< नहेम्या 10 >
1 १ त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,
在上面蓋印的,先是哈加里亞的兒子乃赫米雅省長,後為漆德克雅、
2 २ सराया, अजऱ्या, यिर्मया,
色辣雅、阿匝黎雅、耶勒米雅、
3 ३ पशहूर, अमऱ्या, मल्खीया.
帕市胡爾、阿瑪黎雅、瑪耳基雅、
4 ४ हत्तूश, शबन्या, मल्लूख,
哈突士、舍巴尼雅、瑪路客、
5 ५ हारीम, मरेमोथ, ओबद्या,
哈陵、默勒摩特、敖巴狄雅、
6 ६ दानीएल, गिन्नथोन, बारुख,
達尼耳、金乃通、巴魯克、
7 ७ मशुल्लाम, अबीया, मियामीन,
默叔藍、阿彼雅、米雅明、
8 ८ माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.
瑪阿齊雅、彼耳蓋、舍瑪雅:以上都是司祭。
9 ९ आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल,
以下是肋未人:阿匝尼雅的兒子耶叔亞、彼奴依,赫那達得的子孫卡德米耳,
10 १० आणि त्यांचे भाऊ: शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान,
和他們的族人:舍巴尼雅、曷狄雅、刻里達、培拉雅、哈南、
11 ११ मीखा, रहोब, हशब्या,
米加、勒曷布、哈沙彼雅、
12 १२ जक्कूर, शेरेब्या, शबन्या,
匝雇爾、舍勒彼雅、舍巴尼雅、
13 १३ होदीया, बानी, बनीनू.
曷狄雅、巴尼、貝尼奴。
14 १४ लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी.
民眾的首領:帕洛市、帕哈特摩阿布、厄藍、匝突、巴尼、
15 १५ बुन्नी, अजगाद, बेबाई,
步尼、阿次加得、貝拜、
16 १६ अदोनीया, बिग्वई, आदीन,
阿多尼雅、彼革外、阿丁、
17 १७ आटेर, हिज्कीया, अज्जूर,
阿特爾、希則克雅、阿組爾、
18 १८ होदीया, हाशूम, बेसाई,
曷狄雅、哈雄、貝宰、
19 १९ हारिफ, अनाथोथ, नोबाई,
哈黎布、阿納托特、乃拜、
20 २० मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
瑪革丕阿士、默叔藍、赫齊爾默、
21 २१ मशेजबेल, सादोक, यद्दूवा.
舍匝貝耳、匝多克、雅杜亞、
22 २२ पलट्या, हानान, अनया,
培拉提雅、哈南、阿納雅、
23 २३ होशेया, हनन्या, हश्शूब.
曷舍雅、哈納尼雅、哈叔布、
24 २४ हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
哈羅赫士、丕耳哈、芍貝克、
25 २५ रहूम, हश्बना, मासेया,
勒洪、哈沙貝納、瑪阿色雅、
26 २६ अहीया, हानान, अनान,
阿希雅、哈南、阿南、
27 २७ मल्लूख, हारीम आणि बाना.
瑪路客、哈陵、巴阿納。
28 २८ उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले.
其餘的民眾、司祭、肋未人、門丁、歌詠者、獻身者,和所有脫離各地人民而來歸奉天主法律的人,連同他們的妻子兒女,及凡有知識能懂事的人,
29 २९ त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला.
都支持他們為首領的同胞,起咒宣示,必按天主的法律去行,就是遵行天主的僕人梅瑟所頒佈的法律,並遵守履行上主我們的天主的一切命令、規矩和制度;
30 ३० आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.
決不將我們的女兒嫁給外方人民,也不為我們的兒子娶他們的女兒。
31 ३१ शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
外方人民若是在安息日,運貨物或各種食糧來販賣,我們在安息日或聖日,決不向他們購買什麼;每七年停止耕種,豁免一切債務。
32 ३२ मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.
我們又為自己定下規矩,每年要繳納三分之一「協刻耳,」作為我們天主殿中祭祀之用:
33 ३३ मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.
備辦供餅、恆常祭品、全燔祭品,安息日、月朔和慶節應獻的祭品和各種祭物,為以色列贖罪的贖罪祭品,以及我們天主殿內的一切工作費用。
34 ३४ मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे.
我們司祭、肋未人和人民,拈鬮規定,按照家族,每年照一定的時間,我們天主的聖殿獻納木柴,放在上主我們的天主的祭壇上燃燒,如法律上所記載的;
35 ३५ आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो.
又當把田地的初熟之物,以及各種樹木的初熟鮮果,每年獻於上主聖殿;
36 ३६ आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.
按照法律所載,將我們的兒子和家畜中的首生者,以及我們牛羊中的首生者,獻於我們天主的聖殿,交給我們在天主殿內奉職的司祭;
37 ३७ तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षरस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात.
把我們初熟的粗麵餅、祭品、各種樹木的果實、新酒和油,交給司祭,送到我們天主聖殿的廊房裏;將我們田地出產的十分之一,送給肋未人,肋未人應親自在各城鎮,徵收我們勞作的十分之一。
38 ३८ लेवी या धान्याचा स्विकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या, मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा.
當肋未人徵收十分之一時,亞郎子孫中的一個司祭,應與肋未人在一起;肋未人應將所得什一中的十分之一,獻於我們的天主聖殿,交入聖殿廊房的寶庫,
39 ३९ इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही.
因為以色列子民和肋未的子孫,應把所獻的五穀、酒和油,送到廊房內,聖所的器具存在那裏,奉職的司祭,守門者和歌詠者也住在那裏,對們天主的聖殿,再也不敢怠慢。