< मीखा 7 >

1 मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
אַלְלַי לִי כִּי הָיִיתִי כְּאָסְפֵּי־קַיִץ כְּעֹלְלֹת בָּצִיר אֵין־אֶשְׁכּוֹל לֶאֱכוֹל בִּכּוּרָה אִוְּתָה נַפְשִֽׁי׃
2 धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.
אָבַד חָסִיד מִן־הָאָרֶץ וְיָשָׁר בָּאָדָם אָיִן כֻּלָּם לְדָמִים יֶאֱרֹבוּ אִישׁ אֶת־אָחִיהוּ יָצוּדוּ חֵֽרֶם׃
3 त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.
עַל־הָרַע כַּפַּיִם לְהֵיטִיב הַשַּׂר שֹׁאֵל וְהַשֹּׁפֵט בַּשִׁלּוּם וְהַגָּדוֹל דֹּבֵר הַוַּת נַפְשׁוֹ הוּא וַֽיְעַבְּתֽוּהָ׃
4 त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल.
טוֹבָם כְּחֵדֶק יָשָׁר מִמְּסוּכָה יוֹם מְצַפֶּיךָ פְּקֻדָּתְךָ בָאָה עַתָּה תִהְיֶה מְבוּכָתָֽם׃
5 कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.
אַל־תַּאֲמִינוּ בְרֵעַ אַֽל־תִּבְטְחוּ בְּאַלּוּף מִשֹּׁכֶבֶת חֵיקֶךָ שְׁמֹר פִּתְחֵי־פִֽיךָ׃
6 स्वत: च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
כִּֽי־בֵן מְנַבֵּל אָב בַּת קָמָה בְאִמָּהּ כַּלָּה בַּחֲמֹתָהּ אֹיְבֵי אִישׁ אַנְשֵׁי בֵיתֽוֹ׃
7 परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल.
וַאֲנִי בַּיהוָה אֲצַפֶּה אוֹחִילָה לֵאלֹהֵי יִשְׁעִי יִשְׁמָעֵנִי אֱלֹהָֽי׃
8 माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
אַֽל־תִּשְׂמְחִי אֹיַבְתִּי לִי כִּי נָפַלְתִּי קָמְתִּי כִּֽי־אֵשֵׁב בַּחֹשֶׁךְ יְהוָה אוֹר לִֽי׃
9 परमेश्वर माझा वाद करेल आणि माझा न्याय साधेल तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन, कारण मी त्याच्याविरुध्द पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहीन.
זַעַף יְהוָה אֶשָּׂא כִּי חָטָאתִי לוֹ עַד אֲשֶׁר יָרִיב רִיבִי וְעָשָׂה מִשְׁפָּטִי יוֹצִיאֵנִי לָאוֹר אֶרְאֶה בְּצִדְקָתֽוֹ׃
10 १० मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.
וְתֵרֶא אֹיַבְתִּי וּתְכַסֶּהָ בוּשָׁה הָאֹמְרָה אֵלַי אַיּוֹ יְהוָה אֱלֹהָיִךְ עֵינַי תִּרְאֶינָּה בָּהּ עַתָּה תִּֽהְיֶה לְמִרְמָס כְּטִיט חוּצֽוֹת׃
11 ११ तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.
יוֹם לִבְנוֹת גְּדֵרָיִךְ יוֹם הַהוּא יִרְחַק־חֹֽק׃
12 १२ त्या दिवसात ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.
יוֹם הוּא וְעָדֶיךָ יָבוֹא לְמִנִּי אַשּׁוּר וְעָרֵי מָצוֹר וּלְמִנִּי מָצוֹר וְעַד־נָהָר וְיָם מִיָּם וְהַר הָהָֽר׃
13 १३ देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.
וְהָיְתָה הָאָרֶץ לִשְׁמָמָה עַל־יֹֽשְׁבֶיהָ מִפְּרִי מַֽעַלְלֵיהֶֽם׃
14 १४ म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
רְעֵה עַמְּךָ בְשִׁבְטֶךָ צֹאן נַֽחֲלָתֶךָ שֹׁכְנִי לְבָדָד יַעַר בְּתוֹךְ כַּרְמֶל יִרְעוּ בָשָׁן וְגִלְעָד כִּימֵי עוֹלָֽם׃
15 १५ जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
כִּימֵי צֵאתְךָ מֵאֶרֶץ מִצְרָיִם אַרְאֶנּוּ נִפְלָאֽוֹת׃
16 १६ राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.
יִרְאוּ גוֹיִם וְיֵבֹשׁוּ מִכֹּל גְּבֽוּרָתָם יָשִׂימוּ יָד עַל־פֶּה אָזְנֵיהֶם תֶּחֱרַֽשְׁנָה׃
17 १७ ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
יְלַחֲכוּ עָפָר כַּנָּחָשׁ כְּזֹחֲלֵי אֶרֶץ יִרְגְּזוּ מִמִּסְגְּרֹֽתֵיהֶם אֶל־יְהוָה אֱלֹהֵינוּ יִפְחָדוּ וְיִֽרְאוּ מִמֶּֽךָּ׃
18 १८ तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
מִי־אֵל כָּמוֹךָ נֹשֵׂא עָוֺן וְעֹבֵר עַל־פֶּשַׁע לִשְׁאֵרִית נַחֲלָתוֹ לֹא־הֶחֱזִיק לָעַד אַפּוֹ כִּֽי־חָפֵץ חֶסֶד הֽוּא׃
19 १९ तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
יָשׁוּב יְרַֽחֲמֵנוּ יִכְבֹּשׁ עֲוֺֽנֹתֵינוּ וְתַשְׁלִיךְ בִּמְצֻלוֹת יָם כָּל־חַטֹּאותָֽם׃
20 २० पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील.
תִּתֵּן אֱמֶת לְיַֽעֲקֹב חֶסֶד לְאַבְרָהָם אֲשֶׁר־נִשְׁבַּעְתָּ לַאֲבֹתֵינוּ מִימֵי קֶֽדֶם׃ 105 7 4 4

< मीखा 7 >