< नहूम 2 >

1 तो तुला आदळून तुकडे करण्यासाठी तुझ्याविरूद्ध आला आहे. शहरातील कोटांचे रक्षण कर, रस्त्यावर नजर ठेव, स्वतःला बळकट कर, तुझ्या सैन्याला एकत्र कर.
Postītājs ceļas pret tevi, - sargi pili, lūko uz ceļu, stiprini gurnus un centies spēcīgi!
2 कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.
Jo Tas Kungs atkal uzceļ Jēkaba godību, tā kā Israēla godību, jo laupītāji tos aplaupījuši un maitājuši viņu vīna stīgas.
3 त्यांच्या वीरांच्या ढाली लाल आहेत आणि शूर माणसे किरमिजी रंगाचे पोषाख नेसले आहेत, त्यांच्या तयारी करण्याच्या दिवशी रथ पोलादाने चमकत आहेत आणि सुरूच्या काठ्यांचे भाले हवेत हालवत आहेत.
Viņa varoņu priekšturamās bruņas ir sarkanas, viņa kara ļaudis purpurā ģērbušies, rati spīd kā uguns liesmas tai dienā, kad viņš apbruņojās, un šķēpi top cilāti.
4 रथ रस्त्यातून वेगाने धावत आहेत; रूंद रस्त्यामधून ते इकडे तिकडे झपाट्याने पळत आहेत, ते मशाली सारखे आणि विजांसारखे धावत आहेत.
Rati rīb uz ielām, tie skraida gatvēs, viņu izskats ir kā uguns lāpas, tie laistās kā zibeņi.
5 जो कोणी तुझे तुकडे करण्यास धडक देत आहे तो त्याच्या अधिकाऱ्यांना बोलावत आहे; ते उतावळीने त्यांच्या चालण्यात अडखळत आहेत. ते तटबंदीवर हल्ला करण्याची घाई करत आहेत. हल्ला करणाऱ्यापासून संरक्षणासाठी रक्षणाची तयारी करत आहेत.
Viņš piemin savus varenos, tie klūp savā ceļā, tie steidzās uz mūriem un sataisa patvērumu.
6 पण नदीकाठची दारे उघडी केली आहेत, आणि राजवाडा नाश होऊन कोसळला आहे.
Upju vārti ir atdarīti, un pils iet bojā.
7 असा निर्णय होऊन चुकला आहे, राणी उघडी झाली आहे आणि तिला धरून नेले आहे आणि तिच्या दासी दु: खाने पारव्याप्रमाणे कण्हत आहेत, त्या आपली छाती पिटून घेत आहेत.
Un ķēniņiene krīt kaunā un top aizvesta, un viņas kalpotājas vaid kā baloži un sit pie savām krūtīm.
8 निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे, पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत. दुसरे किंचाळतात, थांबा! थांबा, परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही.
Jo Ninive bija kā ūdeņu ezers no tā laika, kad tā cēlusies. Bet tie bēg. Stāvat, stāvat! Bet neviens neskatās atpakaļ.
9 चांदी लुटून घ्या, सोने लुटून घ्या, सर्व उज्वल शोभिवंत वस्तूंचा अमर्याद साठा आहे, त्यास अंत नाही.
Laupāt sudrabu, laupāt zeltu, jo tur mantas bez gala un visādu dārgumu papilnam.
10 १० निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.
Posts un postaža un tuksnesis, sirds izkūst, ceļi dreb, un visi gurni gurst, un visi viņu vaigi nobāl.
11 ११ आता सिंहाची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाच्या छाव्याची भक्ष्य खाण्याची जागा कोठे आहे? सिंह आणि सिंहीण त्यांच्या छाव्याबरोबर तेथे फिरत असत, ते तेथे कशालाही भीत नसत ती जागा कोठे आहे?
Kur nu ir tas lauvu dzīvoklis un tā jauno lauvu ganība, kur tas lauva, tā lauvu māte ar tiem lauvu bērniem staigāja, un nebija, kas tos iztraucēja?
12 १२ सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडून तुकडे करीत असे आणि तो आपल्या सिंहिणीसाठी भक्ष्याचा गळा दाबीत असे आणि तो आपल्या गुहा भक्ष्याने आणि त्याची गुहा शिकारीने भरीत असे.
Bet tas lauva laupīja gan priekš saviem bērniem un žņaudza priekš tām lauvu mātēm, savas alas viņš pildīja ar laupījumu un savus dzīvokļus ar to, ko saplosīja.
13 १३ पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन; आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष्य तुझ्या देशातून नाहीसे करीन, आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही.
Redzi, Es celšos pret tevi, saka Tas Kungs Cebaot; un sadedzināšu dūmos viņas ratus un zobens aprīs tavus lauvu bērnus, un Es izdeldēšu tavu laupījumu no zemes, un tavu vēstnešu balsi vairs nedzirdēs.

< नहूम 2 >