< मीखा 5 >

1 यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.
딸 군대여 너는 떼를 모을지어다 그들이 우리를 에워쌌으니 막대기로 이스라엘 재판자의 뺨을 치리로다
2 पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.
베들레헴 에브라다야 너는 유다 족속 중에 작을지라도 이스라엘을 다스릴 자가 네게서 내게로 나올 것이라 그의 근본은 상고에 태초에니라
3 यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल, आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.
그러므로 임산한 여인이 해산하기까지 그들을 붙여 두시겠고 그 후에는 그 형제 남은 자가 이스라엘 자손에게로 돌아오리니
4 तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
그가 여호와의 능력과 그 하나님 여호와의 이름의 위엄을 의지하고 서서 그 떼에게 먹여서 그들로 안연히 거하게 할 것이라 이제 그가 창대하여 땅 끝까지 미치리라
5 आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल. अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही सात मेंढपाळ आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.
이 사람은 우리의 평강이 될 것이라 앗수르 사람이 우리 땅에 들어와서 우리 궁들을 밟을 때에는 우리가 일곱 목자와 여덟 군왕을 일으켜 그를 치리니
6 तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील. तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.
그들이 칼로 앗수르 땅을 황무케 하며 니므롯 땅에 들어와서 우리 지경을 밟을 때에는 그가 우리를 그에게서 건져 내리라
7 जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.
야곱의 남은 자는 많은 백성 중에 있으리니 그들은 여호와에게로서 내리는 이슬 같고 풀 위에 내리는 단비 같아서 사람을 기다리지 아니하며 인생을 기다리지 아니할 것이며
8 जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो, जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो, आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते, त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक, पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.
야곱의 남은 자는 열국 중과 여러 백성 중에 있으리니 그들은 수풀의 짐승 중의 사자 같고 양떼 중의 젊은 사자 같아서 만일 지나간즉 밟고 찢으리니 능히 구원할 자가 없을 것이라
9 तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो आणि तो त्यांचा नाश करो.
네 손이 네 대적 위에 들려서 네 모든 원수를 진멸하기를 바라노라
10 १० परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.
여호와께서 가라사대 그 날에 이르러는 내가 너의 말을 너의 중에서 멸절하며 너의 병거를 훼파하며
11 ११ तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.
너의 땅의 성읍들을 멸하며 너의 모든 견고한 성을 무너뜨릴 것이며
12 १२ तुझ्या हातून मी जादूटोणा नष्ट करीन, आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील.
내가 또 복술을 너의 손에서 끊으리니 네게 다시는 점장이가 없게 될 것이며
13 १३ मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
내가 너의 새긴 우상과 주상을 너의 중에서 멸절하리니 네가 네 손으로 만든 것을 다시는 섬기지 아니하리라
14 १४ तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन, आणि तुझ्या शहरांचा नाश करीन.
내가 또 너의 아세라 목상을 너의 중에서 빼어 버리고 너의 성읍들을 멸할 것이며
15 १५ आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.”
내가 또 진노와 분한으로 청종치 아니한 나라에 갚으리라 하셨느니라

< मीखा 5 >