< मीखा 4 >

1 परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या घराचा पर्वत, इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल. आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.
וְהָיָ֣ה ׀ בְּאַחֲרִ֣ית הַיָּמִ֗ים יִ֠הְיֶה הַ֣ר בֵּית־יְהוָ֤ה נָכֹון֙ בְּרֹ֣אשׁ הֶהָרִ֔ים וְנִשָּׂ֥א ה֖וּא מִגְּבָעֹ֑ות וְנָהֲר֥וּ עָלָ֖יו עַמִּֽים׃
2 पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील, “या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या. मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील, आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.” कारण सियोनमधून नियमशास्त्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
וְֽהָלְכ֞וּ גֹּויִ֣ם רַבִּ֗ים וְאָֽמְרוּ֙ לְכ֣וּ ׀ וְנַעֲלֶ֣ה אֶל־הַר־יְהוָ֗ה וְאֶל־בֵּית֙ אֱלֹהֵ֣י יַעֲקֹ֔ב וְיֹורֵ֙נוּ֙ מִדְּרָכָ֔יו וְנֵלְכָ֖ה בְּאֹֽרְחֹתָ֑יו כִּ֤י מִצִּיֹּון֙ תֵּצֵ֣א תֹורָ֔ה וּדְבַר־יְהוָ֖ה מִירוּשָׁלָֽ͏ִם׃
3 तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील, आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील. ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील, आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही, आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
וְשָׁפַ֗ט בֵּ֚ין עַמִּ֣ים רַבִּ֔ים וְהֹוכִ֛יחַ לְגֹויִ֥ם עֲצֻמִ֖ים עַד־רָחֹ֑וק וְכִתְּת֨וּ חַרְבֹתֵיהֶ֜ם לְאִתִּ֗ים וַחֲנִיתֹֽתֵיהֶם֙ לְמַזְמֵרֹ֔ות לֹֽא־יִשְׂא֞וּ גֹּ֤וי אֶל־גֹּוי֙ חֶ֔רֶב וְלֹא־יִלְמְד֥וּן עֹ֖וד מִלְחָמָֽה׃
4 त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
וְיָשְׁב֗וּ אִ֣ישׁ תַּ֧חַת גַּפְנֹ֛ו וְתַ֥חַת תְּאֵנָתֹ֖ו וְאֵ֣ין מַחֲרִ֑יד כִּי־פִ֛י יְהוָ֥ה צְבָאֹ֖ות דִּבֵּֽר׃
5 कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.
כִּ֚י כָּל־הָ֣עַמִּ֔ים יֵלְכ֕וּ אִ֖ישׁ בְּשֵׁ֣ם אֱלֹהָ֑יו וַאֲנַ֗חְנוּ נֵלֵ֛ךְ בְּשֵׁם־יְהוָ֥ה אֱלֹהֵ֖ינוּ לְעֹולָ֥ם וָעֶֽד׃ פ
6 परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन, आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले, त्यांना मी एकवट करीन.
בַּיֹּ֨ום הַה֜וּא נְאֻם־יְהוָ֗ה אֹֽסְפָה֙ הַצֹּ֣לֵעָ֔ה וְהַנִּדָּחָ֖ה אֲקַבֵּ֑צָה וַאֲשֶׁ֖ר הֲרֵעֹֽתִי׃
7 मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन, आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.” आणि आता व सदासर्वकाळ, मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन.
וְשַׂמְתִּ֤י אֶת־הַצֹּֽלֵעָה֙ לִשְׁאֵרִ֔ית וְהַנַּהֲלָאָ֖ה לְגֹ֣וי עָצ֑וּם וּמָלַ֨ךְ יְהוָ֤ה עֲלֵיהֶם֙ בְּהַ֣ר צִיֹּ֔ון מֵעַתָּ֖ה וְעַד־עֹולָֽם׃ פ
8 आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा, सियोन कन्येच्या टेकड्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.
וְאַתָּ֣ה מִגְדַּל־עֵ֗דֶר עֹ֛פֶל בַּת־צִיֹּ֖ון עָדֶ֣יךָ תֵּאתֶ֑ה וּבָאָ֗ה הַמֶּמְשָׁלָה֙ הָרִ֣אשֹׁנָ֔ה מַמְלֶ֖כֶת לְבַ֥ת־יְרוּשָׁלָֽ͏ִם׃
9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.
עַתָּ֕ה לָ֥מָּה תָרִ֖יעִי רֵ֑עַ הֲמֶ֣לֶךְ אֵֽין־בָּ֗ךְ אִֽם־יֹועֲצֵךְ֙ אָבָ֔ד כִּֽי־הֶחֱזִיקֵ֥ךְ חִ֖יל כַּיֹּולֵדָֽה׃
10 १० सियोनच्या कन्ये, प्रसवतीप्रमाणे वेदना पावून प्रसुत हो, कारण आता तू शहरातून बाहेर जाशील, शेतात राहशील, आणि बाबेलला जाशील. तेथे तुझी सुटका होईल, आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडवील.
ח֧וּלִי וָגֹ֛חִי בַּת־צִיֹּ֖ון כַּיֹּֽולֵדָ֑ה כִּֽי־עַתָּה֩ תֵצְאִ֨י מִקִּרְיָ֜ה וְשָׁכַ֣נְתְּ בַּשָּׂדֶ֗ה וּבָ֤את עַד־בָּבֶל֙ שָׁ֣ם תִּנָּצֵ֔לִי שָׁ֚ם יִגְאָלֵ֣ךְ יְהוָ֔ה מִכַּ֖ף אֹיְבָֽיִךְ׃
11 ११ आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.”
וְעַתָּ֛ה נֶאֶסְפ֥וּ עָלַ֖יִךְ גֹּויִ֣ם רַבִּ֑ים הָאֹמְרִ֣ים תֶּחֱנָ֔ף וְתַ֥חַז בְּצִיֹּ֖ון עֵינֵֽינוּ׃
12 १२ संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे.
וְהֵ֗מָּה לֹ֤א יָֽדְעוּ֙ מַחְשְׁבֹ֣ות יְהוָ֔ה וְלֹ֥א הֵבִ֖ינוּ עֲצָתֹ֑ו כִּ֥י קִבְּצָ֖ם כֶּעָמִ֥יר גֹּֽרְנָה׃
13 १३ परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर, मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन. तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील. मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”
ק֧וּמִי וָדֹ֣ושִׁי בַת־צִיֹּ֗ון כִּֽי־קַרְנֵ֞ךְ אָשִׂ֤ים בַּרְזֶל֙ וּפַרְסֹתַ֙יִךְ֙ אָשִׂ֣ים נְחוּשָׁ֔ה וַהֲדִקֹּ֖ות עַמִּ֣ים רַבִּ֑ים וְהַחֲרַמְתִּ֤י לַֽיהוָה֙ בִּצְעָ֔ם וְחֵילָ֖ם לַאֲדֹ֥ון כָּל־הָאָֽרֶץ׃

< मीखा 4 >