< मीखा 6 >

1 आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
請ふ汝らヱホバの宣まふところを聽け 汝起あがりて山の前に辨爭へ 崗に汝の聲を聽しめよ
2 पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
山々よ地の易ることなき基よ 汝らヱホバの辨爭を聽け ヱホバその民と辨爭を爲しイスラエルと論ぜん
3 “माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे.
我民よ我何を汝になししや 何において汝を疲勞たるや 我にむかひて證せよ
4 कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
我はエジプトの國より汝を導きのぼり奴隸の家より汝を贖ひいだしモーセ、アロンおよびミリアムを遣して汝に先だたしめたり
5 माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
我民よ請ふモアブの王バラクが謀りし事およびベオルの子バラムがこれに應へし事を念ひシツテムよりギルガルにいたるまでの事等を念へ 然らば汝ヱホバの正義を知ん
6 मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
我ヱホバの前に何をもちゆきて高き神を拜せん 燔祭の物および當歳の犢をもてその御前にいたるべきか
7 हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
ヱホバ數千の牡羊萬流の油を悦びたまはんか 我愆のためにわが長子を獻げんか 我靈魂の罪のために我身の產を獻げんか
8 हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
人よ彼さきに善事の何なるを汝に告たり ヱホバの汝に要めたまふ事は唯正義を行ひ憐憫を愛し謙遜りて汝の神とともに歩む事ならずや
9 परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते. जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो, म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
ヱホバの聲邑にむかひて呼はる 智慧ある者はなんぢの名を仰がん 汝ら笞杖および之をおくらんと定めし者に聽け
10 १० अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
惡人の家に猶惡財ありや 詛ふべき縮小たる升ありや
11 ११ मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
我もし正からざる權衡を用ひ袋に僞の碼子をいれおかば爭で潔からんや
12 १२ त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
その富る人は強暴にて充ち其居民は謊言を言ひその舌は口の中にて欺くことを爲す
13 १३ म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
是をもて我も汝を撃て重傷を負はせ汝の罪のために汝を滅す
14 १४ तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील, तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.
汝は食ふとも飽ず腹はつねに空ならん 汝は移すともつひに拯ふことを得じ 汝が拯ひし者は我これを劍に付すべし
15 १५ तू पेरशील, पण कापणी करणार नाही; तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, पण त्याचे तेल स्वत: ला लावणार नाही; तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
汝は種播とも刈ることあらず 橄欖を踐ともその油を身に抹ることあらず 葡萄を踐ともその酒を飮ことあらじ
16 १६ कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.
汝らはオムリの法度を守りアハブの家の一切の行爲を行ひて彼等の謀計に遵ふ 是は我をして汝を荒さしめ且その居民を胡盧となさしめんが爲なり 汝らはわが民の恥辱を任べし

< मीखा 6 >