
Kuom mago duto mosetimorenwa, isebedo jangʼad bura makare; isebedo ja-adiera, ka wan ne watimo marach.
34 ३४ आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.
Ruodhi magwa, jotendwa, jodolo mawa kod kwerewa ne ok oluwo chikni; ne ok gichiko itgi ne puonj magi kata siem mane imiyogi.
35 ३५ स्वत: च्या राज्यात राहत असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत: च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही.
Kata ndalo mane pod gin e bwo loch ruodhigi giwegi, kane pod gichamo mwandu mogundho mane imiyogi kendo gidak e piny malach kendo momewo mane ipogonegi, ne ok gitini bende ne ok giweyo timbegi maricho.
36 ३६ आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत.
“To koro wan wasumbini e piny mane imiyo kwerewa mondo omi gicham olembe moa kanyo kod gik moko mabeyo monyago.
37 ३७ या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
Gik moko ma pinywani nyago dhi mana ne ruodhi miketo mondo otiwa nikech richowa. Gin gi teko kuom dendwa kendo gitimo mana gima gihero ni jambwa, to wan, to wan gi midhiero miwuoro.
38 ३८ या सगळया गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्ताऐवजावर आहेत.”
“Kuom magi duto, waketo winjruok motweyowa, kwandiko wechegi piny, kendo jotendwa, gi jo-Lawi mawa kod jodolo mawa keto lwetgi kaka joneno.”