< मीखा 4 >
1 १ परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या घराचा पर्वत, इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल. आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.
Mas nos últimos dias, acontecerá que a montanha do templo de Yahweh será estabelecida no topo das montanhas, e será exaltada acima das colinas; e as pessoas vão se afluir a ela.
2 २ पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, “या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या. मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील, आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.” कारण सियोनमधून नियमशास्त्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
Muitas nações irão e dirão, “Venha! Vamos até a montanha de Yahweh, e para a casa do Deus de Jacob; e ele nos ensinará seus caminhos, e nós caminharemos em seus caminhos”. Pois a lei sairá de Zion, e a palavra de Yahweh de Jerusalém;
3 ३ तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील, आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील. ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील, आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही, आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
e ele irá julgar entre muitos povos, e decidirá sobre nações fortes de longe. Eles baterão suas espadas em arados, e suas lanças em ganchos de poda. A nação não levantará a espada contra a nação, nem aprenderão mais a guerra.
4 ४ त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
Mas cada homem se sentará debaixo de sua videira e debaixo de sua figueira. Ninguém os fará ter medo, pois a boca de Yahweh dos Exércitos falou.
5 ५ कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.
De fato, todas as nações podem caminhar em nome de seus deuses, mas caminharemos em nome de Yahweh nosso Deus para todo o sempre.
6 ६ परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन, आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले, त्यांना मी एकवट करीन.
“Naquele dia”, diz Yahweh, “Vou montar o que é foleiro”, e eu vou recolher o que é expulso, e aquilo que eu afligi;
7 ७ मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन, आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.” आणि आता व सदासर्वकाळ, मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन.
e eu farei daquilo que foi coxo um remanescente, e aquilo que foi lançado longe de uma nação forte: e Yahweh reinará sobre eles no Monte Zion a partir de então, mesmo para sempre”.
8 ८ आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा, सियोन कन्येच्या टेकड्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.
Você, torre do rebanho, a colina da filha de Sião, para você, ela virá. Sim, o domínio anterior virá, o reino da filha de Jerusalém.
9 ९ आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.
Agora por que você clama em voz alta? Não há rei em você? Seu conselheiro já pereceu, que as dores se apoderaram de você como de uma mulher em trabalho?
10 १० सियोनच्या कन्ये, प्रसवतीप्रमाणे वेदना पावून प्रसुत हो, कारण आता तू शहरातून बाहेर जाशील, शेतात राहशील, आणि बाबेलला जाशील. तेथे तुझी सुटका होईल, आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडवील.
Sinta dor, e dê à luz, filha de Sião, como uma mulher em situação de trabalho; por enquanto, você sairá da cidade, e habitará no campo, e virá até a Babilônia. Lá você será resgatado. Lá Yahweh o resgatará da mão de seus inimigos.
11 ११ आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.”
Agora muitas nações se reuniram contra você, dizem eles, “Que ela seja contaminada”, e deixar que nossos olhos se regozijem sobre Zion”.
12 १२ संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे.
Mas eles não conhecem os pensamentos de Yahweh, nem eles entendem seu conselho; pois ele as reuniu como as roldanas para a eira.
13 १३ परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर, मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”
Levanta-te e debulha, filha de Zion, pois eu farei seu ferro de chifre, e eu farei seus cascos de bronze. Você vai bater em pedaços em muitas pessoas. Dedicarei seus ganhos a Yahweh, e sua substância para o Senhor de toda a terra.