< मीखा 1 >
1 १ परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.
सामरिया और येरूशलेम के बारे में ख़ुदावन्द का कलाम जो शाहान — ए — यहूदाह यूताम, आख़ज़ — ओ — हिज़क़ियाह के दिनों में मीकाह मोरशती पर ख्व़ाब में नाज़िल हुआ।
2 २ सर्व लोकांनो ऐका, पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका! प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.
ऐ सब लोगों, सुनो! ऐ ज़मीन और उसकी मा'मूरी कान लगाओ! हाँ ख़ुदावन्द अपने मुक़द्दस घर से तुम पर गवाही दे।
3 ३ पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
क्यूँकि देख, ख़ुदावन्द अपने घर से बाहर आता है, और नाज़िल होकर ज़मीन के ऊँचे मक़ामों को पायमाल करेगा।
4 ४ विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभंगतील, आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.
और पहाड़ उनके नीचे पिघल जाएँगे, और वादियाँ फट जाएँगी, जैसे मोम आग से पिघल जाता और पानी कराड़े पर से बह जाता है।
5 ५ ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? ती यरूशलेमच आहेत की नाही?
ये सब या'क़ूब की ख़ता और इस्राईल के घराने के गुनाह का नतीजा है। या'क़ूब की ख़ता क्या है? क्या सामरिया नहीं? और यहूदाह के ऊँचे मक़ाम क्या हैं? क्या येरूशलेम नहीं?
6 ६ “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, आणि तिचे पाये उघडे करीन.
इसलिए मैं सामरिया को खेत के तूदे की तरह, और ताकिस्तान लगाने की जगह की तरह बनाऊँगा, और मैं उसके पत्थरों को वादी में ढलकाऊँगा और उसकी बुनियाद उखाड़ दूँगा।
7 ७ तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
और उसकी सब खोदी हुई मूरतें चूर — चूर की जाएँगी, और जो कुछ उसने मज़दूरी में पाया आग से जलाया जाएगा; और मैं उसके सब बुतों को तोड़ डालूँगा क्यूँकि उसने ये सब कुछ कस्बी की मज़दूरी से पैदा किया है; और वह फिर कस्बी की मज़दूरी हो जाएगा।
8 ८ या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
इसलिए मैं मातम — ओ — नौहा करूँगा; मैं नंगा और बरहना होकर फिरूँगा; मैं गीदड़ों की तरह चिल्लाऊँगा और शुतरमुर्ग़ों की तरह ग़म करूँगा।
9 ९ कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत. कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत, आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे.
क्यूँकि उसका ज़ख़्म लाइलाज़ है, वह यहूदाह तक भी आया; वह मेरे लोगों के फाटक तक बल्कि येरूशलेम तक पहुँचा।
10 १० गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.
जात में उसकी ख़बर न दो, और हरगिज़ नौहा न करो; बैत 'अफ़रा में ख़ाक पर लोटो।
11 ११ शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेथ-एसलासचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
ऐ सफ़ीर की रहने वाली, तू बरहना — ओ — रुस्वा होकर चली जा; ज़ानान की रहने वाली निकल नहीं सकती। बैतएज़ल के मातम के ज़रिए' उसकी पनाहगाह तुम से ले ली जाएगी।
12 १२ मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे.
मारोत की रहने वाली भलाई के इन्तिज़ार में तड़पती है, क्यूँकि ख़ुदावन्द की तरफ़ से बला नाज़िल हुई, जो येरूशलेम के फाटक तक पहुँची।
13 १३ लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.
ऐ लकीस की रहने वाली बादपा घोड़ों को रथ में जोत; तू बिन्त — ए — सिय्यून के गुनाह का आग़ाज़ हुई क्यूँकि इस्राईल की ख़ताएँ भी तुझ में पाई गईं।
14 १४ म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील; अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.
इसलिए तू मोरसत जात को तलाक़ देगी; अकज़ीब के घराने इस्राईल के बादशाहों से दग़ाबाज़ी करेंगे।
15 १५ मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.
ऐ मरेसा की रहने वाली, तुझ पर क़ब्ज़ा करने वाले को तेरे पास लाऊँगा; इस्राईल की शौकत 'अदूल्लाम में आएगी।
16 १६ म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत: च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
अपने प्यारे बच्चों के लिए सिर मुंडाकर चंदली हो जा; गिद्ध की तरह अपने चंदलेपन को ज़्यादा कर क्यूँकि वह तेरे पास से ग़ुलाम होकर चले गए।