< नहेम्या 13 >
1 १ त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.
В день той чтено бысть в книзе Моисеове во слышание людем, и обретеся написано в ней: да не имут внити Амманитяне и Моавитяне в церковь Божию даже до века,
2 २ या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
понеже не сретоша сынов Израилевых со хлебом и водою и наяша на них Валаама на проклятие их: и обрати Бог наш проклятство на благословение.
3 ३ हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.
И бысть егда слышаху закон, и отлучиша всех чуждих от Израиля.
4 ४ यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात.
И прежде сего Елиасив священник живяше в сокровищнем дому Бога нашего, сродник Товиин,
5 ५ जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षरस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथे ठेवली जात.
и сотвори ему сокровищный дом велик: таможе бяху прежде приносяще жертву и ливан, и сосуды и десятину пшеницы и вина и елеа, уставленая левитом и певцем и дверником, и начатки священническия.
6 ६ परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली,
Во всех же сих не бых во Иерусалиме, понеже в лето тридесять второе Артаксеркса царя Вавилонскаго приидох ко царю: и по скончании дний испросих от царя
7 ७ आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.
и приидох во Иерусалим, и уразумех зло, еже сотвори Елиасив Товии, сотворити ему сокровищный дом во дворе дому Божия,
8 ८ मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.
и зло явися ми зело: и извергох вся сосуды дому Товиева вон из дому сокровищнаго,
9 ९ त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
и рекох, и очистиша сокровищный дом: и возвратих онамо сосуды дому Божия, жертву и ливан.
10 १० लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.
И познах, яко части левитския не быша даны, и побегоша кийждо на село свое левити и певцы творящии дело.
11 ११ म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.
И пряхся со стратигами и рекох: чесо ради оставлен бысть дом Божий? И собрах их и поставих оных во стояниих своих.
12 १२ त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
И весь Иуда принесоша десятину пшеницы и вина и елеа в сокровища под руку Селемии священника и Садока писца и фадаии от левит,
13 १३ कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.
и при них Анан сын Закхуров, сын Матфаниев, яко верни искушени суть над ними разделяти братиям своим.
14 १४ देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
Помяни мя, Боже, того ради, и да не погибнет милость моя, юже сотворих в дому Господа Бога моего и в чинех его.
15 १५ यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
Во днех тех видех во Иуде топчущих точило в субботу, и носящих снопы, и возлагающих на ослы и вино, и гроздие, и смоквы, и всякое бремя, и носящих во Иерусалим во дни субботныя: и засвидетелствовах им в день продаяния их.
16 १६ सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत.
И Тиряне обиташа в нем приносяще рыбы, и вся продаемая продающе в субботы сыновом Иудиным и во Иерусалиме.
17 १७ यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात.
И обличих сынов Иудиных свободных и рекох им: что сия вещь злая, юже вы творите, и скверните день субботный?
18 १८ तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”
Не сия ли сотвориша отцы ваши, и наведе на них Бог наш и на нас вся злая сия, и на град сей, и вы прилагаете гнев на Израиля, скверняще субботу?
19 १९ प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.
Бысть же егда поставишася врата во Иерусалиме прежде субботы, и рекох, и запроша двери и повелех, да не отверзают их даже по субботе: и от отрок моих поставих над враты, да ни един вносит бремя в день субботный.
20 २० एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
И сташа вси и творяху куплю вне Иерусалима единощи и дващи.
21 २१ मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.
И засвидетелствовах о них и рекох им: что вы пребываете пред стеною? Аще вторицею сие сотворите, простру руку мою на вас. И от времене того не приидоша в субботу.
22 २२ मग मी लेवींना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे.
И рекох левитом, иже бяху очищени, дабы приходили хранити врат и святити день субботный. И сих ради помяни мя, Боже, и прости ми по множеству милости Твоея.
23 २३ त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.
И во днех онех видех Иудеев поемших жены Азотския, Амманитяны, Моавитския,
24 २४ आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.
и сынове их от полу глаголаху азотским языком и не умеяху глаголати иудейски:
25 २५ आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका.
и запретих им, и проклях их, и поразих от них мужей, и оплеших их, и заклях их Богом, аще дадите дщери вашя сыновом их и аще поймете от дщерей их сыновом вашым и себе:
26 २६ अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.
не тако ли согреши Соломон царь Израилев? И во языцех мнозех не бысть царь подобен ему, и возлюблен Богу бе, и постави его Бог царем над всем Израилем, и того прельстиша жены чуждия:
27 २७ तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरूद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?”
и мы послушаем ли вас творити всяко зло сие, согрешити Богу нашему, еже пояти жены иноплеменничи?
28 २८ योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले.
И от сынов Иоада сына Ельтува священника великаго, зятя Санаваллатова Уранитина, и изгнах его от мене.
29 २९ हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.
Помяни им, Боже, за осквернение священства и завета священническа и левитска.
30 ३० याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या.
И очистих их от всякия чуждия нечистоты, и поставих чреды священником и левитом, комуждо по делу его,
31 ३१ लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.
и даяние древес во временех уставленых и первородных. Помяни мя, Боже наш, во благое.