< नहेम्या 6 >

1 आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी असे ऐकले की, भिंतीतली भगदाडे मी बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते,
サンバラテ、トビヤ、アラビヤびとガシムおよびその他のわれわれの敵は、わたしが城壁を築き終って、一つの破れも残らないと聞いた。(しかしその時にはまだ門のとびらをつけていなかったのである。)
2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, “नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
そこでサンバラテとガシムはわたしに使者をつかわして言った、「さあ、われわれはオノの平野にある一つの村で会見しよう」と。彼らはわたしに危害を加えようと考えていたのである。
3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
それでわたしは彼らに使者をつかわして言わせた、「わたしは大いなる工事をしているから下って行くことはできない。どうしてこの工事をさしおいて、あなたがたの所へ下って行き、その間、工事をやめることができようか」。
4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.
彼らは四度までこのようにわたしに人をつかわしたが、わたしは同じように彼らに答えた。
5 मग, पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसाकरवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते.
ところが、サンバラテは五度目にそのしもべを前のようにわたしにつかわした。その手には開封の手紙を携えていた。
6 त्यामध्ये असे लिहीले होते. राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.
その中に次のようにしるしてあった、「諸国民の間に言い伝えられ、またガシムも言っているが、あなたはユダヤ人と共に反乱を企て、これがために城壁を築いている。またその言うところによれば、あなたは彼らの王になろうとしている。
7 “यहूदात राजा आहे, असे स्वत: बद्दल घोषित करायला तू यरूशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
またあなたは預言者を立てて、あなたのことをエルサレムにのべ伝えさせ、『ユダに王がある』と言わせているが、そのことはこの言葉のとおり王に聞えるでしょう。それゆえ、今おいでなさい。われわれは共に相談しましょう」。
8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
そこでわたしは彼に人をつかわして言わせた、「あなたの言うようなことはしていません。あなたはそれを自分の心から造り出したのです」と。
9 आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
彼らはみな「彼らの手が弱って工事をやめるようになれば、工事は成就しないだろう」と考えて、われわれをおどそうとしたのである。しかし神よ、どうぞいまわたしの手を強めてください。
10 १० मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.”
さてわたしはメヘタベルの子デラヤの子シマヤの家に行ったところ、彼は閉じこもっていて言った、「われわれは神の宮すなわち神殿の中で会合し、神殿の戸を閉じておきましょう。彼らはあなたを殺そうとして来るからです。きっと夜のうちにあなたを殺そうとして来るでしょう」。
11 ११ पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचविण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही.”
わたしは言った、「わたしのような者がどうして逃げられよう。わたしのような者でだれが神殿にはいって命を全うすることができよう。わたしははいらない」。
12 १२ शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते.
わたしは悟った。神が彼をつかわされたのではない。彼がわたしにむかってこの預言を伝えたのは、トビヤとサンバラテが彼を買収したためである。
13 १३ मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते.
彼が買収されたのはこの事のためである。すなわちわたしを恐れさせ、わたしにこのようにさせて、罪を犯させ、わたしに悪名をきせて侮辱するためであった。
14 १४ देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे.
わが神よ、トビヤ、サンバラテおよび女預言者ノアデヤならびにその他の預言者など、すべてわたしを恐れさせようとする者たちをおぼえて、彼らが行ったこれらのわざに報いてください。
15 १५ मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरूशलेमेच्या भिंतीचे काम बावन्न दिवसानी समाप्त झाले.
こうして城壁は五十二日を経て、エルルの月の二十五日に完成した。
16 १६ हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
われわれの敵が皆これを聞いた時、われわれの周囲の異邦人はみな恐れ、大いに面目を失った。彼らはこの工事が、われわれの神の助けによって成就したことを悟ったからである。
17 १७ त्या दिवसात यहूदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबीया त्यांना उत्तरे देत होता.
またそのころ、ユダの尊い人々は多くの手紙をトビヤに送った。トビヤの手紙もまた彼らにきた。
18 १८ यहूदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते. कारण, आरहाचा पुत्र शखन्या याचा तोबीया हा जावई होता. तोबीयाचा पुत्र योहानान याचे मशुल्लामच्या कन्येशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र.
トビヤはアラの子シカニヤの婿であったので、ユダのうちの多くの者が彼と誓いを立てていたからである。トビヤの子ヨハナンもベレキヤの子メシュラムの娘を妻にめとった。
19 १९ तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.
彼らはまたトビヤの善行をわたしの前に語り、またわたしの言葉を彼に伝えた。トビヤはたびたび手紙を送って、わたしを恐れさせようとした。

< नहेम्या 6 >