< नहेम्या 12 >

1 शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा,
و اینانند کاهنان و لاویانی که با زربابل بن شئلتیئیل و یشوع برآمدند. سرایا وارمیا و عزرا.۱
2 अमऱ्या, मल्लूख हत्तूश,
امریا و ملوک و حطوش.۲
3 शखन्या, रहूम मरेमोथ.
و شکنیاو رحوم و مریموت.۳
4 इद्दो, गिन्नथोई, अबीया,
و عدو و جنتوی و ابیا.۴
5 मियामीन, माद्या, बिलगा,
ومیامین و معدیا و بلجه.۵
6 शमाया, योयारीब, यदया.
و شمعیا و یویاریب و یدعیا.۶
7 सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
و سلو و عاموق و حلقیا و یدعیا. اینان روسای کاهنان و برادران ایشان در ایام یشوع بودند.۷
8 लेवी असेः येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते.
و لاویان: یشوع و بنوی و قدمیئیل وشربیا و یهودا و متنیا که او و برادرانش پیشوایان تسبیح خوانان بودند.۸
9 बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतीस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत.
و برادران ایشان بقبقیه وعنی در مقابل ایشان در جای خدمت خود بودند.۹
10 १० येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा.
و یشوع یویاقیم را تولید نمود و یویاقیم الیاشیب را آورد و الیاشیب یویاداع را آورد.۱۰
11 ११ योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला.
ویویاداع یوناتان را آورد و یوناتان یدوع را آورد.۱۱
12 १२ योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे: सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या
و در ایام یویاقیم روسای خاندانهای آبای کاهنان اینان بودند. از سرایا مرایا و از ارمیا حننیا.۱۲
13 १३ एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
و از عزرا، مشلام و از امریا، یهوحانان.۱۳
14 १४ मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ.
و ازملیکو، یوناتان و از شبنیا، یوسف.۱۴
15 १५ हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
و از حاریم، عدنا و از مرایوت، حلقای.۱۵
16 १६ इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
و از عدو، زکریا واز جنتون، مشلام.۱۶
17 १७ अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
و از ابیا، زکری و از منیامین و موعدیا، فلطای.۱۷
18 १८ बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
و از بلجه، شموع و ازشمعیا، یهوناتان.۱۸
19 १९ योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
و از یویاریب، متنای و ازیدعیا، عزی.۱۹
20 २० सल्लू याच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर
و از سلای، قلای و از عاموق، عابر.۲۰
21 २१ हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
و از حلقیا، حشبیا و از یدعیا، نتنئیل.۲۱
22 २२ एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.
و روسای آبای لاویان، در ایام الیاشیب ویهویاداع و یوحانان و یدوع ثبت شدند و کاهنان نیز در سلطنت داریوش فارسی.۲۲
23 २३ लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
و روسای آبای بنی لاوی در کتاب تواریخ ایام تا ایام یوحانان بن الیاشیب ثبت گردیدند.۲۳
24 २४ लेव्यांचे प्रमुख असे होतेः हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा पुत्र येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समुहाने दाद देत कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती.
و روسای لاویان، حشبیا و شربیا و یشوع بن قدمیئیل وبرادرانشان در مقابل ایشان، تا موافق فرمان داودمرد خدا، فرقه برابر فرقه، حمد و تسبیح بخوانند.۲۴
25 २५ दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,
و متنیا و بقبقیا و عوبدیا و مشلام و طلمون وعقوب دربانان بودند که نزد خزانه های دروازه هاپاسبانی می‌نمودند.۲۵
26 २६ हे द्वारपाल योयाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा पुत्र आणि येशूवा योसादाकाचा. नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात द्वारपाल होते.
اینان در ایام یویاقیم بن یشوع بن یوصاداق و در ایام نحمیای والی وعزرای کاهن کاتب بودند.۲۶
27 २७ यरूशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरूशलेमेला एकत्र आणले. यरूशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
و هنگام تبریک نمودن حصار اورشلیم، لاویان را از همه مکان های ایشان طلبیدند تا ایشان را به اورشلیم بیاورند که با شادمانی و حمد و سرود بادف و بربط و عود آن را تبریک نمایند.۲۷
28 २८ शिवाय सर्व गायक देखील यरूशलेम भोवतालच्या नटोफाथी प्रांतातून यरूशलेमेला आले.
