< मीखा 6 >
1 १ आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
Sasa sikilizeni kile ambacho Yahwe asemacho, “Inuka na ueleze kesi yako mbele ya milima; acha milima isikie sauti yako.
2 २ पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
Sikilizeni madai ya Yahwe, enyi milima, na ninyi misingi mivumilivu ya dunia. Kwa kuwa Yahwe anavumilia pamoja na watu wake, na atapigana katika mahakama juu ya Israeli.”
3 ३ “माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे.
Watu wangu, nimefanya nini kwenu? nimewachosha mara ngapi? shuhudieni dhidi yangu!
4 ४ कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
Kwa kuwa niliwaleta kutoka nchi ya Msiri na kuwaokoa kutoka kwenye nyumba ya utumwa. Nawatuma Musa, Aruni, na Mariamu kwako.
5 ५ माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
Watu wangu, kumbukeni ambavyo Balaki mfalme wa Moabu alivyotunga, na vile ambavyo Balamu mwana wa Beori alivyomjibu kama ulipokuwa ukienda kutoka kwa Gilgali, hivyo mnaweza kujua matendo ya haki ya Yahwe.”
6 ६ मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
Je nilete nini kwa Yahwe, ninapoenda kumwinamia Mungu aliye juu? Je ninaweza kuja kwake na sadaka za kuteketeza, pamoja na ndama wenye mwaka mmoja?
7 ७ हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
Je Yahwe atapendezwa na maelfu ya kondoo waume, au na elfu kumi za mito ya mafuta? Je nimtoe mzaliwa wangu wa kwanza kwa ajili ya kosa langu, tunda la mwili wangu kwa ajili ya dhambi yangu mwenyewe?
8 ८ हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
Amekwambia, mtu, kile kilicho bora, na kile ambacho Yahwe atakacho kutoka kwako: Kutenda haki, kupenda ukarimu, na kutembea kwa unyenyekevu pamoja na Mungu wako.
9 ९ परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते. जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो, म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
Sauti ya Yahwe inatangaza kwenye mji-hata sasa hekima hukukiri jina lako: “Kaa tayari kwa ajili ya fimbo, na kwa yule aliyeiweka.
10 १० अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
Kuna utajiri katika nyumba za waovu, na kipimo cha uongo hilo ni chukizo mno.
11 ११ मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
Ningeweza kumfikira mtu kuwa hana hatia kama anatumia kipimo cha ulaghai, pamoja na mfuko wa kipimo wa udanganyifu?
12 १२ त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
Matajiri wamejaa uharibifu, makazi yao yamesema uongo, na ulimi wao katika midomo yao unaudanganyifu.
13 १३ म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
Kwa hiyo nimekupiga kwa pigo linaloumiza, nimekufanya gofu kwa sababu ya dhambi zako.
14 १४ तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील, तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.
Utakula lakini hutatosheka; utupu wako utabakia ndani yako. Utatunza mizigo mbali lakini hutahifadhi, na kile unachokihifadhi nitakitoa kwa upanga.
15 १५ तू पेरशील, पण कापणी करणार नाही; तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, पण त्याचे तेल स्वत: ला लावणार नाही; तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
Utapanda lakini huatavuna; utazikusanya zaituni lakini hutajipaka mafuta; utasindika zabibu lakini hutakunywa divai.
16 १६ कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.
Kanuni zilizotengenezwa na Omri zimetunzwa, na matendo yote ya nyumba ya Ahabu. Mnatembea kwa ushauri wao. Hivyo nitakufanya wewe, mji, gofu, na makazi yako jambo la zomeo, na matabeba dharau kama watu wangu.”