< मीखा 7 >
1 १ मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
Misery é meu! Na verdade, sou como quem recolhe as frutas de verão, como respigadores da vinha. Não há cacho de uvas para comer. Minha alma deseja comer o figo primitivo.
2 २ धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.
O homem piedoso pereceu fora da terra, e não há ninguém de pé entre os homens. Todos eles ficam à espera de sangue; cada homem caça seu irmão com uma rede.
3 ३ त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.
Suas mãos estão sobre o que é mau para fazê-lo de forma diligente. O governante e o juiz pedem um suborno. O homem poderoso dita o desejo maligno de sua alma. Assim, eles conspiram juntos.
4 ४ त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल.
O melhor deles é como um brier. A mais erguida é pior que uma sebe de espinhos. O dia de seus vigilantes, mesmo a sua visita, chegou; agora é o momento de sua confusão.
5 ५ कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.
Não confie em um vizinho. Não deposite confiança em um amigo. Com a mulher deitada em seu abraço, tenha cuidado com as palavras de sua boca!
6 ६ स्वत: च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
Para o filho desonra o pai, a filha se levanta contra sua mãe, a nora contra sua sogra; Os inimigos de um homem são os homens de sua própria casa.
7 ७ परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल.
Mas, quanto a mim, vou olhar para Yahweh. Vou esperar pelo Deus da minha salvação. Meu Deus vai me ouvir.
8 ८ माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
Não se regozije contra mim, meu inimigo. Quando eu cair, eu irei me levantar. Quando eu sentar na escuridão, Yahweh será uma luz para mim.
9 ९ परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.
Eu suportarei a indignação de Yahweh, porque eu pequei contra ele, até que ele me peça e execute o julgamento por mim. Ele me trará para a luz. Eu verei sua retidão.
10 १० मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.
Então meu inimigo o verá, e vergonha a cobrirá quem me disse, “Onde está Yahweh seu Deus?” Meus olhos a verão. Agora ela será pisoteada como a lama das ruas.
11 ११ तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.
Um dia para construir suas paredes! Naquele dia, ele estenderá seus limites.
12 १२ त्या दिवसात ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.
Naquele dia eles virão até você da Assíria e das cidades do Egito, e do Egito até o rio, e de mar a mar, e de montanha a montanha.
13 १३ देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.
No entanto, a terra ficará desolada por causa daqueles que nela habitam, pelo fruto de seus atos.
14 १४ म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
Pastoreie seu pessoal com seu pessoal, o rebanho de sua herança, que habitam sozinhos em uma floresta. Deixe-os se alimentar no meio de terras férteis de pastagem, em Bashan e Gilead, como nos velhos tempos.
15 १५ जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
“Como nos dias de sua saída da terra do Egito, Vou mostrar-lhes coisas maravilhosas”.
16 १६ राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.
As nações verão e se envergonharão de todas as suas forças. Eles colocarão sua mão na boca. Seus ouvidos ficarão surdos.
17 १७ ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
Eles vão lamber o pó como uma serpente. Como coisas rastejantes da terra, elas sairão tremendo de suas covas. Eles virão com medo para Yahweh nosso Deus, e terá medo por sua causa.
18 १८ तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
Quem é um Deus como você, que perdoa a iniqüidade, e passa por cima da desobediência do remanescente de sua herança? Ele não retém sua raiva para sempre, porque ele se deleita em amar a bondade.
19 १९ तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
Ele terá novamente compaixão de nós. Ele pisará nossas iniquidades sob os pés. Você lançará todos os seus pecados nas profundezas do mar.
20 २० पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.
Você vai dar a verdade a Jacob, e misericórdia para com Abraão, como você jurou a nossos pais desde os tempos antigos.