< नहेम्या 5 >

1 तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.
I stade velika vika ljudi i žena na braæu njihovu Judejce.
2 त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत रहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
Jer neki govorahu: nas i sinova naših i kæeri naših ima mnogo; da dobavimo žita da jedemo i ostanemo živi.
3 काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
Drugi opet govorahu: da založimo polja svoja i vinograde i kuæe da dobijemo žita u ovoj gladi.
4 काही असे सुद्धा म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरीला राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
Još drugi govorahu: da uzajmimo novaca na polja svoja i vinograde za danak carski.
5 आमच्या बांधवाचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
A tijelo je naše kao tijelo braæe naše, sinovi naši kao njihovi sinovi, i eto treba da damo sinove svoje i kæeri svoje u roblje, i neke kæeri naše veæ su robinje, a mi ne možemo ništa, jer polja naša i vinograde naše drže drugi.
6 जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला.
Zato se rasrdih vrlo kad èuh viku njihovu i te rijeèi.
7 मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही आपल्या बंधूकडून व्याज घेत आहात” मग मी सर्व लोकांस सभेमध्ये एकत्र बोलावले
I smislih u srcu svom i ukorih knezove i poglavare, i rekoh im: vi meæete bremena svaki na brata svojega. I sazvah veliki zbor njih radi.
8 आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
I rekoh im: mi otkupismo koliko mogosmo braæu svoju Judejce što bjehu prodani narodima; a vi li æete prodavati braæu svoju ili æe se prodavati nama? A oni umukoše i ne naðoše što bi odgovorili.
9 मी असेही म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही?
I rekoh: nije dobro što radite. Ne treba li vam hoditi u strahu Boga našega da nam se ne rugaju narodi, neprijatelji naši?
10 १० तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
I ja i braæa moja i momci moji davali smo im novaca i žita; ali oprostimo im taj dug.
11 ११ त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा.”
Hajde vratite im danas polja njihova i vinograde i maslinike i kuæe i što im na stotinu uzimate od novca i žita i vina i ulja.
12 १२ मग ते म्हणाले “त्यांच्याकडून घेतलेले सर्वकाही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.” मग मी याजकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली.
A oni odgovoriše: vratiæemo i neæemo iskati od njih; uèiniæemo kako veliš. Tada sazvah sveštenike, i zakleh ih da æe tako uèiniti.
13 १३ मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
I istresoh njedra svoja i rekoh: ovako da istrese Bog svakoga iz kuæe njegove i iz truda njegova ko god ne ispuni ove rijeèi, i ovako da se istrese i bude prazan. I sav zbor reèe: amin. I hvališe Gospoda, i uèini narod po toj rijeèi.
14 १४ शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
I otkad mi car zapovjedi da im budem upravitelj u zemlji Judinoj, od godine dvadesete do trideset druge godine cara Artakserksa, dvanaest godina, ja i braæa moja ne jedosmo hrane upraviteljske.
15 १५ पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
A preðašnji upravitelji koji bijahu prije mene bijahu teški narodu uzimajuæi od njega hljeba i vina osim èetrdeset sikala srebra, i sluge njihove zapovijedahu po narodu; ali ja tako ne èinih bojeæi se Boga.
16 १६ मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो.
Nego i oko graðenja zida radih, i ne kupismo njive; i svi momci moji bijahu skupa ondje na poslu.
17 १७ माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत.
I Judejaca i poglavara sto i pedeset ljudi i koji dolažahu k nama iz okolnijeh naroda bijahu za mojim stolom.
18 १८ आता प्रत्येक दिवशी एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि पक्षीही तयार करीत असत, व प्रत्येक दहा दिवसानी सर्व प्रकारचे द्राक्षरस मुबलक प्रमाणात आणत आणि तरीही, मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता.
I gotovljaše se svaki dan po jedno goveèe, šest ovaca izabranijeh, i ptice gotovljahu mi se, i svakih deset dana davaše se svakojakoga vina izobila. I opet ne iskah hrane upraviteljske; jer služba bješe teška narodu.
19 १९ हे माझ्या देवा, जे मी या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.
Pomeni me, Bože moj, na dobro za sve što sam èinio ovomu narodu.

< नहेम्या 5 >