پس پسران مغنیان، از دایره گرداگرد اورشلیم و ازدهات نطوفاتیان جمع شدند.۲۸
29 २९ नटोफा, बेथ-गिलगाल, गिबा आणि अजमावेथ ही ती गावे होत. यरूशलेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती.
و از بیت جلجال و از مزرعه های جبع و عزموت، زیرا که مغنیان به اطراف اورشلیم به جهت خود دهات بنا کرده بودند.۲۹
30 ३० नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत: चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरूशलेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला.
و کاهنان و لاویان خویشتن را تطهیرنمودند و قوم و دروازه‌ها و حصار را نیز تطهیرکردند.۳۰
31 ३१ यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला.
و من روسای یهودا را بر سر حصارآوردم و دو فرقه بزرگ از تسبیح خوانان معین کردم که یکی از آنها به طرف راست بر سر حصارتا دروازه خاکروبه به هیئت اجماعی رفتند.۳۱
32 ३२ होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले,
و در عقب ایشان، هوشعیا و نصف روسای یهودا.۳۲
33 ३३ आणि अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम,
و عزریا و عزرا و مشلام.۳۳
34 ३४ यहूदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले.
و یهودا وبنیامین شمعیا و ارمیا.۳۴
35 ३५ काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमाया, शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या.
و بعضی از پسران کاهنان با کرناها یعنی زکریا ابن یوناتان بن شمعیاابن متنیا ابن میکایا ابن زکور بن آصاف.۳۵
36 ३६ आसाफचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता.
وبرادران او شمعیا و عزریئیل و مللای و جللای وماعای و نتنئیل و یهودا و حنانی با آلات موسیقی داود مرد خدا، و عزرای کاتب پیش ایشان بود.۳۶
37 ३७ झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
پس ایشان نزد دروازه چشمه که برابر ایشان بود، بر زینه شهر داود بر فراز حصار بالای خانه داود، تا دروازه آب به طرف مشرق رفتند.۳۷
38 ३८ स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.
وفرقه دوم، تسبیح خوانان در مقابل ایشان به هیئت اجماعی رفتند و من و نصف قوم بر سر حصار، ازنزد برج تنور تا حصار عریض در عقب ایشان رفتیم.۳۸
39 ३९ मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले.
و ایشان از بالای دروازه افرایم و بالای دروازه کهنه و بالای دروازه ماهی و برج حننئیل وبرج مئه تا دروازه گوسفندان (رفته )، نزد دروازه سجن توقف نمودند.۳۹
40 ४० मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या.
پس هر دو فرقه تسبیح خوانان در خانه خدا ایستادند و من و نصف سروران ایستادیم.۴۰
41 ४१ मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.
و الیاقیم و معسیا ومنیامین و میکایا و الیوعینای و زکریا وحننیای کهنه با کرناها،۴۱
42 ४२ मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्रह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
و معسیا و شمعیا والعازار و عزی و یوحانان و ملکیا و عیلام و عازر، و مغنیان و یزرحیای وکیل به آواز بلندسراییدند.۴۲
43 ४३ या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
و در آن روز، قربانی های عظیم گذرانیده، شادی نمودند، زیرا خدا ایشان را بسیار شادمان گردانیده بود و زنان و اطفال نیز شادی نمودند. پس شادمانی اورشلیم از جایهای دور مسموع شد.۴۳
44 ४४ त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.
و در آن روز، کسانی چند بر حجره‌ها به جهت خزانه‌ها و هدایا و نوبرها و عشرها تعیین شدند تا حصه های کاهنان و لاویان را ازمزرعه های شهرها برحسب تورات در آنها جمع کنند، زیرا که یهودا درباره کاهنان و لاویانی که به خدمت می‌ایستادند، شادی می‌نمودند.۴۴
45 ४५ याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली.
وایشان با مغنیان و دربانان، موافق حکم داود وپسرش سلیمان، ودیعت خدای خود و لوازم تطهیر را نگاه داشتند.۴۵
46 ४६ फार पूर्वी, दावीदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्याच्याजवळ देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते होती.
زیرا که در ایام داود وآساف از قدیم، روسای مغنیان بودند وسرودهای حمد و تسبیح برای خدا(می خواندند).۴۶
47 ४७ अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला. आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.
و تمامی اسرائیل در ایام زربابل و در ایام نحمیا، حصه های مغنیان ودربانان را روز به روز می‌دادند و ایشان وقف به لاویان می‌دادند و لاویان وقف به بنی هارون می‌دادند.۴۷

< नहेम्या 12 >